एका भारतीय परिचारिकेला येमेनमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. निमिषा प्रिया असं तिचं नाव असून ती केरळची आहे. ती सध्या तिच्या आयुष्यातील शेवटचे दिवस मोजत आहे. कारण तलाल अब्दो महदी नावाच्या येमेनी नागरिकाच्या हत्येसाठी तिला दोषी ठरवण्यात आलं आहे. तिने मृत्यूदंडाच्या शिक्षेविरुद्ध केलेली याचिका येमेनी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, त्यामुळे तिची सुटका आता जवळपास अशक्य आहे. येमेनच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयातही सुनावणी झाली परंतु प्रियाला दिलासा मिळू शकला नाही. २०१८ मध्ये येमेनमधील एका सत्र न्यायालयाने तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती.

कोण आहे निमिषा प्रिया?

निमिषा प्रिया ही केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील प्रशिक्षित परिचारिका आहे. ती तिचा पती टोनी थॉमस आणि मुलीसह येमेनमध्ये राहत होती. २०१४ मध्ये तिचा पती आणि मुलगी आर्थिक अडचणींमुळे भारतात परतले. पण प्रिया मात्र येमेनमध्येच थांबली व तिथे काम करत राहिली. पती भारतात परतल्यावर प्रियाने पतीचा मित्र तलाल अब्दो महदी याच्याकडे येमेनमध्ये क्लिनिक उघडण्यासाठी मदत मागितली. स्थानिक कायद्यानुसार, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक परवाने मिळविण्यासाठी येमेनी नागरिकाची मदत लागते.

Policeman dies in accident while returning from funeral of women police
अंत्यसंस्कारावरून परतताना पोलिसाचा अपघाती मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mirkarwada port loksatta news
मिरकरवाडा बंदराचा विकास वादाच्या भोवऱ्यात, राजिवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी संस्थेची २० लाखांच्या नुकसान भरपाईची नोटीस
Woman murdered in broad daylight in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
Woman murdered in Ambernath
अंबरनाथमध्ये भरदिवसा महिलेची हत्या; पूर्वेतील उड्डाणपुलाशेजार घडली घटना, अंबरनाथमध्ये खळबळ
new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
Telangana News
मत्यूनंतर दहा दिवस घरातच ठेवला आईचा मृतदेह, दोन बहि‍णींनी…; दुःखद घटनेने तेलंगणा हादरले
laxmi narayan tripathi on mamta kulkarni
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं अन् तिच्यासह झाली हकालपट्टी; त्रिपाठी म्हणाल्या, “तिने इस्लाम…”

कोण आहेत नवाज मोदी? गौतम सिंघानियांपासून विभक्त झाल्याने आहेत चर्चेत

‘द न्यूज मिनिट’च्या वृत्तानुसार, प्रियाने महदीच्या मदतीशिवाय २०१५ मध्ये स्वतःच क्लिनिक सुरू केले. क्लिनिकमधून कमाई होऊ लागल्यानंतर महदी प्रियाकडून त्यात वाटा मागू लागला. त्यामुळे महदी व प्रियाचे नाते बिघडू लागले. रिपोर्ट्सनुसार, महदीने लग्नाची खोटी कागदपत्रे बनवली आणि प्रिया आपली पत्नी असल्याचा दावा करू लागला. “जेव्हा मी तलालला याबद्दल विचारले तेव्हा त्याने दावा केला की मी अविवाहित महिला आहे असं लोकांना समजलं तर मला अडचणी येऊ शकतात, त्यामुळे खोटी कागदपत्रे बनवल्याचं त्याने सांगितलं,” अशी माहिती प्रियाने दिल्याचं ‘द न्यूज मिनिट’ने म्हटलं आहे.

अनुष्का शर्मा, हे श्रेय तुझंच…

महदीने अत्याचार केल्याचा प्रियाचा आरोप

प्रियाच्या मते तलाल तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार करत असे. २०१६ मध्ये, तिने त्याच्याविरोधात पोलीस तक्रार देखील दाखल केली होती, नंतर त्याला अटक झाली आणि त्याची सुटकाही झाली. तुरुंगातून सुटल्यावर महदीने प्रियाचा पासपोर्ट स्वतःकडे ठेवून घेतला आणि तिला त्रास देऊ लागला.

प्रियाने पासपोर्टसाठी केला तलाल महदीचा खून

२०१७ मध्ये प्रियाने तिचा पासपोर्ट परत मिळवण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन दिले. पण औषधाच्या ओव्हरडोजमुळे महदीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिने अब्दुल हननची मदत घेतली, अब्दुलनेच प्रियाला क्लिनिक उघडण्यात मदत केली होती. अब्दुल व प्रियाने मिळून तलालचा मृतदेह तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकून दिला.

लहान मुलींसाठीच्या भेटवस्तूंचं ‘मार्केट’…केसांमध्ये दोरे आणि खडे ओवण्याची मशीन्स!

नंतर स्थानिकांना महदीचा मृतदेह सापडला आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. ऑगस्ट २०१७ मध्ये, प्रिया आणि अब्दुल यांना अटक झाली आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. २०१८ मध्ये प्रियाला एका वर्षाच्या तुरुंगवासानंतर मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

येमेनला जाण्याची परवानगी द्या – प्रियाच्या आईची मागणी

‘द न्यूज मिनिट’च्या वृत्तानुसार, दिल्ली उच्च न्यायालयात शुक्रवारी झालेल्या न्यायालयीन कामकाजात प्रियाची आई आणि केरळमधील एक घरगुती मदतनीस प्रेमकुमारी यांनी येमेनला भेट देण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती केली. मृताच्या नातेवाईकांशी भेटून वाटाघाटी करून पैसे देणे हा आपल्या मुलीला वाचवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे तिच्या आईने सांगितले. येमेनमध्ये, मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसाला पैसे दिल्यास मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली जाऊ शकते. अपीलला उत्तर देताना, दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना अशा परिस्थितीत येमेनमध्ये प्रवास करण्यास कोणाला परवानगी देता येईल याबद्दल माहिती देण्याचे आदेश दिले.

शाब्बास पोरींनो! ५० लाखांच्या भांडवलातून ५०० कोटींचा व्यवसाय; तरुणींचे फोर्ब्सच्या यादीत झळकले नाव

या प्रकरणी तलाल महदीच्या वारसाला देण्यासाठी किती रक्कम द्यायची हे ठरलं नसलं तरी ती ७० लाख रुपयांच्या आसपास असू शकते. आपण ही रक्कम देऊ शकत नसल्याचं प्रियाने म्हटलं होतं. भारतातील एका संस्थेने क्राउडसोर्सिंगद्वारे पैसे उभारण्यासाठी ‘सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल अॅक्शन कौन्सिल’ नावाची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, आता केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार येमेनच्या अध्यक्षांकडे प्रियाची शिक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे, अशी माहिती ‘टाइम्स नाऊ’ने दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते याप्रकरणी म्हणाले…

या विषयावर बोलताना, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत सरकारला परिस्थितीची जाणीव आहे आणि आवश्यकतेनुसार ते मदत करत आहे. पण ते फार काही करू शकत नाही, कारण ही कायदेशीर बाब आहे.

Story img Loader