महिला शास्त्रज्ञांच्या विश्वात स्लोडोस्का ऊर्फ मेरी क्युरी यांचे नाव घेतल्याशिवाय हे विश्व पूर्ण होणारच नाही. पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्रातील पायाभूत संशोधनामुळे वॉर्साच्या शास्त्रज्ञ मेरी क्युरी यांना दोन वेळा नोबेल पारितोषिक देत गौरवण्यात आले. यामुळे दोन वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या एकमेव महिला शास्त्रज्ञ आहेत.

त्यांच्या रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात केलेल्या कामगिरीची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्कारांच्या प्रीत्यर्थ २०११ हे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून साजरे झाले. त्यामुळे त्यांचे कार्य किती महान होते याची प्रचिती येईल. यामुळे त्यांचे प्रेरणादायी जीवनकार्य समजून घेऊ..

FTII student short film, FTII student short film Oscar,
‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्याचा लघुपट ऑस्करच्या स्पर्धेत
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
madhuri dixit reveals secret of happy marriage
भावामुळे ओळख, कॅलिफोर्नियात लग्न अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरी दीक्षितने सांगितलं सुखी संसाराचं गुपित, म्हणाली…
Pam Kaur appointed as Chief Financial Officer at Hong Kong and Shanghai Banking Corporation
पाम कौर… ‘एचएसबीसी’च्या सीएफओ
black hole triple system
शास्त्रज्ञांनी लावला पहिल्या ‘ब्लॅक होल ट्रिपल’चा शोध; यातून नेमकं काय उलगडणार?
Chahatt Khanna New Home
दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
Narendra Jichkar application, Nagpur,
नागपूर : नरेंद्र जिचकारांच्या अर्जावरील आक्षेप फेटाळला

मेरी यांचा जन्म १९६७ साली वॉर्सा शहरात झाला. यावेळी हे शहर रशियन अधिपत्याखाली होते. वयाच्या २४ व्या वर्षांपर्यंत त्या तिथेच राहिल्या. यानंतर १८११ मध्ये त्या पॅरिसमध्ये शिक्षणाकरिता गेल्या आणि तिथे उच्च शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर मेरी क्युरी यांनी पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर म्हणून नोकरी केली. यावेळी १८९१ मध्ये त्यांची ओळख स्कूल ऑफ फिजिक्समधील प्रोफेसर पेरी क्युरी यांच्याशी झाली आणि वर्षभरात दोघांनी लग्न केले. यादरम्यान सोरबोन येथील भौतिकशास्त्र प्रयोगशाळेच्या प्रमुख म्हणून तिने तिच्या पतीच्या जागी १९०३ मध्ये डॉक्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली. पण १९०६ मध्ये पिरे क्युरी यांचे निधन झाले. पिरे यांच्या मृत्यू पश्चात तिने सायन्सेस फॅकल्टीमध्ये जनरल फिजिक्सच्या प्रोफेसर म्हणून काम केले. हे पद एखाद्या महिलेने पहिल्यांदा भूषवले होते.

यानंतर १९१४ मध्ये स्थापन झालेल्या पॅरिस विद्यापीठाच्या रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये क्युरी प्रयोगशाळेच्या संचालकपदीही त्यांची नियुक्ती झाली.

मेरी क्युरी यांनी सुरुवातीला पतीसह अनेक कठीण परिस्थितीचा सामना करत संशोधनास सुरुवात केली. यावेळी प्रयोगशाळेची व्यवस्थाही खूप खराब होती. तरीही दोघांनी झोकून देत काम केले. यावेळी दोघांना उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट सोसावे लागले. १८९६ मध्ये हेन्री बेकरेल यांनी युरेनियम क्षारचा शोध लावला. यावेळी मेरी क्युरी यांनी त्यांच्या संशोधनासाठी युरेनियम किरणांचा अभ्यास करण्याचे ठरवले. यातून पोलोनियम आणि रेडियम मूलद्रव्ये अस्तित्वात आली. मेरी क्यूरी यांनी रेडियम वेगळी करण्याची पद्धत विकसित केली. ज्यामुळे त्याचे गुणधर्मांवर आणि उपचारात्मक गुणधर्मावर काळजीपूर्वक अभ्यास करण्यास मदत झाली.

मेरी क्युरी यांनी पहिल्या महायुद्धात रेडियमच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन दिले, यानंतर त्यांनी मुलगी इरेन हिच्या मदतीने रेडियमचा उपचारात्मक वापर कसा करता येईल हे शोधण्यासाठी स्वत:ला वैयक्तिकरित्या झोकून दिले.

त्यांनी आयुष्यभर विज्ञानाबद्दलचा उत्साह टिकवून ठेवला आणि तिच्या मूळ शहरात रेडिओअॅक्टिव्हिटी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी बरेच काम केले, यादरम्यान १९२९ मध्ये युनायटेड स्टेट्सचे राष्ट्राध्यक्ष हूवर यांनी त्यांना रेडियम खरेदी करण्यासाठी अमेरिकन विज्ञानप्रेमींनी दान केलेले ५० हजार डॉलर भेट म्हणून देत ते वॉर्सामधील प्रयोगशाळेसाठी वापरण्यास सांगितले.

शांत, प्रतिष्ठित आणि नम्र स्वभावाच्या मेरी क्युरी यांची जगभरातील शास्त्रज्ञांकडून सन्मान आणि प्रशंसा करण्यात आली. १९११ पासून ते मृत्यूपर्यंत त्या Conseil du Physique Solvay च्या सदस्य होत्या आणि १९२२ पासून त्या लीग ऑफ नेशन्सच्या बौद्धिक सहकार्य समितीची सदस्य राहिल्या. त्यांचे कार्य वैज्ञानिक जर्नल्समधील असंख्य पेपर्समध्ये नोंदवले गेले. याशिवाय त्या रेचेर्चेस सुर लेस सब्सटेंस रेडिओअॅक्टिव्हिस्ट (१९०४), एल’आयसोटोपी एट लेस एलिमेंट्स आयसोटोप्स आणि क्लासिक ट्रैटे’ डी रेडियोअॅक्टिविटे (१९१०) च्या लेखिका आहेत.

मेरी क्युरी यांचे महत्व, त्यांनी केलेल्या कार्यांसाठी मिळालेल्या असंख्य पुरस्कारांमध्ये दिसून येते. त्यांना अनेक मानद विज्ञान, वैद्यक आणि कायद्याच्या पदव्या आणि जगभरातील विद्वान संस्थांचे मानद सदस्यत्व मिळाले. १९०३ मध्ये त्यांच्या किरणोत्सर्गीतेच्या शोधासाठी, क्युरींना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. बेकरेल यांनी शोधलेल्या उत्स्फूर्त रेडिएशनवर अभ्यास करत रेडियम शुद्धीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना १९११ मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. दोन वेगवेगळ्या वैज्ञानिक क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

रेडिओअॅक्टिव्हिटीमधील त्यांच्या कार्याची दखल घेत पतीसह त्यांना संयुक्तपणे रॉयल सोसायटीचे १९०३ मध्ये डेव्ही मेडल आणि १९२१ मध्ये युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष हार्डिंग यांनी अमेरिकन महिलांच्या वतीने त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ एक ग्रॅम रेडियम प्रदान केले.पण पिरे क्युरी यांच्यानंतर जुलै १९३४ रोजी अल्पशा आजाराने मेरी क्युरी यांचे फ्रान्समधील सॅवॉय येथे निधन झाले.