आम आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आतिशी यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात ज्या महिला मंत्र्यांकडे सर्वाधिक खाती आहेत त्यापैकी आतिशी या एक आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची चर्चा रंगली होती. आतिशी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर जल्लोष झाल्याचे पाहायला मिळाले.

आतापर्यंत आतिशी यांनी शिक्षण, महिला व बालविकास, पर्यटन, कला, संस्कृती व भाषा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वीज ही खाती सांभाळली आहेत. सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर असणाऱ्या त्या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ajit Pawar: ‘विलासराव देशमुख आघाडीचे सरकार चालविण्यात पटाईत’, अजित पवारांचे सूचक विधान; महायुतीला इशारा?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Megharani Jadhav
“धनुष्यबाणाला मत दिलं नाही तर ३,००० रुपये वसूल करू”, भाजपा नेत्याची ‘लाडक्या बहिणीं’ना तंबी
west Vidarbha, number of women candidates, contesting election
रणरागिनी… पश्चिम विदर्भात गेल्‍या निवडणुकीपेक्षा दुप्‍पट महिला उमेदवार रिंगणात

आतापर्यंत भारतातील २८ राज्यांपैकी १२ राज्यांमध्ये १६ महिलांनी मुख्यमंत्रिपद सांभाळले आहे. त्यापैकी शीला दीक्षित यांचा कार्यकाळ सर्वाधिक होता, तर जानकी रामचंद्रन यांचा महिला मुख्यमंत्री म्हणून सर्वात कमी कार्यकाळ होता. याबरोबरच मायावती या पहिल्या दलित प्रवर्गातील मुख्यमंत्री होत्या. या निमित्ताने भारतातील आतापर्यंतच्या महिला मुख्यामंत्र्यांविषयी जाणून घेऊयात.

१. सुचेता कृपलानी

स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळख असलेल्या भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. २ ऑक्टोबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशच्या चौथ्या मुख्यमंत्री म्हणून त्यांंनी शपथ घेतली. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

२. नंदिनी सप्तथी

नंदिनी सप्तथी या ओडिशाच्या मुख्यमंत्री होत्या. १९७२ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हातात घेतली होती.

३. शशिकला काकोडकर

शशिकला काकोडकर या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नेत्या होत्या. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या त्या कन्या होत्या. दयानंद बांदोडकर यांच्या निधनानंतर शशिकला काकोडकर यांनी १९७३ मध्ये गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर एप्रिल १९७९ पर्यंत त्या गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर कार्यरत होत्या.

४. सैयदा अनवरा तैमूर

भारतीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या सैयदा अनवरा तैमूर यांनी आसामचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. डिसेंबर १९८० ते जून १९८१ या दरम्यान त्यांनी आसामच्या मुख्यमंत्री काम केले आहे.

५. जानकी रामचंद्रन

अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाच्या त्या नेत्या होत्या. ७ जानेवारी १९८८ ते ३० जानेवारी १९८८ या काळासाठी त्यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवले. सर्वात कमी काळ मुख्यमंत्रिपदावर असणाऱ्या त्या महिला मुख्यमंत्री आहेत.

हेही वाचा: UPSC परीक्षेत दोनदा अपयश, मित्रांकडून चेष्टामस्करी होऊनही हार मानली नाही; वाचा, कसा होता IFS अधिकारी अपाला मिश्रा यांचा प्रवास?

६. जे जयललिता

जे जयललिता या अभिनय आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखल्या जातात. त्या १४ वर्ष तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदावर होत्या.

७. मायावती

बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.

८. राजिंदर कौर भट्टल

राजिंदर कौर भट्टल यांनी पंजाबचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. १९९६ ते १९९७ या काळात त्यांनी मुख्यमंत्रिपदी काम केले, तर २००४ ते २००७ या काळात पंजाबच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम सांभाळले.

९. राबडी देवी

राबडी देवी राष्ट्रीय जनता दल या पक्षाच्या नेत्या होत्या. त्यांनी बिहारचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद भूषवले.

१०. सुषमा स्वराज

भारतीय जनता पार्टीच्या सुषमा स्वराज यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता. ऑक्टोबर १९९८ ते डिसेंबर १९९८ असा त्यांचा कार्यकाळ होता.

हेही वाचा: निसर्गलिपी : कमळाचे दिवस…

११. शीला दीक्षित

डिसेंबर १९९८ ते डिसेंबर २०१३ या काळासाठी शीला दीक्षित या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी होत्या. महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांचा सर्वात जास्त कार्यकाळ आहे.

१२. उमा भारती

भाजपा पक्षाच्या उमा भारती डिसेंबर २००३ ते ऑगस्ट २००४ या काळासाठी मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या.

१३. वसुंधरा राजे

भाजपा पक्षाच्या वसुंधरा राजे यांनी दोन वेळा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी काम केले. डिसेंबर २००३ ते डिसेंबर २००८ आणि डिसेंबर २०१३ ते २०१८ या काळत त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या.

१४. ममता बॅनर्जी

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी या मे २०११ पासून आत्तापर्यंत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आहेत.

१५. आनंदीबेन पटेल 

मे २०१४ ते ऑगस्ट २०१६ या काळासाठी त्या गुजरातच्या मुख्यमंत्री होत्या.

१६. मेहबूबा मुफ्ती

एप्रिल २०१६ ते जून २०१८ या काळात मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्रिपद सांभाळले.