“काही म्हणजे काही कळत नाही याला. प्रत्येक गोष्ट मी सांगायलाच हवी का? बायकोच्या मनात काय चाललंय ते समजायला नको, इतक्या वर्षांनंतर? माझी नणंद सुनीता- तिच्या वाढदिवसाला मी आणि वरद आम्ही दोघेही गेलो होतो, तेव्हा तिच्या नवीन पैठणीचं मी इतकं भरभरून कौतुक केलं आणि मला अशीच पैठणी घ्यायची आहे, हे मी वरद समोर तिला सांगितलं होतं. मग काल माझ्या वाढदिवसाला मला पैठणी घ्यायला काय हरकत होती? मला म्हणाला, “ तुला काय घ्यावं, हे मला सुचलं नाही, म्हणून मी तुझ्या नावानं बँकेत गुंतवणूक केली. मला पैठणी घेतली असती तर, ऑफिसच्या कार्यक्रमात, नातेवाईकांत मला मिरवता आलं असतं, ही गुंतवणूक माझ्या काय कामाची? तिला कुठं घेऊन मिरवू?” चित्रा आपला त्रागा व्यक्त करत होती.

आणखी वाचा : आहारवेद : कॉफी घ्या, पण क्वचितच!

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
army man killed his wife for immoral relationship and dead body throw in river
विवाहित सैनिकाचा तरुणीवर जडला जीव… पत्नी अडथळा ठरत असल्याने थेट नदीत…
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO

ऑफिस मधील ‘लंच टाइम’ मध्ये टिफिन खाताना एकमेकांसमोर मनमोकळं करण्यासाठी हीच वेळ सर्व मैत्रिणींना मिळायची. चित्राचं ऐकून घेतल्यावर आश्विनीने आपलं म्हणणं मांडलं. “चित्रा, खरंय गं तुझं. बायकोच्या मनात काय चाललंय हे नवऱ्यांना बिल्कुल समजत नाही. गेले ८ दिवस माझा अलोकशी अबोला आहे, माझी चिडचिड होते आहे, पण आपल्या बायकोचं नक्की काय बिनसलंय हे त्याला अजूनही कळलं नाही. मला माहेरी जायचंय हे त्याला कसं समजत नाही?” नलिनीनेही त्यांचीच री ओढली, “अगं, सगळ्या गोष्टींवर बारीक सारीक लक्ष असतं, मग आपली बायको रागावली आहे, हे तिच्या बॉडी लॅंग्वेज वरून कळू नये का? मला तर मोठ्यानं ओरडून सांगावं लागतं , मी रागावली आहे, असं त्याशिवाय माझा राग नरेंद्रच्या लक्षातच येत नाही, कारण माझ्यावाचून त्याचं काही अडतच नाही.”

आणखी वाचा : सलमान खान, आता मेंदूचीच साफसफाई करावी लागेल!

संगीताही म्हणाली,“खरं तर बायकोला नक्की काय हवंय, काय नको,तिला काय आवडतं आणि काय आवडत नाही, तिला कशामुळं आनंद होतो आणि कशामुळं राग येतो हे नवऱ्याला न सांगता कळायला हवं.”
सगळ्याजणी आपलं मन मोकळं करीत होत्या आणि आपले अनुभव शेअर करीत होत्या. मिनल मात्र हे सगळं शांत ऐकत होती. ती काहीच बोलत नाही हे पाहून चित्रा म्हणालीच,“मिनल, अगं तू काहीच बोलत नाहीस, आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही तूच सांग.”

आणखी वाचा : आहारवेद: अमृतासम दूध

मिनल नुसतीच हसली. त्या सर्वांचं म्हणणं तिला पटत नव्हतं. ती म्हणाली,“अगं,तो काही अंतर्यामी आहे का, तुमच्या मनातील जाणून घ्यायला? तुम्हांला काय हवंय, हे सरळ मागून का घेत नाही त्याच्याकडून? तुम्ही तुमच्या मनातलं काही सांगत नाही, मग तुमच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत आणि अपेक्षाभंगाचं दुःख आणि होणारी घुसमट तुम्हीच सहन करता.”
आश्विनीला तिचं म्हणणं काही पटलं नाही, ती म्हणाली, “मिनल अगं, आपल्याला हवं ते प्रत्येकवेळी मागूनच का घ्यायचं? आणि आपल्या काय हवंय ते मागून झाल्यावर, नकार मिळाला तर? तो अपमान कसा आणि का सहन करायचा? मी नुसतं माहेरी जायचं म्हटलं, की घरात वादाची ठिणगी पडतेच. मागे एकदा मावस बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवस जायचं होतं तर केवढे वाद घातले त्यानं, का तर, त्याच वेळेला त्याची बहीण डिलिव्हरीसाठी यायची होती. तूच सांग मागूनही काही मिळणारच नसेल तर, मागून अपमान कशाला करून घ्यायचा?”
नलिनीनेही लगेच आपला मुद्दा मांडला, “अगं, भिकाऱ्यासारखं मागून काय घ्यायचं? आपला काही स्वाभिमान आहे की नाही?”

