Indian origin US Vice President Kamala Harris : अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीबाबत अवघ्या जगात उत्सुकता आहे. या बलाढ्या देशाच्या सर्वोच्च पदावर कोण बसणार याकडे याकडे सारेजण डोळे लावून बसले आहेत. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कमला हॅरिस यांचं नाव सुचवलं होतं. ऑगस्ट महिन्यात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात कमला हॅरिस यांचं नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं. दरम्यान, कमला हॅरिस यांचं नाव समोर आल्यापासून भारतीयांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. कमला हॅरिस या आफ्रिकन-अमेरिकन म्हणून स्वतःची ओळख सांगत असल्या तरीही त्यांच्यावर भारतीय संस्कारही झाले आहेत. त्यांच्या आई भारतीय असल्याने भारतीय माध्यमांत भारतीय वंशांच्या कमला हॅरिस असं संबोधलं जातं. त्यामुळे त्यांचं भारताशी नेमकं काय कनेक्शन आहे हे पाहूयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा