“रागिणी, तुझी तब्येत बरी नाहीये, तर आज तन्वीला आणायला जाऊ नकोस, तिला ऑटोने यायला सांग.” सुधाकरराव सूनबाईंना समजावून सांगत होते, पण रागिणीला ते पटतं नव्हतं.

“नाही बाबा, मीच जाते, आता थोडं बरं वाटतंय मला. हल्ली मुलींची किती फसवणूक होते हे आपण ऐकतोय ना? ती १२ वर्षांची, आडनिड्या वयाची पोर आहे. एकटीला कुठे पाठवायला भीतीच वाटते.”

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Efforts in Thane district, voter turnout
मतदान केल्याची शाई दाखवा, खरेदीवर सवलत मिळवा ! व्यापाऱ्यांकडून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन
Loksatta chaturang article Free of mobile mind result Counselor
सांदीत सापडलेले…! अवधान
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Loksatta Chatura How to identify children racket filling
मुलांचे ‘रॅकेट फिलिंग’ ओळखा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

“अगं,पण आता कुठं तुझा ताप उतरतोय. पुन्हा ताप वाढला तर काय करायचं? मलाही डोळ्यानं नीट दिसत नाही. नाहीतर मी गेलो असतो. तुझी तब्येत महत्वाची आहे. तू आजारी पडलीस तर घरचे सर्व व्यवहार ठप्प होतील. तुषारला घराकडं बघायला वेळ नसतो. तुला तुझं ऑफिस बघून घरचंही सगळं एकटीला बघावं लागतं. तन्वीची शाळा, क्लासेस सगळं तूच सांभाळतेस. तुझी तब्येत तुला सांभाळायला हवी ना?”

“बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी सर्व बघेन, तिचा क्लास संपायला अजून वेळ आहे. तोपर्यंत मी विश्रांती घेते.”

रागिणीची धावपळ सुधाकरराव रोज पाहात होते. तन्वीचं सगळं तिच करायची. सुधाकररवांना कधी कधी आताच्या मुलांचा हेवा वाटायचा. आताच्या मुलांना त्यांच्या आवडीनिवडी जपणारी ‘मॉम’ मिळाली आहे, मागण्यापूर्वीच सर्व गोष्टी मिळतात, घरातील कामात मदत सोडाच, त्यांचं स्वतःचंही त्यांना काही करावंच लागत नाही.

सुधाकरराव कितीतरी वेळा रागिणीला म्हणाले, ‘सुनबाई, आता तन्वीला घरातील छोटी-छोटी कामं सांगत जा. जेवणाची तयारी करणं, मागील गोष्टी आवरणं, भाजी निवडून देणं इत्यादी किरकोळ कामात तिची मदत घेत जा, पण त्यावर तिचं म्हणणं असायचं, ‘बाबा, अजून ती लहान आहे, आणि मुलींना लग्न झाल्यावर सगळं करावंच लागतं. उगाच आत्तापासून कामात तिला गुंतवायला नको.’ त्यामुळं आता त्यांनी त्याबाबतीत काही बोलणंच सोडून दिलं होतं. घरात कोणतेही वाद नकोत, म्हणून ते शांतच राहायचे.

हेही वाचा… पत्नीला गुरासारखे, वेठबिगारासारखे वागवता येणार नाही…

तन्वीचा क्लास संपला होता, ती आईला फोन करीत होती, पण रागिणीला झोप लागली होती. औषधं घेतल्यानं तिला ग्लानी आली होती. सुधाकररावांनी तन्वीचा फोन घेतला आणि आई आजारी असल्याने, आजच्या दिवस एकटीला यायला सांगितलं. एकट्यानं कसं जायचं? म्हणून ती तिथंच रडत बसली. आजोबांनी पुन्हा फोन केल्यावर,‘मला खूप भीती वाटतेय.’ असं तिनं सांगितलं. शेवटी तिचं ‘लाईव्ह लोकेशन’मागून सुधारकररावांनी तिच्यासाठी कॅब पाठवली आणि तेव्हा ती घरात पोहोचली.

ती घरात आल्यावर आजोबांनी तिला स्वतःच्या हातानं जेवण वाढून घ्यायला सांगितलं, आणि होमवर्क करण्यासाठी बसवलं. काही वेळानं रागिणीला जाग आली आणि तन्वीला घरात बघून तिला आश्चर्य वाटलं. तिला खूपच अपराधी वाटायला लागलं. ‘‘सॉरी तन्वी. मला झोप लागली, मी येऊ शकले नाही, पण तू घरी कशी आलीस?”

तन्वीनं सर्व हकीकत आईला सांगितली. तेव्हा सुधाकररावांकडे बघून ती म्हणाली, “थँक्यू बाबा. आज तुम्ही घरात होतात, म्हणून सगळं सांभाळून घेतलं, नाहीतर तन्वीला एकटीला काहीच सुचलं नसतं. एकटीच कुठंतरी गेली असती तर?”

हेही वाचा… बुद्धिबळातही स्त्रियांची उपेक्षाच!

रागिणीच्या मनात आणखीही काही विचार आले आणि तिच्या अंगावर सरसरून काटा आला. रागिणीला समजवायची हीच वेळ आहे, हे जाणून सुधाकरराव तिला म्हणाले, “रागिणी, तू तन्वीसाठी सगळी धडपड करतेस, वाट्टेल ते कष्ट घेण्याची तयारी दाखवतेस. तिच्यासाठी हिरकणी बनण्याचा प्रयत्न करतेस, पण त्यामुळं तिला स्वतःला काहीच करावं लागतं नाही, कधी अडचणीची वेळ आली तर काय करावं, याचा निर्णय घेण्याची क्षमता तिच्याकडे नाही. त्यामुळं आज ऑटो करून घरी कसं यायचं हेही तिला समजत नव्हतं. नुसती भिती त्यांच्या डोक्यात भरवून उपयोगी नाही. अशा वेळी नेमकं काय करायचं याची त्यांना माहिती करून द्यायला हवी. मुलांना अडचणी येऊ देत. त्यातूनच ते शिकत असतात. अडचणींच्या वेळी कसं वागायचं हे शिकवणारे कोणतेही क्लासेस नसतात, अनुभवातूनच मुलं शिकत असतात. ‘मुलीसाठी मी किती करते, याचं तुला समाधान मिळतं, पण त्यामुळं आपण आपल्याच मुलीला परावलंबी करत आहोत, हे तुझ्या लक्षात येत नाही. बसमधून जाता येता येणारे अनुभव तिलाही येऊ देत, स्वतः सायकल चालवत क्लासला जाण्याचे कष्ट तिलाही घेऊ देत. घरातील मोठ्या माणसांची सेवा करायची असते, अडचणीच्या वेळेस आईला किचनमध्येही मदत करायची असते, हे तिलाही शिकू देत. जीवनकौशल्याचे धडे तिला घरातूनच मिळायला हवेत.”

सुधाकररावांचं म्हणणं आज रागिणीला पटलं होतं, आतापर्यंत आपण तन्वीला कधीही एकटं सोडलं नाही.पण आपण सोबत नसतानाही तिला तिचा निर्णय घेता येणं गरजेचं आहे, प्रत्येक क्षणी आपण तिच्या सोबत असू शकणार नाही, अडचणीचे प्रसंग तिच्यावरही येऊ शकतात, तेव्हा रडत न बसता तिला तिचा मार्ग काढता यायला हवा, हे आजच्या अनुभवानंतर तिच्या लक्षात आलं होतं. तन्वीला स्वावलंबी करून घरातूनच जीवनसंस्कार मिळणं आवश्यक आहे, हे तिच्या लक्षात आलं. आता पहिला बदल स्वतःमध्येच करायचा असं तिनं मनोमन ठरवलं.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)