प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडल्यासारखं तिचे मुद्दे खोडून काढीत होत्या आणि मिनल आपला मुद्दा सर्वांना पटवून सांगत होती. “नवरा-बायकोच्या नात्यात मान-अपमान कसला? आणि जुने नकार आणि अपमान किती दिवस उगाळत रहायचे? मतभेद असतीलही, तुमचं म्हणणं त्याला पटेलच असंही नाही तरीही मनातील गोष्टी मनात न ठेवता, संकोच, भीड न बाळगता बोलायला हवं, कुढतं बसण्यापेक्षा बोलून मोकळं व्हावं आणि नकार मिळाला तरी नात्यात कटुता येऊ देऊ नये. आपल्याला तरी नवऱ्याच्या मनात काय आहे, ते सगळं समजतं का? कोणाच्या मनात काय चाललं आहे हे समजणं अवघडच असतं, याचा स्वीकार का करू नये?आपल्या अपेक्षा असतात तशा त्याच्याही असतीलच, मग त्या तरी सर्व पूर्ण होतात का? आयुष्यातील महत्वाचे दिवस एकमेकांना दोष देऊन वाया का घालवायचे? स्वतःभोवती आपणच एक चौकट आखून घेतो, आणि मी हे करणार नाही, मी हे बोलून दाखवणार नाही यात आपणही अडकून राहतो, स्वतः च्या कोषात राहून स्वतः लाच त्रास करून घेतो. यापेक्षा आपल्याला काय हवंय, काय नको हे स्पष्टपणे बोलावं. गप्प राहून, कधी कधी खूप सोपे प्रश्न आपण अवघड करून ठेवतो, पण खूप अवघड वाटणारे प्रश्नही बोलण्यातून सुटू शकतात.

“लग्नाला काही दिवस झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला नक्की काय हवं आहे, हे आपल्याला कळायला लागतं, दोघांना एकमेकांच्या स्वभावाची जाणीव व्हायला लागते आणि त्याप्रमाणे एकमेकांशी जुळवून घेणं सुरू होतं,पण आपल्या अपेक्षेप्रमाणे सर्व काही होणारं नाही, त्याचा स्वीकार दोन्हीकडून व्हायला हवा. जे जोडीदाराच्या लक्षात येत नाही, ते मोकळेपणाने बोलायला हवं. भीड,संकोच, मान-अपमान न बाळगता दोघांनीही एकमेकांशी बोलायला हवं, एकमेकांची मतं जाणून घ्यायला हवीत. त्यानंच समजून घ्यायला हवं, तिनंच समजून घ्यायला हवं, हा हट्ट ठेवू नये. आपला मुद्दा पटवून सांगता यायला हवा. कधी तू,कधी मी असं एकमेकांना समजावून घ्यावं. ”

चित्रा,नलिनी आणि आश्विनी या सर्वजणी मिनलचे बोलणं ऐकत होत्या. त्यांना तिच्या बोलण्याचा मतितार्थ समजत होता. आपणही फक्त अपेक्षा ठेवून चालणार नाही, संवादाची कला शिकायला हवी. मनातलं ओळखून जोडीदाराने वागायलाच हवं, याचा अट्टाहास करू नये याची मनोमन जाणीव त्यांना झाली. सर्वांनी मिनलचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला असला तरीही सर्व अंतर्मुख होऊन, विचारमग्न झाल्या.
“चला गं, लंच टाइम संपला, कामाला सुरुवात करायला हवी. आपला बॉस येईल, आता आणि अजूनही सर्वांना एकत्र बघून त्याचा तोल जायचा, त्याच्या मनात काय चाललंय ते मात्र आपल्याला कधीच ओळखता येणार नाही.”
चित्राच्या या वक्तव्यावर सर्वजण दिलखुलास हसल्या आणि आपल्या जागेवर जाऊन पुन्हा कामाला लागल्या.
smitajoshi606@gmail.com