यावर्षी ऑगस्ट महिन्यात अमेझॉन प्राईमवर ‘मेड इन हेवन २’ वेबसिरीज प्रदर्शित झाली होती. या सिरीजच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. ‘मेड इन हेवन २’ मध्ये मृणाल ठाकूर, दिया मिर्झा सारखे अनेक कलाकार झळकले. याच सिरीजमधून प्रसिद्धीझोतात आलेली आणखी एक अभिनेत्री म्हणजे त्रिनेत्रा हलदर. त्रिनेत्रा ही पहिली तृतीयपंथी अभिनेत्री आहे जिने नुकताच अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आहे.
हेही वाचा- एकेकाळी केवळ ५० पैशांमध्ये केली चहाची विक्री; आज कमवतात दिवसाला २ लाख रुपये; कोण आहेत….
कोण आहे त्रिनेत्रा हलदर गुम्माराजू?
त्रिनेत्रा हलदर गुम्माराजू हिचा जन्म १७ जून १९९७ साली कर्नाटकातील बंगरुळूमध्ये झाला. लहानपणापासून तिला मुलगा म्हणून वागवण्यात आले. घरातील पहिला मुलगा या भावनेने तिच्या खांद्यावर नकळतपणे अनेक अपेक्षांचे ओझे लादले गेले. जवळपास २० वर्ष तिने मुलगा म्हणून काढली. या काळात तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. अखेर फेब्रुवारी २०२३ मध्ये तिने लिंग-पुष्टीकरण शस्त्रक्रिया करुन घेतली.
त्रिनेत्रा व्यवसायाने डॉक्टर आहे. त्रिनेत्राने कस्तुरबा मेडिकल कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. सुरुवातीला अनेक जणांनी तिला आपल्यात मिसळून घेण्यास नकार दिला. या गोष्टीचा त्रिनेत्राला खूप त्रास व्हायचा मात्र, आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे तिच्यासाठी अनेक गोष्टी सोप्या होत गेल्या.
त्रिनेत्रा डॉक्टर असण्याबरोबच एक सामाजिक कार्यकर्त्या देखील आहे. ती भारतात LGBTQIA द्वारे चालवल्या जाणार्या गटाशी जोडली गेलेली आहे. आरोग्य समस्या, असमानता, शारीरिक विकृती इत्यादींबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोहीमेत त्रिनेत्रा सहभाग घेत असते. याशिवाय तिने अनेक मासिकांसाठी फोटोशूटही केलं आहे.
हेही वाचा- ‘जावई माझा भला!’ महेंद्रसिंग धोनीने बायको अन् सासूलाच बनवले ८०० कोटींच्या कंपनीचे सीईओ
अभिनय क्षेत्रातही पदार्पण
‘मेड इन हेवन २’ या वेबसिरीजमध्येही त्रिनेत्रा झळकली आहे. एका मुलाखतीत त्रिनेत्राने तिला ही भूमिका कशी मिळाली याचा खुलासा केला होता. त्रिनेत्रा म्हणालेली, “मी रुग्णालयातील इंटर्नशिपच्या सुरुवातीला ‘मेड इन हेवन २’ साठी ऑडिशन दिली होती. त्यावेळेस इंडस्ट्रीत माझा कोणाशीही संबंध नव्हता. पण जेव्हा मी या वेबसिरीजमधील माझी भूमिका बघितली तेव्हा मला विश्वास बसत नव्हता की मी हे करु शकते. मला अभिनय क्षेत्रात लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला माहित नाही की माझ्या या भूमिकेबाबत किंवा अभिनयाबाबत काय प्रतिक्रिया येतील पण मी बेवसिरिजसाठी ऑडिशन दिली याचा मला गर्व आहे.”
हेही वाचा- एकेकाळी ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम; आज अमेरीकेतील अब्जाधीश कंपनीच्या सीईओ
त्रिनेत्रा पुढे म्हणाली, “तृतीयपंथी या महिलाच आहेत. त्यांना इतर महिलांना मिळते तशी चांगली वागणूक मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु तृतीयपंथी व्यक्तींना त्यांच्याच कुटुंबाकडून वाईट वागणूक मिळते. त्यांना लवकर स्विकारले जात नाही त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की, तृतीयपंथी व्यक्तींनाही इतरांसारखे प्रेम, मान आणि सन्नमान मिळणे गरजेचे आहे.”