आराधना जोशी

हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत अनेक शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या असतील किंवा एक दोन दिवसांमध्ये सुरू होणार असतील. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठी अशी मोठी सुट्टी कशी घालवायची याचं फार टेन्शन नसतं. पण शाळेतल्या मुलांसाठी आणि त्यांच्या  वर्किंग पॅरेंट्साठी अशा सुट्टीत नेमकं काय करायचं? हा एक मोठा प्रश्नच असतो.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण
diet of small babies, Health Special, Health tips,
Health Special: लहान बाळांचा आहार कसा असावा?
Special facilities to transport disabled voters to the polling station
नागपूरकरांनो, दिव्यांग मतदारांना ‘ही’ मोफत सेवा…
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा

पूर्वीच्या काळी सुट्टी लागली की आजोळी जाणं हा पर्याय हल्ली पालकांच्या सुट्ट्यांच्या प्रॉब्लेममुळे फारसा व्यवहार्य मानला जात नाही. त्यामुळे महिनाभर गावाला जाणं वगैरे गोष्टी हल्ली फारशा होत नाहीत. अशावेळी मुलांना कुठे ‘अडकवायचं’ हा एक यक्षप्रश्न पालकांसमोर असतो. सुट्टीचा हा एवढा मोठा काळ मुलं आणि पालक (त्यातही अनेकदा आई) दोघांच्याही दृष्टीने अत्यंत अवघड असतो. ज्या पाळणाघरात मुलं इतर वेळी असतात ती पाळणघरंही अनेकदा महिनाभर सुट्टीमुळे बंद असतात. त्यामुळे नोकरदार पालकांची आणि त्यातही आईची या सुट्टीच्या काळात मोठी ओढाताण होत असते. तारेवरची कसरत आईला अनेकदा पार पाडावी लागते.

हेही वाचा >> सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?

सुटीमध्ये मुलांची फक्त योग्य रितीने सोय करून भागत नाही, तर त्यांना या काळात आनंदी ठेवणं, त्यांची चिडचिड होऊ न देणं, त्यांच्या मनासारखी सुट्टी त्यांना मनसोक्त उपभोगायला देणं हे सुध्दा महत्त्वाचं असतं. या सगळ्या कसरती करताना एकदाची ही सुटी संपून जाते आणि पालकांचा जीव भांड्यात पडतो. मुलं साधारण १०-१२ वर्षांची होईपर्यंत हे चक्र दरवर्षी सुरूच असतं. विभक्त कुटुंबात राहणाऱ्या नोकरदार पालकांच्या मुलांना सोबतीची आणि या पालकांना आपलं मूल सुरक्षित आहे, याची सुटीच्या काळात खरी गरज असते.

अनेक घरांमधून यावर आपापल्या परीने उपाय योजले जातात. कधी घरात कामाला येणाऱ्या मावशीच्या तर कधी शेजारी राहणाऱ्यांच्या भरवशावर मुलांना एकटं घरात सोडून जाणं पालकांच्या जीवावर येतं. पण एवढे दिवस सुट्टी घेणं आई किंवा बाबा दोघांनाही परवडणारं नसतं. अशावेळी अनेकदा मनाविरुद्ध वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांचा पर्याय शोधला जातो. मात्र मुलांनी तिथे जाणं आणि परत घरी सुखरूप येणं हा सुद्धा पालकांच्या दृष्टीने टेन्शनचं काम असतं. मुलांना घरात एकटं ठेवलं तर ती नीट राहतील का? गॅसजवळ तर जाणार नाहीत नं? घरात काही उपद्व्याप करणार नाहीत नं? नळ नीट बंद करतील नं? नीट जेवतील का? मागचं आवरतील का? कुलूप लावून गेलो तर आतून कडी तर लावणार नाहीत नं? कुलूप न लावता गेलो तर दरवाजा तसाच उघडा ठेवून मुलं खेळायला तर जाणार नाहीत नं? असे असंख्य नवे प्रश्न त्यावेळी उभे राहतात.

