भारतातील नव्हे तर जगातील श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानींना ओळखले जाते. रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष असणाऱ्या मुकेश अंबानींची एकूण संपत्ती ९७ अब्ज डॉलर्स आहे. दिवसेंदिवस त्यांच्या संपत्तीत भर पडताना दिसत आहे. भारतीय उद्योगक्षेत्रात मुकेश अंबानींनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. मुकेश अंबानींबरोबर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य चांगलाच चर्चेत असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र, मुकेश अंबानींच्या दोन बहिणींबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. मुकेश अबांनीना दोन बहिणी आहेत. त्यातील एक म्हणजे दीप्ती साळगावकर. दीप्ती साळगावकर यांनी राज साळगावकर यांच्याबरोबर प्रेम विवाह केला. त्यांना विक्रम आणि इशिता साळगावकर (Ishita Salgaonkar) ही मुले आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष (Reliance Industries Limited) मुकेश अंबानी यांची इशिता ही भाची आहे. इशिता एक आघाडीची व्यावसायिक आणि उद्योजक आहे

हेही वाचा- साक्षी ‘तो’ गड्यांचाच खेळ गं! स्टेशन ते ऑफिस अगदी घरीही आम्ही हाच लढा देतो, आपलं चुकतं इतकंच..

इशिताने हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून पदवी मिळवली आहे. त्या साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट डेव्हलपमेंटच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. इशिता दीप्ती साळगावकर व दत्तराज साळगावकर यांची मुलगी आहे. दीप्ती साळगावकर ही प्रसिद्ध उद्योगपती धीरूभाई अंबानी यांची सर्वात लहान मुलगी आहे. दीप्ती यांचे पती दत्तराज साळगावकर यांनी गोव्याची संस्कृती आणि जातीयतेचे जतन करण्याच्या उद्देशाने सुनापरांताची स्थापना केली होती. दीप्ती साळगावकर या संस्थेच्या उपाध्यक्षा आणि सल्लागार मंडळाच्या सदस्या आहेत.

हेही वाचा- IIT मधून इंजिनिअरिंग, तब्बल चार वेळा यूपीएससी परीक्षेत नापास अखेर…; उमा हरथीची कहाणी तुम्हालाही करेल प्रेरित

इशिताने याआधी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नीशल मोदीसोबत २०१६ मध्ये लग्न केले होते, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. घटस्फोटानंतर इशिताने २०२२ साली नेक्सजू मोबिलिटीचे संस्थापक अतुल्य मित्तल यांच्याशी लग्नगाठ बांधली. अतुल्य हा लक्ष्मी निवास मित्तल यांचा पुतण्या असून तोही प्रसिद्ध उद्योगपती आहे.

हेही वाचा- आईचे दागिने विकून घेतली पुस्तकं, NEET परीक्षा क्रॅक करणाऱ्या रितिका पालच्या संघर्षाची कहाणी वाचाच!

मुकेश अंबानी यांची भाची इशिता साळगावकर हिच्या मालमत्तेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मामा मुकेश अंबानींप्रमाणेच इशिताही कोट्यवधी रुपयांची संपत्तीची मालकिण असल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. इशिता लक्झरी ब्रँडच्या कपड्यांपासून अनेक कार आणि आलिशान घरांची मालकीण आहेत. मामा मुकेश अंबांनी प्रमाणेच इशितानेही व्यवसायात मोठी प्रगती केली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about mukesh ambani niece ishita salgaonkar dpj
Show comments