जो खरे प्रयत्न करतो, त्याला देव नक्की यश देतो ही म्हण केरळच्या एका तरुणीला तंतोतंत लागू पडलीय. जिलुमोल मॅरिएट असे त्या तरुणीचे नाव आहे. जन्मापासून दोन्ही हात नसलेल्या जिलुमोलने जिद्दीच्या जोरावर चारचाकी चालवण्याचा परवाना मिळवला आहे. विशेष म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्वत: जिलुमोलकडे हा परवाना सोपवला. जिलुमोलच्या या जिद्दीचे सगळीकडे कौतुक होत आहे.
हेही वाचा- भारतातील तरुणींच्या हाती आर्थिक नियोजनाची दोरी; गुंतवणुकीतही वाढला सहभाग
केरळच्या इडुक्की येथे राहणाऱ्या जिलुमोलचे गाडी चालवण्याचे स्वप्न होते. त्यासाठी तिला गाडी चालवण्याची कायद्याने परवानगी मिळावी, अशी तिची इच्छा होती. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिलुमोलने खूप मेहनत घेतली आणि त्या जोरावरच तिने चारचाकी गाडी चालवण्याच परवाना मिळवला. जिलुमोल मॅरिएट हात नसतानाही चारचाकी चालवण्याचा परवना मिळवणारी आशियातील पहिली महिला बनली आहे.
हेही वाचा- ‘अभिनेत्रीचा सुवर्णकाळ फार तर ३५ व्या वर्षापर्यंत!’- रविना टंडन
जिलुमोल कार नेमकी कशी चालवते?
आता हात नसतानाही जिलुमोल कार कशी चालवते, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जिलुमोल कार चालवण्यासाठी आपल्या पायांचा वापर करते. पायांच्याच मदतीने ती गाडीचे स्टेअरिंग व्हील सांभाळते. एवढेच नाही, तर पायांच्या मदतीनेच ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक कामे करते.
जिलुमोल कोच्ची येथे ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करते. गेल्या महिन्यापासून ती चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेत होती. चारचाकीचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळावे, अशी तिचा इच्छा होती. कोच्चीमधील एक स्टार्ट-अप कंपनी वी इनोव्हेशनने तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला मदत केली. वी इनोव्हेशनने कंपनीने ऑपरेटिंग इंडिकेटर, वायपर व हेडलॅम्पसाठी व्हॉइस कमांड-आधारित प्रणाली विकसित केली. या प्रणालीचा वापर केल्यानंतर कार चालवणाऱ्या व्यक्तीला आपल्या हातांचा वापर करण्याची गरज नाही. केवळ आवाजाने कार चालवणाऱ्या व्यक्ती ही सिस्टीम ऑपरेट करू शकते.