पूजा सामंत

कलर्स वाहिनीचे दोन मुख्य रियालिटी शोज ‘बिग बॉस (स्पर्धक -कॉन्टेस्टन्ट ) , आणि ‘झलक दिखला जा ‘(सीझन १० मध्ये विजेती ), डान्स दिवाने ज्युनियर्स ,इंडियाज बेस्ट डान्सर्स , हुनरबाज देश की शान अशा अनेक रियालिटी शोजमध्ये कधी प्रतिस्पर्धी तर कधी जज म्हणून मला संधी मिळत गेली आणि सातत्याने माझे काम ,माझा वावर वाहिन्या , प्रेक्षक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांपुढे येत राहिला. अर्थात सुरुवातीस मला हिंदी भाषेचे ज्ञान नव्हते. पण माझ्या कानांवर सतत हिंदी भाषा पडत होती , सेटवर प्रोडक्शन टीमकडून बोलली जाणारी हिंदी भाषा तशी बेसिक असल्यानं मला आधी भाषा समजू लागली ,नंतर ती बोलता येऊ लागली. दोन वर्षांत मी हिंदी भाषा शिकले , त्यात पारंगत झाले , आता माझ्यासमोर मला समजणार नाही अशा बेताने कुणी हिंदी भाषा बोलू शकणार नाही.

zee marathi new serial promo tula japanar ahe promo announces
तारीख अन् मुहूर्त ठरला! ‘झी मराठी’ची थ्रिलर मालिका ‘या’ दिवशी सुरू होणार; संपूर्ण स्टारकास्ट आली समोर, पाहा जबरदस्त प्रोमो
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
good feelings song Cold Play show ahmedabad Satyajit Padhye puppet show
‘कोल्ड प्ले’च्या मंचावर सत्यजित पाध्ये आणि सहकारी, ‘गुड फिलिंग्स’ गाण्यावर बोलक्या बाहुल्यांचे लक्षवेधी सादरीकरण
Sharayu Sonawane
मालिकांच्या महासंगमाबाबत ‘पारू’ फेम शरयू सोनावणे काय म्हणाली? घ्या जाणून…
supporters of former mla Prakash Awade attempted to break into Abhishek Spinning Mill over financial embezzlement
आर्थिक व्यवहारातून आवाडेंचा सूतगिरणी चालकांसोबत वाद
notorious gangster gajya marne
कुख्यात गुंड गजा मारणे याच्या चित्रीकरणाचा प्रसार; चार महाविद्यालयीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात
Loksatta vyaktivedh Satish Alekar Marathi Theatre Writing Director and Actor
व्यक्तिवेध: सतीश आळेकर
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन

माझ्या प्रवासाबद्दल माझ्या भावना व्यक्त करेन आधी . अवघ्या ४-५ वर्षांपूर्वी मला भारतात ओळखणारं कुणीही नव्हतं… पण आता माझी चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. मी सध्या कतारला निघाले आहे . फिफा कपच्या ओपनिंग सेरेमनी साठी मी भारताचे नेतृत्व करणार आहे, तिथे परफॉर्म करणार आहे . माझ्यासाठी ही देखील मोठी अचिव्हमेंट आहे . मी मोरोक्को (कॅनडा ) ह्या देशाची नागरिक असून माझे आई वडील ,भाऊ (ओमर फतेही )तिथे स्थाईक आहेत. मला भारतीय कला, नृत्य अतिशय प्रिय होते . टीव्ही ,यूट्यूबवर मी भारतीय क्लासिकल डान्स , बॉलिवूड डान्स त्यात जीव गुंतल्याप्रमाणे तासन तास पाहत असे . क्लासिकल भारतीय डान्स शिकण्याची संधी मला मिळाली नाही, मग मी हिप हॉप , बेली डान्स हे नृत्य प्रकार शिकून घेतले. . माझ्याकडे सध्या अनेक फिल्म्स आहेत ज्यात माझी भूमिका आहे , परफॉर्मन्स असेल . सध्या माझं नाव ,माझं अस्तिव निर्माण झालं असलं तरी हे स्थान निर्माण करणं माझ्यासाठी महाकर्मकठीण होतं . भारतात आल्यावर मला माझ्या राहण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर जागा शोधायची होती . एनआरआय , त्यातून सिंगल युवतींना इथे जागा मिळणं कठीणच होतं . ट्रायल एन्ड एरर करता करता वांद्र्याला राहण्यासाठी एक फ्लॅट मिळाला . एक महत्वाचा प्रश्न निकालात निघाल्यावर माझ्यापुढे अनेक महत्वपूर्ण कामांची यादी होती ,त्यावर मला काम करायचे होते, त्याशिवाय गत्यंतर नव्हते ..

