आजच्या काळात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने काम करतात. अनेक महिला उद्योग क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. यापैकी एक म्हणजे लावण्या नल्ली यादेखील आहेत. चेन्नईमधील नल्ली सिल्क साडी सर्वांना माहीत असेल, पण साडीचा हा व्यवसाय सांभाळणाऱ्या महिलेबाबत फार कमी लोकांना माहीत आहे. नल्ली सिल्क साडीच्या कौटुंबिक व्यवसायाची धुरा सांभाळणारी लावण्या नल्ली ही एक भारतीय व्यावसायिक महिला आहे. ती नल्ली ग्रुपची पाचव्या पिढीतील वंशज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९२८ मध्ये स्थापन झालेल्या, नल्ली सिल्क हे नाव कापड आणि किरकोळ व्यवसायात आघाडीवर आहे. उत्कृष्ट सिल्कसाठी घरोघरी त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. लावण्याचे बालपण चेन्नईतील आजी-आजोबांच्या घरी गेले. तिने लहानपणापासून साडीचा व्यवसाय उभारताना पाहिले आहे. लहानपणापासून तिला व्यवसायाचे बाळकडू मिळाले होते. आज त्याच ज्ञानाच्या जोरावर तिने व्यवसाय आणखी यशस्वी केला आहे. २००५-२००९ च्या त्यांच्या कार्यकाळात, लावण्याने आपल्या व्यवसायाचा महसूल दुप्पट केला आणि १४ वरून २१ दुकानांपर्यंत व्यवसायाचा विस्तार केला. या व्यवसायात सामील झालेल्या त्यांच्या कुटुंबातील त्या पहिल्या महिला आहेत.

नल्ली यांनी चेन्नई येथील अण्णा विद्यापीठातून संगणक शास्त्रात अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. लावण्या सुरुवातीला २००५ मध्ये चार वर्षांसाठी नल्ली ग्रुपमध्ये सामील झाली, पण हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए करण्यासाठी ती या व्यवसायातून बाहेर पडली. त्यानंतर तिने मॅकिन्से अँड कंपनी (शिकागो) येथे दोन वर्षांहून अधिक काळ काम केले. ती भारतात परतली आणि Myntra मध्ये महसूल उपाध्यक्ष (vice president for revenue) म्हणून काम केले. लावण्‍याने २०१५ मध्‍ये Myntra सोडले. लावण्‍याने २०१६ मध्‍ये ई-कॉमर्स आणि ओम्निचॅनल (Omnichannel) प्‍लॅटफॉर्मचे उपाध्यक्ष (its vice chairman) म्हणून नल्‍लीमध्‍ये पुनरागमन केले.

३९ वर्षीय लावण्या नल्ली यांना रिटेल, स्ट्रॅटेजी, आणि ई-कॉमर्समध्ये १८ वर्षांचा अनुभव आहे. लावण्या नवीन व्यवसाय विकास आणि वाढीच्या संधी, रिटेल स्टोअर ऑपरेशन्स आणि खाजगी लेबल्सवर लक्ष केंद्रित करते. सध्या ती बेंगळुरूमध्ये राहते आणि अभय कोठारी यांच्याशी तिने लग्न केले आहे. अभयसह तिची भेट हार्वर्डमध्ये झाली होती. दोघांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. लावण्याचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. घर, संसार सांभाळून महिलाही यशस्वी उद्योजिका होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे लावण्या नल्ली.