भारतीय हवाई दलातील संधी

१) एनसीसी स्पेशल एन्ट्री योजना- अर्हता- ६० टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील बीई किंवा बीटेक किंवा कोणत्याही विषयातील पदवी आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक. एनसीसी सिनिअर डिव्हिजन विंग मधील सी प्रमाणपत्र आवश्यक. उमेदवाराचे वय २० ते २४ वर्षे असावे. या निवडीसाठीची जाहिरात भारतीय हवाई दलामार्फत जून आणि डिसेंबर महिन्यात प्रकाशित करण्यात येते.

२) एफसीएटी-एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट- ही परीक्षा भारतीय हवाई दलामार्फत दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्ट अशी दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर, एअर फोर्स सिलेक्शन बोर्ड टेस्टिंग हा दुसरा टप्पा पार पाडावा लागतो. याअंतर्गत दोन टप्पे आहेत.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
DoT recruitment 2024 Apply for Sub Divisional engineer salary up to Rs 151100
DoT recruitment 2024: सब-डिव्हिजन इंजीनिअरच्या पदासाठी होणार भरती;१,५१,१०० रुपयांपर्यंत मिळेल पगार, आताच करा अर्ज
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

पहिला टप्पा- ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग टेस्ट. दुसरा टप्पा- पिक्चर पर्सेप्शन ॲण्ड डिस्कशन टेस्ट. पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच दुसऱ्या टप्प्यासाठी संधी दिली जाते. टप्पा दोनची परीक्षा/चाळणी चार ते पाच दिवस चालते. यामध्ये पुढील बाबींचा समावेश असतो.

(१) लेखी मानसशास्त्रीय (सॉयकॉलॉजिकल टेस्ट) चाचणी- ही परीक्षा मानसोपचार तज्ज्ञामार्फत घेतली जाते.

(२) समूह (ग्रुप टेस्ट) चाचणी- यामध्ये बाह्य (आऊटडोअर) बौध्दिक आणि शारीरिक कृतींचा समावेश असतो.

(३) मुलाखत (इंटरव्ह्यू)- मुलाखत घेणाऱ्या अधिकाऱ्यामार्फत व्यक्तिगत संवाद साधला जातो.

(४) फ्लाईंग ब्रँचसाठी निवड झालेल्या उमेदवारांना संगणकीय वैमानिक निवड प्रक्रिया चाळणी (कॉम्प्युटराईज्ड पायलट सिलेक्शन सिस्टिम टेस्ट) द्यावी लागते.)

आणखी वाचा : मुलींनो, परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी असेल तर…

तिसरा टप्पा- (वैद्यकीय चाळणी/मेडिकल एक्झामिनेशन)- दुसऱ्या टप्प्यात, निवड मंडळाकडून शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाळणीस सामोरे जावे लागते.

चौथा टप्पा (अखिल भारतीय गुणवत्ता यादी)- वैद्यकीय चाळणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची विविध शाखांमध्ये उपलब्ध जागांनुसार अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाते.

या योजनेंतर्गत हवाई शाखेत (फ्लाईंग ब्रँच) साठी निवड केली जाते.

अर्हता – कोणत्याही विषयातील ६० टक्के गुणांसह पदवी आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. किंवा ६० टक्के गुणांसह बीई/बीटेक किंवा ६० टक्के गुणांसह असोशिएट मेंबरशिप ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सची अथवा एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाची ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण. या परीक्षेला विद्यापीठाची मान्यता प्राप्त हवी. उमेदवारांचे वय २० ते २४ वर्षे असावे. जून आणि डिसेंबरमध्ये या पदाच्या परीक्षेची जाहिरात भारतीय हवाई दलामार्फत प्रकाशित केली जाते.

लष्करी वैद्यकीय सेवा

मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस
मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या माध्यमातून भारतीय लष्करात महिला उमदेवारांचा प्रवेश होऊ शकतो. या सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना लष्करामार्फत चालविण्यात येणाऱ्या बी.एस्सी (नर्सिंग) या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवावा लागतो. हा अभ्यासक्रम आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेच्या अंतर्गत पुणे, कोलकता, बेंगळुरु, आयएनएचएस अश्विनी, लखनौ आणि नवी दिल्ली येथे कार्यरत असणाऱ्या नर्सिंग महाविद्यालयात करावा लागतो. एकूण २२० उमेदवारांना प्रवेश दिला जातो. यापैकी २५ जागा या एनसीसी सी प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती आणि जमाती उमेदवारांसाठी १५ जागा राखीव आहेत.

आणखी वाचा : मुलींनो, आता परदेशातील शिक्षण खर्चाची चिंता सोडा!

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर कायम स्वरुपी किंवा लघु सेवा (कमिशन) साठी नियुक्ती केली जाते. या सर्व बाबी शारीरिक क्षमता आणि वैद्यकीय चाळणी यावर अवलंबून असतात.

अशी असते परीक्षा-

अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ट पध्दतीची आणि बहुपर्यायी उत्तरांची असते. एकूण प्रश्न १५० कालावधी ९० मिनिटे. प्रश्नपत्रिकेत सामान्य ज्ञान, इंग्रजी आणि विज्ञान (भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र) यावर प्रत्येकी ५० प्रश्न विचारले जातात. परीक्षेचे माध्यम इंग्रजी. निगेटिव्ह गुण नाहीत. या परीक्षेत विशिष्ट गुणांनी उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखती व वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले जाते. त्यानंतर अंतिम निवड केली जाते.

अर्हता- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी हे विषय घेतेलेल्या महिला उमदेवार या परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्यांना सरासरीने किमान ५० टक्के गुण मिळणे आवश्यक ठरते.

संपर्क- डायरेक्टर जनरल ऑफ मेडिकल सर्व्हिसेस, आर्मी-४ बी, रुम नंबर ३४ एल ब्लॉक, एजी ब्रँच, इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स (आर्मी), नवी दिल्ली ११०००१ दूरध्वनी- ०११- २३०९२२९४

Story img Loader