माझ्या देशात मी डान्स शिकले तर तिथेच राहून डान्ससंबंधी करियर मला करता आलं असतं . पण अभिनेत्री माधुरी दीक्षितला तिच्या अनेक फिल्मी नृत्यांमध्ये तिच्या डान्स परफॉर्मन्स-तिच्या स्टाईलवर , सेन्शुअस पण ओब्सीन नाही अशा डोळे दिपवणाऱ्या डान्समध्ये माधुरीला पाहून मी भारतात येण्याचा निर्धार केला. देवदास ‘सिनेमातील तिची नृत्यं म्हणजे डोळे दिपवणारी आहेत तिला एकदा तरी भेटावं , तिच्यातील ऊर्जा पाहावी असं वाटायचं . आश्चर्य म्हणजे झलक दिखला जा ‘शो मध्ये मला माधुरीसमोर कॉन्टेस्टन्ट म्हणून नृत्याची संधी मिळाली आणि मी धन्य झाले ! सेटवर कसं पॉजिटीव्ह असावं , स्पर्धकांना सतत हसत प्रोत्साहित करण्याची माधुरीची हातोटी हा गुण तिच्याकडून शिकले . माझ्या मुंबईच्या वास्तव्यात मला बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीची काहीच माहिती नव्हती. मला अभिनयात एक संधी द्या असं मी कुणाला सांगणार होते ? मी कुठलाही एक्टिंग कोर्स केला नव्हता . भारतीय हिंदी सिनेमासाठी आवश्यक असणारे अभिनय गुण माझ्यात आहेत का ह्याचा मला तरी शोध कसा लागणार होता ? मेरे साथ कोई गॉडफादर /मेंटॉर नहीं था , इस इंडस्ट्री के तौर -तरीकों के बारे में मैं नहीं जानती थी ! नेमकं कुणाला भेटावं ? कुणाला विचारावं ? कास्टिंग डायरेक्टर्स /कास्टिंग एजन्सीज चोख काम करतात का ? अनेक प्रश्नांचा गुंता मनात काहूर माजवत होता ..

मला माझा फिटनेस मेंटेन करायचा होता . घरी पहाटे उठून मी वर्क आऊट करण्यावर भर दिला . जिममध्ये ठराविक वेळ पाळणं आणि जिमची फी देण्याची माझी ऐपत नव्हती ! ऑन लाईन योगा आणि मेडिटेशन नियमाने करत राहिले . या बरोबरीने मी बेसिक स्वयंपाक देखील शिकून घेतला . बाहेरचे अन्न पदार्थ टाळण्याचा माझा आटोकाट प्रयत्न होता . पोट बिघडू नये आणि माझ्या खिशाला परवडावं हे हेतू मला साध्य करायचे होते. भारतीय खिचडी ही मी शिकून घेतलेली पहिली रेसेपी ! शक्यतो दही खिचडी हा माझा आठवडयातील -३-४ वेळा तरी आहार असे .

ह्या संघर्षाच्या दिवसात एकटेपणा, मला काम मिळेल अथवा नाही, असुरक्षितता अशा अनेक भय -भावनांमुळे मी स्ट्रेस्ड असे . मेडिटेशनमुळे मी ह्या सगळ्या नकारात्मक भावनांवर विजय मिळवू शकले . आज सर्वत्र माझा गवगवा डान्सर असा झालेला असला तरी मी भारतात कुणाही डान्स गुरु /मेंटॉर किंवा डान्स क्लासमधून डान्स शिकले नाही .. यु ट्यूबवर मी बॉलिवूड डान्स बघून डान्स शिकले विशेषतः माधुरीचे डान्स ! झलक दिखला जा शोसाठी जेंव्हा कास्टिंग चालली होती माझी निवड झाली . प्रत्येक शोसाठी विविध डान्स परफॉर्मन्स देणे स्पर्धकांना देणे बंधनकारक आहे ! झलक सारख्या शो मध्ये भाग घेतल्याने इथे येणारे डान्स इंस्ट्रक्टटर्स प्रत्येक गाण्यावर डान्स शिकवतात . त्यामुळे बॉलिवूड डान्सिंग मी जे काही शिकले ते ह्याच रियालिटी शोजच्या मंचावर शिकले ! माझ्यासाठी साल्सा हा देखील नवा नृत्यप्रकार होता जो मी मन लावून शिकत गेले .

पुढच्या टप्प्यावर मला डान्स रियालिटी शोजसाठी टीव्हीच्या ऑफर्स येऊ लागल्यात ! ह्या ऑफर्स मी स्वीकाराव्यात का असं मी पुन्हा अनेकांना विचारलं ..कारण मला वाटत होतं मला मार्गदर्शनाची गरज आहे ! मी टीव्हीच्या ऑफर्स मुळीच स्वीकारू नयेत, कारण टीव्ही मीडियावर मी दिसले तर माझी मार्केट व्हॅल्यू ,माझी प्राईस कमी होईल , माझा चेहरा ओव्हर एक्स्पोस्ज्ड होईल त्यामुळे मी त्या ऑफर्स स्वीकारू नयेत असं पुन्हा एकदा अनेकांनी मला सांगितलं .. कुणी मला सल्ला दिला माझे पाय इथे रोवण्यासाठी मला एक हिट बॉलिवूड फिल्मची गरज आहे ! मला माझे स्थान निर्माण करण्यासाठी नामांकित स्टारसोबत फिल्म करावी लागेल… जोपर्यंत माझी ‘पहचान’ मोठ्या स्टारसोबत काम करून होत नाही तोपर्यंत माझी किंमत झिरो असेल ! ऐकावे जनांचे करावे मनाचे ह्या उक्तीनुसार मी सगळ्यांचे ऐकून घेतले पण कुणाचाही सल्ला गांभीर्यांने घेतला नाही .. मी त्यांना फक्त लेट्स सी म्हणाले आणि सगळ्या ऑफर्सचा सहर्ष स्वीकार केला !

करियर घडवण्यासाठी मी कायम रिव्हर्स दिशेने काम करत राहिले ह्याच टीव्हीसाठी मी कसलीही -ओव्हर एक्स्पोज्ड होण्याची पर्वा केली नाही , त्याच टीव्हीच्या सेटवर मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे काम कसे चालते , यहां कैसा बर्ताव होना चाहिए , इंसानो को कैसे परखा जाएं ? हिंदी भाषा जानना /सीखना और बॉलीवुड डान्स मैंने दिल लगाकर सीखे। मी खऱ्या अर्थाने घडले , ट्रेण्ड झाले ते इथेच. टिपकागदाप्रमाणे मी स्वतः सगळं समजत गेले, शिकत गेले. . माझी गुरू मीच झाले .. परदेशातून मी इथे ‘परदेसी’ बनून आले आणि ह्या ४ वर्षात नोरा फतेही एक ‘वॅल्यूड ब्रॅण्ड ‘ झाले , ह्याचे मला समाधान आहे . . अगदी मी आयटम डांन्स देखील केलेत , नाममात्र भूमिका देखील केल्यात ..टीकेनंतर प्रशंसेस पात्र ठरले ! सलमान खानसोबत ‘किक ‘फिल्म देखील केली ..माझी वाटचाल संथ गतीने पण संतोषजनक चालू आहे ..इच्छा तेथे मार्ग आणि ऑनेस्टी इज द पॉलिसी म्हणत मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेत एकटीने वाटचाल केली.. अंधेरे से उजाले की और !

Story img Loader