मुलींना पीसीओएस्‌ ही विकृती होण्याचे नेमके कारण काय? पीसीओएस्‌ चे एकच कारण ठोसपणे सांगता आलेले नाही. ही विकृती कोणत्या एका कारणाने नाही तर अनेकविध कारणांमुळे होते असे दीर्घकालीन निरिक्षणाने संशोधकांच्या लक्षात आले आहे. वेगवेगळी कारणे हे या रोगाचे वैशिष्ट्य आणि उपचार करण्यामधील आव्हान आहे. त्याचमुळे एक विशिष्ट औषध घेऊन ही विकृती नष्ट होईल हे संभवत नाही. स्वस्थ जीवनशैली, स्वास्थ्य-पोषक आहार, आरोग्य-पूरक सवयी, योग्य-पर्याप्त व्यायाम आणि नेमकी औषधे व योग्य उपचार यांच्या एकत्रित उपचारानेच या रोगाचा सामना करणे शक्य आहे. याचसाठी या रोगाची नेमकी कारणे कोणती हे समजून घ्यायला हवे. आपल्याला रोगाची कारणे लक्षात आली तरच त्यांचा प्रतिबंध व उपाय करणे सोपे होईल.

स्त्री शरीरामध्ये पुरुष संप्रेरकांची अतिनिर्मिती

How every sexual intercourse is rape with promise of marriage
विवाहाच्या वचनाने केलेला प्रत्येक शरीरसंबंध बलात्कार कसा?
Joy of Community Farming
निसर्गलिपी : सामुदायिक शेतीचा आनंद
Madras High Court judgment Maternity Leave Third Pregnancy
तिसर्‍या बाळंतपणाला मातृत्व रजा मिळेल का?
Bishop Mariann Edgar Budde US president Donald Trump
डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावणारी ती… भारतात असं काही शक्य आहे?
Loksatta Chatura Nature Change of seasons and moments of joy in the garden
निसर्गलिपी: ऋतू बदल आणि बागेतील आनंदाचे क्षण
village that plants tree on named of girl
मुलीच्या नावानं झाड लावणारं गाव…
tabebuia rosea flowers Mumbai
निसर्गलिपी : बहराचा उत्सव
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे
Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते

पीसीओएस्‌ मध्ये शरीरात होणारी प्रमुख विकृती म्हणजे शरीर स्त्रीचे असूनही पुरुष संप्रेरकांची (हार्मोन्सची) अधिक निर्मिती. प्रत्यक्षात स्त्री-शरीरामध्ये स्त्री-बीजग्रंथीं (ओव्हरी)कडून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे स्त्री-संप्रेरक अधिक प्रमाणात, तर टेस्टोस्टेरॉन हा पुरुष-संप्रेरक अल्प प्रमाणात स्रवणे अपेक्षित आहे.परंतु तसे न होता टेस्टोस्टेरॉन हा पुरुष संप्रेरक अधिक प्रमाणात स्रवू लागणे हे पीसीओएस्‌ चे प्रमुख कारण. पीसीओएस् मध्ये मासिक पाळीचे चक्र बिघडणे, स्त्री-बीजांड तयार न होणे, अपरिपक्व स्त्री-बीजांडे तयार होणे, शरीरावर केसांची वाढ, वगैरे जी लक्षणे दिसतात; तो मुलीच्या शरीरामध्ये अवास्तव प्रमाणात वाढलेल्या टेस्टोस्टेरॉनचा (आणि इस्ट्रोजेनचा सुद्धा) प्रताप असतो. मुलगी असूनही पुरुष-संप्रेरक वाढण्याचे कारण म्हणजे इन्सुलिन प्रतिरोध व मेटाबोलिक सिन्ड्रोम, ज्यांचा विचार आपण मागील लेखांमध्ये केला आहे.

अनुवंशिकता हा सुद्धा पीसीओएस्‌ ला एक कारणीभूत घटक आहे. एकाच पेशीपासून निर्माण होणार्‍या एकपेशीय व एकसारख्या दिसणार्‍या जुळ्या बहिणींमध्ये असे दिसून आले आहे की वयात आल्यावर त्यामधील एका बहिणीला पीसीओएस्‌चा त्रास झाल्यावर दुसरीला सुद्धा होण्याची दाट शक्यता असते. ज्या स्त्रियांना पीसीओएस्‌ हा आजार तारुण्यामध्ये होता, त्यांच्या मुलींना सुद्धा वयात येताना पीसीओएस्‌ होण्याची मोठी शक्यता असते.याचाच अर्थ या विकृतीमध्ये अनुवंशिकता हा घटक महत्त्वाचा आहे,म्हणजेच पीसीओएस्‌ संबंधित जनुके (जीन्स) तुम्हांला तुमच्या मागील पिढीकडून मिळाली असतील तर धोका बळावतो. मात्र इथे हे समजून घ्यायला हवे की तुमच्या आईला-आजीला हा त्रास होता याचा अर्थ हा आजार तुम्हांला होण्याची शक्यता अधिक असते इतकंच. अनुवंशिकतेपेक्षा सभोवतालचे वातावरण, आपली जीवनशैली व आहार हा अधिक महत्त्वाचा आहे, तो योग्य असेल तर अनुवंशिकता हा घटक निष्प्रभ होईल.

