विषमलिंगी (Heterosexual Women) स्त्रियांच्या तुलनेत उभयलिंगी (Biosexual Women) आणि समलिंगी (Homosexual Women) स्त्रियांच्या अकाली मृत्यूचा धोका सर्वाधिक असतो. एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. उभयलिंगी स्त्रिया ३७ टक्के आणि समलिंगी स्त्रियांच्या अकाली मृत्यूचं प्रमाण २० टक्के जास्त असतं, असं हार्वर्ड पिलग्रिम हेल्थ केअर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या नेतृत्वाखाली हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, यूटा युनिव्हर्सिटी, बोस्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटल आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी यांसारख्या संस्थांच्या सहकार्याने झालेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
LGBTQ समूदायातील महिलांमधील आरोग्याच्या असमानतेच्या दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर हा अभ्यास प्रकाश टाकतो. हार्वर्ड पिलग्रिम हेल्थ केअर इन्स्टिट्यूटमधील रिसर्च फेलो, मुख्य लेखिका सारा मॅकेटा या यूएसमधील एलजीबीटीक्यू व्यक्तींसाठी वाढत्या नकारात्मक वातावरणाच्या पार्श्वभूमीवर लैंगिक प्रवृत्ती-संबंधित असमानतांमागील प्रतिबंधात्मक कारणे दूर करण्याच्या आवश्यकतेवर भर देतात.
हेही वाचा >> स्त्री आरोग्य : गर्भनिरोधासाठी ‘सेफ पिरियड’ किती सेफ?
Heterosexual Women आणि Biosexual Women यांच्या आरोग्यावर परिणाम
डॉ. मॅकेटा म्हणाल्या की, LGBTQ व्यक्तींना कलंक, पूर्वग्रह आणि भेदभावाच्या अनोख्या प्रकारांचा सामना करावा लागतो. या समुदायावर सामाजिक दबाव असल्याने त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. शारीरिक आणि मानसिक दबाव वाढल्यामुळे LGBTQ समुदायातील व्यक्तींच्या अकाली मृत्यूचा धोका वाढतो.
LGBTQ समुदायातील अडचणी काय?
LGBTQ समुदायातील उभयलिंगी स्त्रियांना भौतिक आणि मानसिक प्रकारच्या बायोफिबियामुळे उद्भवणाऱ्या वेगळ्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याकडे हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि हार्वर्ड पिलग्रिम हेल्थ केअर इन्स्टिट्यूटमधील सहयोगी प्राध्यापक, ज्येष्ठ लेखिका ब्रिटनी चार्लटन यांनी लक्ष वेधलं.
हेही वाचा >> महिला रुग्णांवर महिला डॉक्टरांनीच उपचार केल्यास मृत्यूची शक्यता असते कमी? संशोधनातून माहिती उघड; पण कसं काय?
मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी काय करावं?
चार्लटन पुढे नमूद करतात की, उभयलिंगी व्यक्तींना सामाजिक दबावामुळे विविध समुदायातून बहिष्काराचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्या अकाली मृत्यूचा धोका अधिक संभवतो. यावर उपाय म्हणून संशोधकांनी कृती करण्यायोग्य पहिली पायरी प्रस्तावित केली आहे. बायोसेक्शुअल आणि होमोसेक्शुअल महिलांना नियमित आरोग्य तपासणी; तंबाखू, अल्कोहोलबाबत जनजागृती, या समुदायातील रुग्णांना उपचार करण्याकरता वैद्यकीय कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देणं गरजेचं आहे, असं डॉ. मॅकेटा यांनी म्हटलंय.