जगभरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. महिलांमध्ये आढळणारा हा कर्करोगाचा फार गंभीर प्रकार आहे, ज्यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतोय. स्त्रियांमध्ये वाढता लठ्ठपणा, वाईट जीवनशैली अशा काही कारणांमुळे गेल्या काही वर्षात स्तनाच्या कर्करोगाची समस्या वाढताना दिसतेय. यात अलीकडेच लॅन्सेटच्या अहवालातून स्तनाच्या कर्करोगाबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. २०४० सालापर्यंत स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे आणि मृत्यूचा धोका कितीतरी पटीने वाढण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे भारतात स्तनाच्या कर्करोगाबाबत काय स्थिती आहे? आणि तो रोखण्यासाठी काय करता येईल, याविषयी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना काही डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ..

कोलकाता येथील टाटा मेडिकल सेंटरमधील वरिष्ठ क्लिनिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संजय चॅटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका महिला रुग्णाविषयी माहिती दिली. डॉ. संजय चॅटर्जी म्हणाले की, पस्तीस वर्षीय शीला सिन्हा यांनी कल्पनाही केली नव्हती की, प्रसूतीनंतर सहा महिन्यांनी त्यांच्या स्तनामध्ये वेदनाहिन गाठ तयार होतील आणि त्यानंतर ती फुफ्फुस, यकृतात पसरून तिचे कर्करोगात रुपांतर होईल. आर्थिक स्थिती व्यवस्थित असतानाही शीला तपासणी न करता केवळ पर्यायी औषधांवर अवलंबून राहिल्या. अशाने त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली आणि कर्करोग त्यांच्या शरीरभर पसरला. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे पॅलिएटिव केयर उपचार पद्धती हाच एकमेव पर्याय होता.

retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
low cost and small cars are necessary in India says maruti suzuki chief rc bhargava
कमी किमतीच्या छोट्या मोटारी देशासाठी आवश्यकच!; मारुती सुझुकीचे अध्यक्ष भार्गव यांचे प्रतिपादन
If you are an iPhone 15 user, should you upgrade to iPhone 16
iPhone 15 Vs iPhone 16: iPhone 15 होणार २० हजार रुपयांनी स्वस्त? कोणता फोन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट?
Loksatta anvyarth Employment opportunities abroad higher education Indian Germany Baden Wuttenberg
अन्वयार्थ: रोजगारसंधीच्या पोटातील प्रश्न
isro mission SSLV D3
UPSC Key : यूपीएससी सूत्र : ISRO च्या SSLV-D3 मोहीमेचे महत्त्व अन् कर्करोगावरील औषध भारतात आणण्याबाबतचे नियम, वाचा सविस्तर…
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?

यावरून स्तनाचा कर्करोग हा जगातील सर्वात सामान्य कर्करोग आहे, पण संशोधन आणि उपचारात लक्षणीय सुधारणा असूनही महिला उपचार घेण्यात कशा मागे आहेत हे स्पष्ट होते, असे नवीन लॅन्सेट ब्रेस्ट कॅन्सर आयोगाच्या अहवालाचे सह-लेखक डॉ. चॅटर्जी म्हणाले. त्यांनी पुढे म्हटले की, रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांची काळजी घेणे यात असमानता दिसून येते, पॅनेलने या उदासीनतेला घोडचूक असल्याचे म्हणत ती हाताळण्यासाठी शिफारसी केल्या आहेत.

डॉक्टर चॅटर्जी यांनी स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आणखी एका रुग्णाविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, एका रुग्णाच्या पतीने आपल्या पत्नीला शेवटच्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे ओळखले. यावेळी त्याने पत्नीबरोबर हॉस्पिटलमध्ये जाणेदेखील सोडले, तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याने नंतर पत्नीलाच सोडून दिले; यावेळी तिची आई तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जावू लागली.

अनेक अहवालामध्ये, भारतातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोग म्हणून ???ध्वजांकित??? (की अंकित) केला आहे. भारतात दरवर्षी स्तनाच्या कर्करोगाची सुमारे दोन लाख नवीन प्रकरणं समोर येत आहेत. मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर (MBC) असलेले रुग्णांचा (जेव्हा कर्करोग स्तनातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो) समावेश आहे, या आजाराची लक्षणे सहज दिसत नाहीत किंवा कळून येत नाहीत, त्यामुळे ती ओळखणे काहीवेळा अवघड असतात, असेही डॉ. चॅटर्जी म्हणाले.