स्थूलत्व (चरबीयुक्त जाड शरीर) हा घटक पीसीओएस्‌ ला कारणीभूत आहे, यात तर काहीच शंका नाही. कारण पीसीओएस्‌ ने ग्रस्त मुली या सहसा वजनदार-जाडजूड शरीराच्या असतात. त्यातही वयात येण्यापूर्वी म्हणजे मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी व होण्यादरम्यान ज्या मुली स्थूल-वजनदार शरीराच्या असतात त्यांना पुढे जाऊन पीसीओएस्‌ होण्याचा धोका बळावतो. स्थूल शरीर म्हणताना शरीराचा मध्य भाग आकाराने व वजनाने वाढणे, विशेषतः ओटीपोटावर जमलेली चरबी हा अर्थ अपेक्षित आहे. २१व्या शतकात दारिद्र्य रेषेखालील लोक वगळता इतर समाजाला झालेली अन्नधान्याची व दूधदुभत्याची सहज उपलब्धता, सुपाच्य कर्बोदकांनी (रिफाईन्ड कार्बोहायड्रेट्सनी) युक्त अन्नपदार्थांची रेलचेल, पाश्चात्त्य खाद्यपदार्थांचे नित्य सेवन आणि संगणक क्रांतीमुळे एकाच जागी बसून करायच्या कामांना मिळालेली प्रतिष्ठा, मानवी शरीराला अधिकाधिक आळशी करणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा, खेळांप्रति तिटकारा, व्यायामाचा कंटाळा, शरीरातून न निघणारा घाम या सर्वांच्या परिणामी समाजात बहुतांश लोकांची शरीरे आकाराने व वजनाने (आणि नवीन पिढीची तर प्रकर्षाने) वाढत गेली, जे पीसीओएस्‌ ही विकृती २१व्या शतकात बळावण्याचे महत्त्वाचे कारण ठरले आहे.

जन्मतः असाधारण आकाराच्या मुली- ज्या मुली जन्माला आल्या तेव्हा असाधारण आकाराच्या असतात त्यांना सुद्धा मासिक पाळी सुरु झाल्यावर पीसीओएस्‌ होण्याचा धोका असतो. असाधारण आकार म्हणजे जन्माला येणारे उंच व धष्टपुष्ट आकाराचे अधिक वजनाचे बाळ किंवा अगदी उलट, कमी वजनाचे खुरटी-अपुरी वाढ झालेले बाळ. अतिमोठ्या आकाराच्या मुलींमध्ये वा अति कृश शरीराच्या मुलींमध्येही स्त्री-प्रजनन अवयवांची सकस वाढ होत नाही आणि स्त्रीबीज ग्रंथीचे बीजांड निर्मितीचे कार्य योग्य प्रकारे होत नाही. कोणत्याही बाबतीत अतियोग व अयोग हेच रोगाचे कारण असते असे आयुर्वेद शास्त्र सांगते, ते का हे इथे वाचकांच्या लक्षात येईल.

गर्भारपणात टेस्टोस्टेरॉनचे सेवन- एखादी स्त्री गर्भार असताना जर ती टेस्टोस्टेरॉन घेत असेल आणि गर्भातला भ्रूण मुलगी असेल तर त्या टेस्टोस्टेरॉनचा त्या स्त्री-गर्भावर विपरित परिणाम होऊन ती मुलगी वयात येईल तेव्हा तिला पीसीओएस्‌ होण्याची शक्यता असते. ’स्त्री गर्भार असताना टेस्टोस्टेरॉन का घेईल?’ असा प्रश्न मनात येत असेल तर अनेक खेळाडू, व्यायामपटू आपली क्षमता व ताकद वाढवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन घेत असतात आणि त्यावेळी ती खेळाडू गर्भवती असेल तर धोका होऊ शकतो. मात्र हा एक तर्क आहे असे काही संशोधक म्हणतात. कसेही असले तरी गर्भारपणात कोणतेच औषध न घेणे व गर्भवतीने आपला आहार संपूर्णपणे नैसर्गिक ठेवणे किती महत्त्वाचे असते, हे इथे वाचकांच्या लक्षात येईल.

पीसीओएस् ला कारणीभूत अन्य कारणे समजून घेऊ उद्या…वाचत राहा ऑनलाईन लोकसत्ता.

drashwin15@yahoo.com

Story img Loader