हेही वाचा >> बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

या सगळ्या प्रश्नांचा विचार करता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इतरवेळी जशी पाळणघरांची एक सपोर्ट सिस्टीम या वर्किंग पॅरेंट्साठी आवश्यक आहे तशीच एक सिस्टीम उन्हाळी सुट्टीसाठी देखील आवश्यक आहे. प्रत्येकवेळी पालकांना सुट्टी घेणं जसं जमत नाही तसंच दोन्हीकडच्या आजी आजोबांना पण येऊन राहायला जमेलच असं नाही. शिवाय या काळातली मुलांची आजारपणं, मुलांच्या पालकांकडून असणाऱ्या अपेक्षा, ज्यांच्या भरवशावर या सुटीच्या काळाचं नियोजन करावं त्यांची उपलब्धता, त्यांच्या आरोग्य किंवा इतर घरगुती समस्या, ऑफिसमध्ये अचानक वाढणारं काम, कौटुंबिक समारंभ, येणारे पाहुणे अशा अनेक गोष्टींंसाठी वेगळ्या सुट्टीची कायमच गरज भासत असते. त्याचाही नीट विचार करून या मोठ्या समस्येवर तोडगा वाट काढत उन्हाळ्याची सुटी पार करावी लागते. यासाठी नेमकं काय करता येऊ शकतं?

हेही वाचा >> भावंडांबद्दल वाटणारा मत्सर कसा कमी कराल? ‘या’ छोट्या छोट्या गोष्टींमधून दिसेल सकारात्मक बदल

मुलांच्या सुट्टीत पालकांनी काय करावं?

१) शक्य असेल आणि ऑफिसकडून तशी सोय उपलब्ध असेल तर वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारावा. १५ दिवस बाबा आणि १५ दिवस आई अशी वाटणी केली तर दोघांनाही वेगळी सुट्टी घेण्याची गरज पडणार नाही.

२) मुलं ६ – ७ वर्षांची झाली की त्यांना घरात एकटं ठेवण्याची सवय पालकांनी करायला हवी. सुट्टीच्या दिवशी एखादा तास मुलांना घरी एकटं सोडून आपण सोसायटीच्याच आवारात थांबायचे. हळूहळू हा वेळ वाढवत न्यायचा. मुलं या काळात घर आणि स्वत:ला कसं सांभाळतात हे पालकांना बघता येईल. एकदा मुलं याला सरावली की उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं एकटी राहू शकतील.

३) महिनाभरात सासू सासरे, आई-वडील जर मुलांकडे बघायला तयार असतील तर त्यांची मदत घ्यावी. पण जर त्यांची तयारी नसेल (तब्येतीची कारणं, त्यांना कुठे बाहेर जायचं असेल, त्यांच्याकडे कुणी येणार असेल) तर काय पर्याय उपलब्ध आहेत किंवा असू शकतात? आपल्याला सुट्टी घ्यावी लागली तर ती किती दिवस मिळेल याची आधीच चाचपणी करून ठेवली तर ऐनवेळी होणारी धावपळ आणि निर्माण होणारं टेन्शन बरंच कमी होईल.

४) सलग तीन ते चार तास चालणाऱ्या उन्हाळी शिबिरांचीही मोठी मदत होऊ शकते. मुलांना आवडेल अशा दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांमध्ये त्यांना बराच काळ गुंतवून ठेवता येईल. शिवाय अनेक नवीन गोष्टी शिकण्याची संधीही मिळेल.

५) हल्ली मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये उन्हाळी सुट्टीसाठी घरगुती स्वरूपात शिबिरे आयोजित केली जातात. तशी सोय जर तुमच्या जवळपास असेल आणि मुलांना तिथे जाण्यात रस असेल तर त्याचाही अवश्य विचार करावा.

६) सुट्टीच्या काळात तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचीही नकळत मदत होत असते. त्यांना शहर दर्शनाला पाठवताना आपल्या मुलांनाही पाठवले तर दोघांनाही एकमेकांची सोबत होते. याशिवाय पाहुण्यांसोबत वागण्या-बोलण्याचे एटीकेट्स मुलं आपोआप शिकतात. अर्थात आलेले पाहुणे किती जवळचे नातेवाईक आहेत यावर अशा गोष्टी अवलंबून असतात हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा.

थोडक्यात काय तर मुलांना आणि पालक म्हणून आपल्यालाही ही उन्हाळी सुट्टी ही सजा न वाटता मजा कशी वाटेल याचा विचार पालकांनी करणं अत्यंत गरजेचं  आहे. अर्थात वयानुसार आणि मुलांच्या मानसिकतेचा विचार करून विविध पर्यायांचा शोध हा पालकांना घ्यावा लागतो. त्यासाठी आई आणि बाबा अशा दोघांचंही योगदान तितकंच महत्त्वाचं असतं. नाहीतर मग नोकरदार आईची गत ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी व्हायला फारसा वेळ लागत नाही.