गीता प्रसाद

खूप काही घडत आलंय तिथे… वर्नुषावर्षं… अनेक निर्णय तिथे घेतले गेले. अनेक व्यवहार तिथेच घडले. इतकंच काय, पण अनेक नाती तिथेच घट्ट झाली. वाफाळत्या कॉफीला साक्षी ठेवून. पण तिथेच एक शोकांतिकाही घडली. डोईवर ७,००० कोटी रुपयांचं कर्ज आलं आणि त्याचं पर्यवसान त्याच्या निर्मात्याच्या, व्ही. जी. सिद्धार्थ हेगडे यांच्या आत्महत्येत झालं. ती जागा म्हणजे ‘अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी’ ही टॅगलाइन घेऊन रुबाबात मिरवणारी ‘सीसीडी’. पण पुढे आणखीही काही घडणार होतं तिथे. काळ जात होता. ‘सीसीडी’चं भवितव्य अंधारात असताना सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी त्याची मदार आपल्या खांद्यावर घेतली. आज त्यांनी ते सारं कर्ज फेडत तर आणलंच आहेच, पण ‘सीसीडी’ला पुनर्जन्मही दिलाय… जणू ‘लॉट कॅन हॅपन फॉर कॉफी’.

N 11 vulture released from Tadoba project reached Tamil Nadu after traveling 4000 kms but was electrocuted and died
चार हजार कि.मी. उड्डाण, पाच राज्यांतून प्रवास; तामिळनाडूत घेतला अखेरचा श्वास…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
AAP MLA Gurpreet Gogi
पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, लुधियाना डीएमसी रुग्णालयात प्राणज्योत मालवली
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या
Loksatta vyaktivedh Rustam Soonawala Polythene IUD Contraceptive
व्यक्तिवेध: डॉ. रुस्तम सूनावाला

कॉफी उत्पादनाच्या जागतिक चढाओढीत भारतीय ब्रॅड आणायच्या उद्देशानं सिद्धार्थ यांनी ‘कॅफे कॉफी डे’ ही चेन सुरु केली. ‘कॉफी डे एन्टरप्राइसेस लिमिडेट’(सीडीईएल) सुरू केली. कॉफी बियांच्या उत्पादनासाठी हजारो एकर कॉफीचे मळे विकत घेतले आणि देशभरात ‘कॅफे कॉफी डे’ची अर्थात ‘सीसीडी’ची आऊटलेटस् सुरू झाली. बंगळूरु इथे ११ जुलै १९९६ पासून (म्हणजे बरोबर २७ वर्षापूर्वी) छोट्या, छान, सुबक कॉफी पार्लरमध्ये एक कॉफी घेऊन तासनतास बसण्याची सोय झाली. हळूहळू अनेकांसाठी तो अड्डाच झाला. कॉफी किंवा स्नॅक्स थोड्या चढ्या किमतीतच विकले जात असल्यानं गर्दी कमी असली तरी फायदा होतच होता, पण त्यामुळे अनेकजण निवांतपण शोधायला, शांततेत काम करायला ‘सीसीडी’त येऊ लागले. हाताशी लॅपटॉप आणि समोर वाफाळता कप. खूप काही घडून जायचं त्या काळात. साहजिकच त्याची लोकप्रियता वाढू लागली. मग मित्रांशी गप्पा मारायला तर कधी बिझनेस मीटिंगसाठी ‘सीसीडी’ अनेकांना आपलं वाटू लागलं. विशेषत: तरुणाईच्या मनात ‘सीसीडी’नं आपलं स्थान निर्माण केलं. ‘सीसीडी’ देशभरात पसरू लागलं. फायदा होऊ लागला. हळूहळू सिद्धार्थ यांनी इतर व्यवसायातही आपलं यश अजमावून पाहायला सुरुवात केली. पण त्याच वेळी अपयशही दिसू लागलं. कर्ज वाढू लागलं. त्यात काही कोटी रुपयांच्या करचोरीचा आरोप झाला. गुंतवणूकदार मागे लागले. होता होता ७,००० कोटींचं कर्ज झालं आणि मग एका क्षणी आपल्याला हे फेडता येणार नाही, या विचारानं त्यांना इतकं जखडलं, की त्यांनी नेत्रावती नदीत स्वत:ला झोकून दिलं. आणि त्यांच्याबरोबर ‘सीसीडी’चं भवितव्यही अंधारात बुडालं. पण त्यास तारलं त्यांच्या पत्नी मालविका यांनी.

हेही वाचा… प्रीती अघालयम… संचालक, ‘आयआयटी झांझिबार’!

२९ जुलै २०१९ मध्ये, म्हणजे बरोबर ३ वर्षांपूर्वी ही दु:खद घटना घडली आणि त्यानंतर डिसेंबर २०२० मध्ये मालविका ‘सीडीईएल’च्या सीईओ झाल्या. कर्नाटक विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या मालविका या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या कन्या आहेत. प्रचंड मेहनत आणि काही कठोर निर्णय घेत मालविका यांनी अवघ्या २ वर्षांत- जुलै २०२३ पर्यंत सारं कर्ज फेडत आणलं. खरं तर पतीचा अचानक झालेला मृत्यू स्वीकारणं हेच त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान होतं, मात्र सिद्धार्थ यांचं या भारतीय ब्रँडला जगभर नेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना उभं राहणं गरजेचं होतं. शिवाय आपल्या दोन मुलांची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती. परिस्थिती खूपच आव्हानात्मक होती, कारण त्याच काळात करोनाचं थैमान सुरू झालं. त्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. आपल्या सिग्नेचर उत्पादनांच्या किमती वाढवायच्या नाहीत आणि दुसरा- नफा न कमवणारी आऊटलेटस् बंद करण्याचा.

हेही वाचा… ‘माणूस’ नसलेली ‘बाई’ टीव्हीवर बातम्या वाचते, तेव्हा…

उपलब्ध माहितीनुसार २०१९ मध्ये साधारण ‘सीसीडी’ची १,७५२ आऊटलेटस् होती ती त्यांनी २०२३ मध्ये ४६९ इतपत कमी केली. शिवाय वेगवेगळ्या आयटी पार्कमधील जवळजवळ ३६ हजार कॉफी वेन्डिग मशिन्सही बंद केली. याशिवाय अधिकाधिक गुंतवणूकदारांना कंपनीकडे आकर्षित करण्याचाही चांगला फायदा झाला. पैसे मिळवत कर्ज फेडण्याची आणखी एक महत्त्वाची कृती त्यांनी केली, ती म्हणजे आपल्या हजारो एकर कॉफी मळ्यातील उच्च दर्जांच्या अराबिका कॉफी बियांची निर्यात. त्यानं त्यांना चांगलाच हात दिला. त्याचमुळे मालविका यांनी ७,००० कोटी रुपयांचं कर्ज आता फक्त ४६५ कोटी रुपयांपर्यंत आणून ठेवलंय.

पूर्ण कर्ज फेडणं सहज सोपं नाहीच त्याला विलंब होत असला तरी कठोर, पण योग्य निर्णय घेत मालविका हे कर्ज लवकरच शून्यापर्यंत आणतीलच, पण तो उद्योग अधिक वाढवत बंद केलेली ‘सीसीडी’ आऊटलेटसही पुन्हा सुरू करतील यात शंका दिसत नाही. ती सुरू राहायला हवीत… कारण, अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी!

lokwomen.loksatta@gmail,com

Story img Loader