कुडता, टॉप आणि ब्लाऊजच्या गळ्यांमध्ये आपल्या सगळ्यांना सर्वसाधारणपणे माहीत असलेले प्रकार असतात ते असे- साधा गोल गळा- ‘राउंड नेक’, ‘व्ही नेक’, चौकोनी किंवा आयताकृती गळा, ‘की-होल नेक’ किंवा फारतर ‘शर्ट कॉलर’ किंवा ‘स्टँड कॉलर’ स्टाइल नेक. पण याहूनही गळ्यांच्या कितीतरी वेगवेगळ्या फॅशन केल्या जातात. यातील काही फॅशन ओळखण्यात होणारा गोंधळ टाळण्यासाठी त्या नीट जाणून घेऊ.
आणखी वाचा : बाळाचा पहिला आहार कसा असावा ?
गोल गळ्यांमध्ये विविध प्रकार-
बोट नेक- अनेक जण गोल गळा आणि बोट नेक ओळखण्यात गोंधळ करतात. आता तुम्हाला वाटेल, की यात कसा गोंधळ होऊ शकतो? पण आपल्या मैत्रिणींना विचारलंत तरी याची खूप उदाहरणं समजतील. टेलरकडे ‘बोट नेक’चा कमीज शिवायला टाकला आणि प्रत्यक्षात शिवून आला तो साध्या गोल गळ्याचा निघाला, असं किती जणींच्या बाबतीत झालंय नुसतं विचारून पाहा! बोट नेक हा खोल नव्हे, तर पसरट असतो. एखाद्या बोटीचं चित्र काढताना आपण जसा अर्ध-लंबगोलाकृती आकार काढू, तसा! बोट नेकचा टॉप वा ब्लाउज घातल्यावर आपला गळा (मान), खांदे आणि कॉलर बोन्सकडे लक्ष जातं. ‘परफेक्ट फिटिंग’चा बोट नेक खांदे अधोरेखित करत असल्यामुळे असा ब्लाउज फार एलिंगट/ ग्रेसफुल दिसतो. एकतरी बोट नेकचा कुडता किंवा साडीवरचा ब्लाउज तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवाच!
आणखी वाचा : द गुड पार्ट -दिवाळी
गोल गळा अर्थात- ‘राऊंड नेक’मध्ये फॅशनच्या दृष्टिनं वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही ‘स्कूप नेक’ हा शब्द कदाचित ऐकला असेल. हा कुडता वा टॉपच्या गोल गळ्याचाच एक प्रकार. पण त्याबरोबरच ‘ज्वेल नेक’ आणि ‘क्रू नेक’ हेही राऊंड नेकचेच प्रकार आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? यातला फरक पाहू या-
आणखी वाचा : किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…
स्कूप नेक- हा गोल गळा नावाप्रमाणेच ‘स्कूप’ केल्यासारखा- म्हणजे जरा जास्त खोलगट असतो. स्कूप नेकची फॅशन फिटेड टीशर्ट आणि स्ट्रेचेबल कापडांच्या ड्रेसेसमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. हा गळा छान तर दिसतो, पण सर्वच स्त्रियांना तो छान बसेल असं नाही. म्हणजे तुम्ही जर थोड्या ‘चबी’ असाल, तर तुम्हाला कदाचित हा गळा उत्तम बसेल. पण इतर अनेकींच्या बाबतीत, जर तो नीट बसला नाही, तर आणखी उतरल्यासारखा दिसतो. शिवाय हा गळा खोल असल्यामुळे कदाचित आपल्याकडे अनेकींना असे कपडे घालणं ‘ऑकवर्ड’ वाटू शकतं.
आणखी वाचा : गोष्ट फराळाची: सुनेत्रा अजित पवार… चकली… सुप्रिया सुळे अन् ३५ वर्षांनंतरही मिळणारा सासूचा ‘तो’ सल्ला
ज्वेल नेक- हा एक अतिशय ‘एलिगंट’ असा गोल गळा. हा फारसा खोल नसतो, पण इतका पुरेसा खोल असतो, की तुम्ही गळ्यात एखादा चोकर किंवा चेन घातली असेल, तर ठसठशीतपणे दिसू शकेल. ड्रेसेसमध्ये हा उत्तम दिसतो.
आणखी वाचा :
क्रू नेक- हादेखील प्रामुख्यानं टी-शर्टस् मध्ये आढळतो. हा ‘हाय नेक’ प्रकारचा गोल गळा आहे, म्हणजे तो अगदी गळ्यालगत बसतो. फॉर्मल प्रसंगांना- उदा. ट्राऊझर आणि ब्लेझर अशा जोडीवर घालण्यासाठी हे टी-शर्ट खूप छान दिसतात आणि कम्फर्टेबलही असतात.
आता आणखी एक वेगळीच फॅशन पाहू या-
आणखी वाचा : Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…
‘काउल नेक’
‘काउल नेक’ हा गळा साधारणपणे टॉप्समध्येच आढळतो. तोही स्लीव्हलेस किंवा स्पॅगेटी/ शोल्डर स्ट्रॅप प्रकारच्या टॉपमध्ये. यात निश्चित असा गळा शिवलेलाच नसतो. गळ्यापाशी कापडाचा थोडासा झोळ घेतलेला असतो आणि त्याच्या नैसर्गिक चुण्यांमधून आपला आपणच ‘सॉफ्ट व्ही शेप’चा गळा तयार होतो. हा गळा ‘पार्टी वेअर’ टॉप्समध्ये छान दिसतो. या टॉप्सचं कापड झुळझुळीत घ्यावं लागतं- उदाहरणार्थ सॅटिन.
आणखी वाचा : माधुरी दीक्षित म्हणते… घर, करिअर आणि मातृत्त्व… संतुलन सांभाळणं शक्य!
रोजच्या वापरात केल्या जाणाऱ्या साध्या फॅशन्समध्ये असलेला असा फरक लक्षात घेतला, तर तुम्हाला टेलरकडे किंवा दुकानात गेल्यावर प्रसंगानुरूप योग्य फॅशनचे कपडे शिवायला सांगणं किंवा निवडणं सोपं जाईल.