रतन टाटा हे देशातील सर्वांत लोकप्रिय अब्जाधीशांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे आणि ते त्यांच्या व्यवसायासह साह्यकारी वा मदतीच्या वृत्तीसाठीही ओळखले जातात. भारतातील आघाडीच्या व्यावसायिक कुटुंबाबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. टाटा समूहाच्या काही उपकंपन्या असून, त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यातलीच एक कंपनी म्हणजे ट्रेंट होय. या कंपनीचे मार्केट कॅप १,३०,००० कोटी रुपयांहून जास्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेंट ही टाटा समूहाच्या अंतर्गत सर्वांत लोकप्रिय ब्रॅण्डपैकी एक आहे. ही एक भारतीय रिटेल कंपनी आहे; जी भारतात वेस्टसाइड, लँडमार्क व इतर ब्रॅण्ड चालवते. आता रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा सांभाळत असलेली ट्रेंट कंपनी एकेकाळी सिमोन सांभाळत होत्या. अनेकांना माहीत नाही; पण सिमोन टाटा या रतन टाटांच्या सावत्र आई आहेत. सिमोन या भारतात पर्यटक म्हणून आल्या होत्या आणि नंतर त्या कायमच्या इथल्याच झाल्या. आज आपण सिमोन टाटा यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – …अन् तिने लग्नाच्या आठ दिवसाआधी त्याला दिला नकार

नवल टाटांच्या प्रेमात पडल्या अन्…

सिमोन टाटा यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे झाला आणि त्या तिथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. त्या २३ वर्षांच्या असताना भारतात पर्यटनासाठी आल्या होत्या. तेथेच त्यांची भेट रतन टाटा यांचे वडील नवल होर्मुसजी टाटा यांच्याशी झाली. काही वर्षं एकत्र घालवल्यानंतर, दोघांनी १९५५ मध्ये लग्न केलं आणि सिमोन कायमच्या भारताची आर्थिक राजधानी मुंबईत राहू लागल्या. या जोडप्यानं १९५७ मध्ये रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांना जन्म दिला. ‘डीएनए’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा – मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

नोएल यांच्या जन्मानंतर टाटा कंपनीत रुजू

नोएल यांना जन्म दिल्यानंतर काही वर्षांनी सिमोन टाटा १९६२ मध्ये टाटा ऑइल मिल्स, ‘लॅक्मे’च्या एका उपकंपनीमध्ये सामील झाल्या. २० वर्षं कंपनीत काम केल्यानंतर त्या चेअरपर्सन पदापर्यंत पोहोचल्या. ‘लॅक्मे’च्या यशानंतर सिमोन यांची १९८९ मध्ये टाटा इंडस्ट्रीजच्या बोर्डमध्ये नियुक्ती झाली.

हेही वाचा – लोक काय म्हणतील या भीतीने माझ्या सासूने मला…

ट्रेंट कंपनीच्या नॉन- एक्झीक्युटिव्ह चेअरमन

आठ वर्षांत लॅक्मे हा एक मोठा कॉस्मेटिक ब्रॅण्ड बनविल्यानंतर टाटांनी १९९६ मध्ये लॅक्मे ब्रॅण्ड ‘हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड’ला विकला. टाटा कंपनीने या ब्रॅण्डच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून ट्रेंट कंपनी सुरू केली. ट्रेंट लिमिटेड रिटेल फॅशन चेन वेस्टसाइड आणि बुकस्टोअर, लॅण्डमार्क चालवते. ‘लॅक्मे’च्या विक्रीनंतर भागधारकांना ‘ट्रेंट’मधील शेअर्स देण्यात आले होते. सिमोन टाटा यांनी ३० ऑक्टोबर २००६ पर्यंत ट्रेंट लिमिटेडच्या नॉन-एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम पाहिलं. सिमोन आता ९४ वर्षांच्या आहेत.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know about ratan tata stepmother simone tata love story lakme and trent brand non executive chairman hrc
Show comments