पराग अस्वस्थ होऊन हॉलमध्येच येरझारा घालत होता. त्याची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि त्यानं अधीरतेने दार उघडलं. अपेक्षित व्यक्ती समोर दिसल्यावर त्याला थोडं हायसं वाटलं.
“ आत्या, अगं किती उशीर लावलास. मी केव्हाची तुझी वाट बघतोय.”
“अरे हो, पण ऑफिसमधून निघून घरी पोहोचायला मला तेवढा वेळ लागणारच. पण एवढ्या तातडीने मला का बोलावलंस? ”
“ अगं तसंच महत्वाचं काम आहे, म्हणून बोलावलंय. बाबांचं डोकं फिरलंय, ते कुणाचंच ऐकायला तयार नाहीत, पण तुझं ते नक्की ऐकतील म्हणून तुला बोलावलं.”
“ दादाला काय झालंय? काल तर तो माझ्याशी फोनवर चांगलं बोलत होता.”
“त्यांना या वयात म्हातारचळ लागलाय, त्या माधुरीताईंसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये त्यांना राहायचंय. तू सांग शोभतं का या वयात हे? काल मी ताईलाही फोन केला होता. ती सुद्धा टेन्शनमध्ये आहे. तूच सांग, ताईच्या सासरकडची मंडळी काय म्हणतील?, माझ्या सासुरवाडीला मी काय उत्तर देणार? उद्या माझा पिंटू मोठा होईल–आबा कुणासोबत राहतात?, हे विचारलं, तर मी काय सांगू? माझी मित्रमंडळी काय म्हणतील? आत्या, अगं हे सगळं मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आता तूच त्यांना समजावून सांग की, हे असलं काहीतरी करून आमची बदनामी करू नका. ते तुझं नक्की ऐकतील.”
“ पराग, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे मला सांगू नकोस, तुझं काय म्हणणं आहे, ते सांग.”
“आत्या, अगं त्यांचं हे वागणं मला अजिबात पटणार नाही. या वयात असं एखाद्या बाईबरोबर राहणं योग्य आहे का? आणि आम्ही त्यांची काळजी घेतोय ना?”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा