‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ ही घोषणा आपल्याला चांगलीच माहिती आहे. आणि खरोखरच मुली शिकल्या तर संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं, अशी असंख्य उदाहरणं आपल्या आजूबाजूला रोज दिसतातही. आपल्या देशात अगदी प्राचीन काळापासून मुली चांगल्या उच्च विद्याविभूषीत होत्याच. मध्यंतरीच्या काळात मात्र मुलींच्या शिक्षणाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं. त्यामुळे सरकारला विविध योजना राबवून, स्वयंसेवी संस्थांना लोक जागृतीसाठी अनेक उपक्रम हाती घेऊन स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यावं लागलं. अशा अनेक समाजसुधारक, स्त्री शिक्षणासाठी अविरत झटणाऱ्या धुरीणांच्या प्रयत्नांना यश येत आहे असं म्हणता येईल. कारण नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनास देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच स्त्री साक्षरतेचं प्रमाण बऱ्यापैकी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. हे प्रमाण अर्थातच पूर्ण समाधानकारक नाही, त्यात आपल्याला बरंच काही करायचं बाकी आहे. विशेषत: महिलांचं उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. पण तरीही ‘हेही नसे थोडके’ असं म्हणायला हरकत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा