माधुरी ताम्हणे

पितृसमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. ते थेट काही शिकवत नसत, पण त्यांच्या अपेक्षांमधून मला कार्याची नेमकी दिशा कळत गेली. उदाहरणार्थ- मी पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘‘तुला कोणतं काम करायला आवडेल?’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘मला खेडोपाड्यातल्या महिलांसाठी काम करायचं आहे.’’ त्यांनी इतकं छान सांगितलं. ते म्हणाले, ‘‘ते काम तर तू करशीलच. पण तू तीर्थक्षेत्री जाणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा आणि सुरक्षितता मिळवून दे!’’ त्यांनी मला माझ्या कार्याची नेमकी दिशा दिली. ते प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे राहत.

Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
MNS Chief Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..
Amit Thackeray and Uddhav Thackeray
Amit Thackeray on Uddhav Thackeray : “… अन् दोन भाऊ एकत्र येण्याचा विचार माझ्यासाठी संपला”, अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
maharashtra poll 2024 ubt chief uddhav thackeray finally managed to convince sudhir salvi
शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
amit thackeray
“…तेव्हा माझ्या पोटात गोळा आला”; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंची टीका; म्हणाले, “आज तीच वेळ…”

संत तुकडोजी महाराजांचं एक वचन आहे, ‘आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना!.’ मला नेहमी वाटतं, सामाजिक जीवनात मी जे काम केलं त्यातून मी घडले. समाजाचे मापदंड जरी वेगवेगळे असले, तरी घडण्याचं आणि घडवण्याचं काम काही वेळा आपोआप होतं तर काही वेळा जाणीवपूर्वक होतं.

हेही वाचा: पार्टी अभी बाकी है! ऑफिस पार्टीज एंजॉय करायची आहे? मग वाचा या टीप्स

विद्यार्थी चळवळीत असल्यापासून मी ज्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला, ती आंदोलनच मला गुरुस्थानी आहेत. महागाई विरोधातलं आंदोलन, विषमतेविरुद्ध अथवा कॅपिटेशन फी विरुद्धचं आंदोलन, युवक क्रांती दल व आंबेडकर चळवळीतील माझा सहभाग या सर्व सामाजिक कार्यातून मी घडत गेले. मी पोतदार आयुर्वेदिक कॉलेजमधून डॉक्टर झाले. त्यावेळी रुग्णांशी- विशेषतः आदिवासी रुग्णांशी कसा संवाद साधायचा व कोणत्या रुग्णांना कशा प्रकारच्या औषधोपचारांची गरज असते हे तिथल्या शिक्षकांनी अचूक शिकवलं. त्याचा उपयोग भावी काळातील राजकीय कार्यात मानवी संबंधांतील संवादकौशल्य विकसित करण्यासाठी खूपच झाला.

राजकीय व समाजसेवेच्या क्षेत्रात अनेक भलेबुरे अनुभव येत असतात. त्यामुळे माणूस एक तर कडवट होतो अथवा उपरोधिक वागू लागतो. माझ्या बाबतीत या दोन्हींपासून मला कोणी वाचवलं असेल तर नंदादीप विद्यालयातील साठे सरांनी! त्यांनी इंग्रजी साहित्य व कला प्रकारांची विद्यार्थिदशेत इतकी छान ओळख करून दिली की, त्यातून जाणवलं- जग खूप मोठं आहे. विशाल आहे. या अद्भुत जगाचा आस्वाद घेण्यासाठी, जीवन समृद्ध करण्यासाठी ज्ञानाइतकच ललित कला, साहित्य-संपदा यांचं स्थान फार मोठं आहे. साठेसर कवितांचं वाचन, निरूपण आणि समीक्षा एवढ्या कलात्मकतेने करत की त्यातून जीवनातील प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य स्थळं टिपण्याची नजर लाभली. धकाधकीच्या राजकीय जीवनात ऋजुता टिकवण्याचं, भावनांची कोवळीक जपण्याचं काम त्यातून नकळत झालं असं मला वाटतं.

आयुष्याच्या वाटचालीत मला मोलाचं मार्गदर्शन केलं ते माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी! त्यांचा माझा परिचय ऐंशीच्या दशकात झाला. ते आमच्या संस्थेमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण घेत. ‘स्त्री-आधार केंद्रा’च्या अधिवेशनाला हजेरी लावत. त्या काळात जे कायदे झाले, त्या कायद्यांचा अर्थ, त्यामधून काय साध्य होऊ शकतं, कायद्यांच्या मर्यादा या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन ते मला करत. त्यांनी बलात्कारविरोधी, कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्याचं सर्वेक्षण करून स्त्रीविषयक कायद्यांवर अनेक पुस्तकं लिहिली. त्यातून आम्हाला कायद्याची समज येत गेली. प्रत्यक्ष कार्यात त्या ज्ञानाचा उपयोगही झाला. चंद्रशेखर धर्माधिकारी ज्ञानी तर होतेच, पण न्यायीसुद्धा होते. समाजात कधी कोणी आमच्यावर गैर लागू टीका करत असेल, तर ते संबंधितांना बोलवून समज देत. मला एक प्रसंग आठवतो. कोल्हापूरला कोठेवाडीत जी बलात्काराची घटना घडली, त्या विरुद्ध आवाज उठवताना मला प्रत्येक पावलावर अडचण येत होती. पोलीस आवश्यक ते सहकार्य करत नव्हते. त्यावेळी या खटल्यात कोणती कायदेशीर कारवाई करता येईल ते धर्माधिकारीसाहेब आम्हाला सांगत असत.

हेही वाचा: आहारवेद : मासिक पाळीतील वेदनांवर गुणकारी केळफूल

एकदा तर कोर्टात आपल्या बाजूने निवाडा होणार असं वाटत असतानाच वृत्तपत्रात एक चुकीची बातमी आली. तिचं खंडन करणं कठीण, अशी परिस्थिती असताना त्यांनी अचूक जुनी जजमेंट आम्हाला काढून दिली. मी त्यांची पत्रकं छापून वाटताच, न्यायाचं पारडं आमच्या महिलांच्या बाजूने झुकलं. महिलांसाठी काम करताना, पीडित महिलांना कायद्याची मदत मिळवून देणं, हे केवळ त्यांच्यामुळे मला करता आलं. कायदा व सुव्यवस्थेबद्दल काम करताना केवळ पोलिसांवर आरोप करण्यापेक्षा कायद्याचा तपशील समजून बोललं पाहिजे हे त्यांनीच मला शिकवलं. त्यांच्या मृत्युपूर्वी आम्ही एक समिती स्थापन केली होती. त्यात धर्माधिकारी साहेब व माझ्यासह अनेक पोलीस अधिकारी होते. या समितीने पोलीस दलात कोणते बदल करायला हवेत यावर १४० सूचना मांडल्या होत्या. मी तो अहवाल विधिमंडळात सादर केला. त्यातील ११० सूचना स्वीकारल्याचं तत्कालीन गृहमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यांच्या निधनाने माझ्या सार्वजनिक जीवनात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी मला वेळोवेळी जे कायद्याचं ज्ञान दिलं, त्याचा उपयोग मी समाजासाठी करून एक प्रकारे त्यांचं कार्य पुढे नेत आहे.

समाजासाठी असं कार्य करण्याची मूळ प्रेरणा माझी आई लतिका गोऱ्हे आणि वडील दिवाकर गोऱ्हे यांची! माझ्या आईचं एक वाक्य होतं, ‘माणूस गोड नसतो. त्याचं काम गोड असतं. आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आपल्या कामातूनच होत असते. ते जेवढं तळमळीने व प्रेमाने करशील तेवढं तुला त्याचं चांगलं फळ मिळत जाईल!’’ सामाजिक कामाची मला शाळेपासूनच खूप आवड होती. माझ्या या आवडीमुळे आणि सर्जकतेमुळे मी समवयस्क मुलांपेक्षा मला स्वतःला वेगळी वाटायची. त्यांच्याशी बोलताना मतभिन्नता जाणवे आणि मी थोडी खट्टू होई. अशा वेळी आई मला छान समजवत असे की, आपण वेगळा विचार करतो म्हणजे चुकीचे असतो असं नाही. तुझं वेगळेपण तू जप. तिच्या अशा सपोर्टमुळेच कदाचित मी राजकारणात प्रवेश केला. यश मिळवलं.

माझे वडील शास्त्रज्ञ! त्यांनी देश-परदेशातल्या अनेक स्त्री संशोधकांबरोबर काम केलं होतं. त्यामुळे चौकटीबद्ध विचार न करता ते मला सांगत की कोणत्याही विषयाचा आपला अभ्यास असेल आणि आपल्यात धाडस असेल, तर जग जरी आपल्या विरुद्ध गेलं तरी आपण आपलं कार्य यशस्वी करू शकतो. आपल्याकडे संवादकौशल्य असेल तर अनौपचारिक चर्चांमधूनही आपण जग जिंकू शकतो. माझा शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय असो वा आमदारकीची निवडणूक असो ते सातत्याने सांगत, ‘‘तू पक्षश्रेष्ठींवर विश्वास ठेव. तुझ्या कार्याची ते नक्की दखल घेतील!’’ खरं सांगते, एका मध्यमवर्गीय घरातल्या स्त्रीने विधान परिषदेत निवडून जाणं, उपसभापतीपदापर्यंत मजल मारणं ही खरंच सोपी गोष्ट नाही. त्याचं श्रेय चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या माझ्या आई-वडिलांना जातं.

पितृसमान हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं माझ्या आयुष्यात फार मोठं स्थान आहे. ते थेट काही शिकवत नसत, पण त्यांच्या अपेक्षांमधून मला कार्याची नेमकी दिशा कळत गेली. उदाहरणार्थ- मी पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी मला विचारलं, ‘‘तुला कोणतं काम करायला आवडेल?’’ मी त्यांना सांगितलं, ‘‘मला खेडोपाड्यातल्या महिलांसाठी काम करायचं आहे.’’ त्यांनी इतकं छान सांगितलं. ते म्हणाले, ‘‘ते काम तर तू करशीलच. पण तू तीर्थक्षेत्री जाणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा आणि सुरक्षितता मिळवून दे!’’ त्यांनी मला माझ्या कार्याची नेमकी दिशा दिली. ते प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी खंबीरपणे पाठीशी उभे राहत. मला आठवतं, एकदा शिर्डीत मोठा गोंधळ चालू होता. पोलिसांचा गोळीबार सुरू झाला. मी तातडीने बाळासाहेबांना फोन लावला. त्यांनी फोनवरून अनेक उपयुक्त सूचना केल्या. ते मला म्हणाले, ‘‘तू गावकऱ्यांची बैठक घे. त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घे आणि पुढे जा.’’ बाळासाहेबांचं माझ्या कामावर व विधान भवनातील वक्तृत्वावर बारकाईने लक्ष असे. माझ्या चांगल्या कामाची पावती ते दिलखुलासपणे देत. त्यांनी हेही शिकवलं की, पक्ष आपला आहे असं समजून एकनिष्ठपणे पक्षात काम करायचं. मी आजवर बाळासाहेबांचा प्रत्येक शब्द शिरोधार्य मानला आहे.

मेंटॉरिंग म्हणजे माझ्या दृष्टीने फक्त मार्गदर्शन नव्हे, तर अप्रत्यक्ष मदतसुद्धा! ते कधी दृश्य स्वरूपात असतं तर कधी अदृश्य स्वरूपातही असतं. उद्धवसाहेबांच मेंटॉरिंग असं अदृश्य स्वरूपात असतं. ते मदत करतात. पण तसं जाणवूनही देत नाहीत. उदाहरणार्थ, आम्ही एखाद्या अगदी आडगावातल्या सभेला वा कार्यक्रमाला जात असलो, तर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना आम्हाला सहकार्य करण्याच्या त्यांच्या आधीच सूचना गेलेल्या असतात. विधान परिषदेत तर मला आठवतं की नितीन गडकरीसाहेबांना उद्धव साहेबांनी आधीच निरोप दिलेला असे की, नीलम गोऱ्हे यांना आज भाषणाची सुरुवात करायला सांगावं. त्यानुसार विरोधी पक्षनेते म्हणून गडकरीसाहेब चार वाक्य बोलून भाषणाची सूत्रं माझ्याकडे सुपूर्द करत. विधिमंडळात अशी संधी तुम्हाला मिळणं यातूनच तुमचं सामाजिक कार्य अधिक अर्थपूर्ण, फलप्रद आणि उपयुक्त होतं.

हेही वाचा: फिरूनी नवी जन्मेन मी…

उद्धवजी हे देशात परदेशात कुठेही असले तरी अप्रत्यक्षपणे व अबोलपणे सहकार्य करत असतात. त्यातून मी एक बोध घेतला की आपण फक्त स्वतः यशस्वी होण्याचं ध्येय न बाळगता इतरांना अप्रत्यक्षपणे मदत केली तर त्यांनाही अधिक काम करण्याची उमेद मिळते. करोना काळात मी याच भावनेतून जनसेवा केली.

अखेर ज्योतीने ज्योत उजळते, तेव्हाच मनामनात तेजाचा प्रकाश पसरतो हेच सत्य आहे!
madhuri.m.tamhane@gmail.com