शॉपिंग हा प्रत्येक महिलेच्या आवडीचा विषय. कपड्यांची, दागिन्यांची स्त्रियांना जितकी आवड असते तितकाच सॉफ्ट कॉर्नर त्यांना चपलांबद्दलही असतो. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या चपला हव्यात असं प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. शूज पासून सॅंडलपर्यंत ते फ्लॅटपासून हाय हिल्सपर्यंत अशा विविध प्रकारच्या फूटवेअर महिलांकडे असतात. तसंच या कलेक्शनमध्ये प्रामुख्याने आढळणारा चपलेचा प्रकार म्हणजे कोल्हापुरी चप्पल.

या चपलेचा इतिहासही फार जुना आहे. तेराव्या शतकात या चपलेची निर्मिती झाली आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरकरांच्या निर्मितीला प्रोत्साहन दिलं. आज स्त्री असो अथवा पुरुष प्रत्येकाकडे एखादा तरी कोल्हापुरी चपलेचा जोड असतोच. खास करून हाताने तयार केल्या जाणाऱ्या या चपला अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असतात. म्हशीच्या चामड्यापासून या चपलांची निर्मिती केली जाते.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
only rs 100 crore balance left in vault of thane municipal corporation
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळ

आणखी वाचा : आयुष्यात प्रत्येकाला सगळं ‘बेस्ट’च हवं असतं, पण…

आज कोल्हापुरी चप्पल निर्मितीचा उद्द्योग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे. आपल्यापैकी अनेक जण कोल्हापूरला गेल्यानंतर आवर्जून कोल्हापूरी चप्पल विकत घेतातच. पारंपरिक कपड्यांवर कोल्हापुरी चपला शोभून दिसतात. त्याचप्रमाणे आज काल इंडो- वेस्टर्न फॅशनचा जमाना आहे. त्यामुळे अनेकदा असे इंडो वेस्टर्न कपडे परिधान करतानाही त्यावर कोल्हापुरी चपला घातल्या जातात. पण आपल्यापैकी कोणीही या चपला रोजच्या रोज वापरत नाही.

आपण फक्त सणा-समारंभाला या चपला घालतो आणि बाकी वर्षभर त्या तशाच कपाटात असतात. पण इतर चपलांप्रमाणेच या चपलांना हाताळून चालत नाही. कोल्हापुरी चपलांची विशेष काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्या खराब होतात, त्यांना बुरशी येते आणि जेव्हा आपल्याला त्या घालायच्या असतात तेव्हा नेमक्या आपल्याला त्या घालता येत नाहीत.

हेही वाचा : आहारवेद : स्त्रियांच्या श्वेत व रक्तपदरावर उपयुक्त डाळिंब

कोल्हापुरी चपलांची काळजी नक्की घ्यावी कशी हे तुम्हाला माहिती आहे का?
कोल्हापुरी चपलांना फार काळ बंद जागेत ठेवलं तर त्यांना बुरशी येते. अशावेळी आपण ती कपड्याने साफ करून किंवा ब्रशने साफ करून काढून टाकतो. पण हा उपाय दीर्घकाळ टिकणारा नाही. कोल्हापुरी चपलांना खुल्या जागेत ठेवलंत तर त्यावर बुरशी येणार नाही. त्याचप्रमाणे आपलं वरच्यावर त्यांच्याकडे लक्ष राहील आणि त्या वेळच्यावेळी स्वच्छ केल्या जातील. पण या चपलांना बुरशी न येण्यासाठी खास उपाय आहे. या चपलेला खोबरेल तेल लावून ठेवावं. एका वाटीत तेल घेऊन कापसाच्या बोळ्याने ते तेल संपूर्ण चपलेला लावावं. याचे दोन फायदे आहेत.

  1. यामुळेच चपलेला बुरशी येत नाही.
  2. बऱ्याचदा कोल्हापुरी चप्पल खूप कडक असते ती तेलामुळे थोडी मऊ होते.
    कोल्हापुरी चपलेला तेल लावून झालं की त्या चपला जुन्या वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून कॉटनच्या पिशवीत एका खुल्या जागी ठेवाव्यात. यामुळे त्या दीर्घकाळ टिकतील आणि आपल्याला ज्या दिवशी त्या वापरायच्या आहेत, त्या दिवशी न वापरण्याची नामुष्की आपल्यावर येणार नाही.