सजावटीसाठी जसे फुलांचे गेंद तयार करतात तसेच हे हिरवेगार चेंडू फार सुंदर दिसतात. यासाठी पोरच्युलाका, पेप्रोमिया या साध्याशा झाडांचा वापर करता येईल. पोरच्युलाकाला ऑफिस प्लांट असंही म्हणतात. याच्या फुलांमध्ये अनेक रंग येतात. पेप्रोमिया हे झाड पोपटीसर हिरव्या रंगाच, तजेलदार पानांचं असतं. यांची फार देखभाल करावी लागत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील लेखात आपण कोकोडेमा तयार करण्याची प्राथमिक पद्धत पाहिली. या पद्धतीने आपण इनडोअर तसेच आऊटडोअर दोन्ही ठिकाणी वाढणारी झाडं लावू शकतो. तसेच लहान, मोठी, उंच वाढणारी, गवतसदृश, धावत्या खोडाची अशी सगळ्या प्रकारची झाडं यात लावता येतात. एखाद्या जुन्या वाढलेल्या झाडाला तयार कोकोडेमा बॉल्स अडकवून एक सुरेख हिरवा लूक देता येतो. छोट्या बाऊलमध्ये ठेवून दिवाणखाना, स्टडी किंवा मग सेंटर टेबलची शोभा वाढवता येते.

कोणत्याही नवीन पद्धतीने झाडं लावायची तर सगळ्यात महत्त्वाची असते माती. कोकोडेमा पद्धतीत वापरली जाणारी माती अगदी आपली साधी नेहमीचीच माती असते. सुरुवातीला एक भाग माती आणि सोबत अर्धा भाग कोकोपीट घ्यावं, यातच थोडं शेणखत किंवा गांडूळखत मिसळून पाणी घालून एक घट्ट गोळा करावा. मग मातीचा गोळा दाबून घेऊन जास्तीचं पाणी काढून घेऊन गोळ्यांचे दोन भाग करून त्यात निवडलेल्या झाडाची मुळं संस्था म्हणजेच रूट बॉल नीट बसवून घेत दुसरा भाग त्यावर दाबून पूर्ण गोलाकार द्यावा.

हेही वाचा : आयुष्याची घडी विस्कटवणारी वादळवाट…

आपलं झाड या गोळ्यामधील आवश्यक घटक घेऊन वाढणार असतं. झाडाची वाढ झपाट्याने होतेय असं लक्षात आलं तर आपण कोकोडेमा मोडून मुळांची आवश्यक तेवढी कापणी करून परत गोळा बांधून घेऊ शकतो. फांद्याही हव्या तेवढ्या ट्रीम करून झाडाला आकार देऊ शकतो.

कोकोडेमा बॉल्स बांधण्यासाठी तार, दोरी किंवा तत्सम काहीही वापरता येतं. या रचनेत फर्न्सचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मनीप्लांट, स्पायडर प्लांट, पोथास, क्रोटन, सक्युंलंट्समध्ये कलेंच्यू, तर फुलझाडात शेवंती, अडेनियम, चाफा, कण्हेर अशा मोठ्या झाडांचा वापर होतो. हिरवागार रंग हवा असेल तर बेगोनिया, फिलोडेनड्रोन, पीस लिली यांचा उपयोग करावा. यात एक अधिक सुंदर प्रकार करता येतो तो म्हणजे कोकोडेमाचे हिरवेगार गोल.

सजावटीसाठी जसे फुलांचे गेंद तयार करतात तसेच हे हिरवेगार चेंडू फार सुंदर दिसतात. यासाठी पोरच्युलाका, पेप्रोमिया या साध्याशा झाडांचा वापर करता येईल. पोरच्युलाकाला ऑफिस प्लांट असंही म्हणतात. याच्या फुलांमध्ये अनेक रंग येतात. पेप्रोमिया हे झाड पोपटीसर हिरव्या रंगाच, तजेलदार पानांचं असतं. यांची फार देखभाल ही करावी लागत नाही. पावसाळ्यात हे आपल्या कुंड्यांमध्ये नेहमी आढळतं. एक प्रकारचं तण आहे हे.

हेही वाचा : विरुद्ध स्वभावाचा जोडिदार मिळाला तर?

हिरवे गोळे बनवताना प्रथम नेहमीसारखा मातीचा गोळा बनवून घेऊन तो सुक्या शेवाळने किंवा नारळाच्या कॉयरने गुंडाळून घ्यायचा. मग त्यावर दोऱ्याने किंवा जाड सुतळीने बांधून घेतल्यावर त्याला एखाद्या लांब काठीने टोचून त्यात पोर्चुलाका, पेप्रोमियाचे तुकडे खोचायचे. अतिशय सावकाशपणे हा बॉल पूर्ण भरून घ्यायचा. यानंर हा चेंडू पाण्यात बुडवून टांगून निथळून घ्यायचा. म्हणजे जास्तीचं पाणी निघून जात. पाच-सहा दिवसांत खोचलेल्या रोपांच्या तुकड्यांची वाढ होते, आणि हिरवागार गोळा आकाराला येतो. आता हा गोळा आपण गॅलरीत, खिडकीत कुठेही हवा तसा टांगू शकतो किंवा टेबलवर ठेवू शकतो.

थोड्या मेहनतीत आणि कमी खर्चात करता येणारं कोकोडेमा फार उपयोगी ठरतं. म्हणूनच कमीत कमी सामान वापरत, कमीत कमी जागेत, कमीत कमी खर्चात साध्य होणारी ही पद्धत सध्या फार लोकप्रिय आहे. कोकोडेमा करताना आपण चुकतोय असं वाटलं तर मोडून परत करता येण्याची सोयसुद्धा आहे. शिवाय आपण घरातलं साहित्य वापरत असल्याने काही वाया घालवत आहोत ही बोच राहत नाही. मुक्तपणे प्रयोग करता येतात.यात झाडांचं नुकसान होण्याची शक्यता ही अगदी कमी असते, त्यामुळे लहान मुलांकडून झाडं लावून घेणं, त्यांना प्रत्यक्ष कृतीच्या आनंद देणं यासाठी कोकोडेमा ही पद्धत अगदी उत्तम आहे. असे हे अनोखे तंत्र तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि इतरांनाही शिकवा.

mythreye.kjkelkar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kokodama peperomia plant portulaca office plant low cost and small area plant css