जगभरात स्तनाच्या कर्करोगाच्या २०२० मधील २.३ दशलक्ष नव्या रुग्णांची संख्या २०२४ पर्यंत तीस लाखांवर जाण्याचा अंदाज आहे. याच कालावधीत दरवर्षी एक दशलक्ष मृत्यूंचा अंदाज आहे, ज्यात कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

प्रमुख आव्हाने कोणती आहेत?

प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उशिरा निदान होणे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने निदान होणे. वरिष्ठ वैद्यकीय कर्करोगतज्ज्ञ डॉ. मिनिश जैन (द लॅन्सेट कमिशनशी संलग्न नाही) यांनी सांगितले की, देशात महाग आरोग्य सेवा आणि कुशल डॉक्टरांची संख्या कमी आहे. पण, या आजाराचे लवकरात लवकर निदान होणे हेच फार गरजेचे आहे. स्तनात कर्करोगाच्या गाठी झाल्या तरी त्या दुखत नाही आणि म्हणूनच स्त्रिया जास्त काळजी घेत नाहीत किंवा त्याकडे लक्ष देत नाहीत. पण, एक साधी क्लिनिकल स्तन परीक्षण आणि जागरूकतेच्या आधारे या कर्करोगाबाबत महिलांना सांगू शकतो. आयोगाच्या अहवालातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पॅरामेडिकल आणि त्यासंबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

डॉ. चॅटर्जी म्हणतात, दुसरे म्हणजे भविष्यातील स्तनाच्या कर्करोगाच्या प्रसाराला रोखण्यासाठी तयार राहण्याची गरज आहे. याचा अर्थ असा आहे की, याबाबत एका ठोस डेटाबेसची गरज आहे आणि संशोधन चालविण्यासाठी क्षेत्रे शोधणे आवश्यक आहे, ज्यामुळे स्तनाचा कर्करोग असलेल्या महिलांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

ग्लोबोकनच्या मते, दर चार मिनिटांनी एका भारतीय महिलेला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान होते. त्यामुळे २८ पैकी एका महिलेला त्यांच्या आयुष्यात स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अनेक अहवालांनुसार, २०२५ पर्यंत यात १५ टक्के वाढीचा अंदाज आहे. यावर आता सरकारने एक संरचित योजना सुरू केली आहे आणि नॅशनल असोसिएशन ऑफ मेडिकल सायन्सेसचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे, असेही ते म्हणाले.

तिसरे म्हणजे कर्करोगाच्या नोंदींमध्ये पुन्हा कर्करोग होण्याच्या प्रकरणांची नोंद करणे आणि MBC बद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. भारत याविषयी एक मार्ग दाखवू शकतो, असे डॉ. चॅटर्जी म्हणतात. काही रुग्णांना ‘राइट ऑफ’ चा अनुभव येतो, असेही अहवालात नमूद केले आहे. त्यांच्यात आपण दुर्लक्षित आणि मागे राहत असल्याची भावना निर्माण होते. अशा परिस्थितीत ते मदत घेण्याची किंवा त्यांना मदत करू शकणाऱ्या संशोधनात सहभागी होण्याची शक्यता कमी असते. मेटास्टॅटिक हा आजार असलेल्या रुग्णांना चांगले वाटण्यासाठी अधिक समर्थन आणि माहितीची आवश्यकता असते, असे सहयोगी आणि रुग्ण वकील लेस्ली स्टीफन सांगतात.

जागतिक स्तरावर २०२० मध्ये स्तनाच्या कर्करोगाने मरण पावलेल्या सर्व ६,८५,००० लोकांनी अंदाजे १२० दशलक्ष दिवस वेदना, श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि इतर लक्षणे सहन केली. लॅन्सेटने स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ६०६ लोकांचे सर्वेक्षण केले. यावेळी असे आढळले की, काहींनी केमोथेरपीदरम्यान समस्यांचा सामना केल्यामुळे नोकऱ्या गमावल्या, तर काहींनी लैंगिक बिघडलेले कार्य नोंदवले. याव्यतिरिक्त, लवकर स्तनाचा कर्करोग झालेल्या २० टक्के सहभागी आणि MBC झालेल्या २५ टक्के सहभागिंनी उपचारासाठी प्रवासाचा खर्च भागवण्यास अडचण येत असल्याचे सांगितले. लहान वयात स्तनाचा कर्करोग असलेल्या सुमारे २७ टक्के रुग्ण आणि MBC असलेल्या ३५ टक्के रुग्णांनी सांगितले की, त्यांना आर्थिक समस्या आहे. यात इतर गोष्टींसाठी झालेला खर्च हा वेगळा आहे.

म्हणूनच स्तनाच्या कर्करोगाच्या लक्षणांकडे लक्ष दिले पाहिजे. अधिक चांगले उपचार घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि समान दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.