वंदना सुधीर कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“ मुग्धा तू आज व्यक्तिमत्त्व चाचण्यांविषयी (सायकोमेट्रिक टेस्ट) सांगणार होतीस ना?”
अनयनं विचारलं.
“ हो. तशा या चाचण्या गरजेप्रमाणे अनेक प्रकारच्या असतात; पण विवाहपूर्व व्यक्तिमत्त्व चाचण्या या विशिष्ट्य अशा दोनेक प्रकारच्या असतात त्यासाठी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट गाठावा लागतो. ज्याचा संपर्क
तुम्हाला तुमचा विवाहपूर्व समुपदेशक देतो. मग त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष भेटून वा ऑनलाइन ही टेस्ट घेता येते. त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात त्याला फक्त हो किंवा नाही अशा अर्थाचे त्या त्या कॉलम मध्ये टीक मार्क करायचे असतात. ही उत्तरं प्रामाणिकपणे देणं अपेक्षित आहे. इतर काही शंका असतील तर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्यांचे निरसन करतात…” मुग्धा अगदी रंगून गेली होती सांगण्यात.
पण तिला मध्येच तोडण्याचं काम पम्यानं केलंच!
“ पण नाही दिली एखाद्याने प्रामाणिकपणे उत्तरं, तर? ”
“ अरे पम्या, मुळात तू टेस्ट कुणासाठी घेणार आहेस? त्या क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी की स्वतःसाठी? तुला तुझे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे आहे ना? आणि तू स्वतःशीच प्रामाणिक नाही राहिलास तर इतरांशी काय राहणार आहेस?” रेवा म्हणाली.
“ आणि तसंही तुम्ही बनवाबनवी केली तर त्या टेस्टचं सॉफ्टवेअर तुम्हाला बरोबर पकडतं! शेवटी ती संगणकीय चाचणी आहे. तुम्ही जशी परीक्षा देणार तसेच मार्क्स तुम्हाला मिळतात ना! रिपोर्ट इन्व्हॅलिड आला तरी त्यातून तुमची वृत्ती थोडीच लपणार आहे? मग साधलं काय?” मुग्धा तळमळीनं म्हणाली.
“ हं…ते खरंच…” पम्यानं माघार घेतली.
“ रिपोर्ट इन्व्हॅलिड आला तर पुढे काय?” अनयची उत्सुकता वाढली.
“ तर मग क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तुम्हाला तुमचे रिपोर्ट्स समजावून सांगतात. ते सगळं खूप गोपनीय असतं…”.
“ जोडीदाराचा रिपोर्ट आपल्याला कळणारच नसेल तर मग काय उपयोग या सगळ्याचा?” पम्याला परत शंकेचा किडा चावला…
“अरे पम्या, परत तेच! आधी तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं आहे ना? मग तुमच्या स्वभावाची कॉम्पॅटिबिलिटी (म्हणजे अनुरूपता…तुमचे चेहरे बघून आधीच सांगते!) कितपत आहे, तुम्ही कितपत कॉम्प्लिमेंटरी (परस्परपूरक) होणार नि तडजोड कुठे करावी लागणार हे सांगणं तुम्ही मुळात ज्यांच्याकडे विवाहपूर्व समुपदेशकाचं काम आहे. दोन माणसांचे स्वभाव डिट्टो सारखे असू शकत नाहीत नि स्वभावाला मुरड घालता येणं अवघडच! इथे जुळवून घेता येण्याशिवाय पर्याय नाही. त्यालाच कोपिंग म्हणतात. जोडीदार निवडताना विविध मुद्द्यांवर तुमचे हे ३सी समजणं आणि त्याची परस्परात चर्चा होणं फार महत्त्वाचं….” मुग्धा वर्कशॉपमध्ये जे शिकली होती ते सर्व अगदी मनापासून शेअर करत होती तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर…
“ हे सगळं प्रकरण फारच अवघड आहे हं, मुग्धा…हा काही परीक्षेचा अभ्यास आहे का? हे लग्न आहे लग्न…आणि माणसं ते आनंद मिळावा म्हणून करतात….” सम्या पुरता गोंधळला होता.
“ एक्झॅक्टली सम्या! आनंद हवा, ताप नको म्हणूनच हा अभ्यास करावा लागतो, कळलं? अरे, तुम्ही १० वी, १२ वी, मग पुढचे सर्व शिक्षण, मग प्रमोशन…या सगळ्यासाठी अभ्यास करताच ना? का? पैसा, पद, प्रतिष्ठा ( आणि या जीवावर “चांगला” जोडीदारसुद्धा) मिळावा म्हणून…बरोबर? त्या कागदाच्या प्रमाणपत्रासाठी सारे काही करता; परंतु ज्या जिवंत जोडीदाराबरोबर ४०-५० वर्ष डोक्याला डोकं लावून राहायचं आहे त्याच्या मिळतेजुळतेपणासाठी स्वत:चा आणि दुसऱ्याचा काय अभ्यास करतो रे आपण? पैसा वगैरे सगळं मिळवलंत आणि वैवाहिक समाधान, आनंद नसेल तर काही उपयोग आहे का फक्त त्या पैशांचा?”
“ अगदी पटलं मला मुग्धाचं. म्हणून हे 3सी खूप महत्त्वाचे वाटले मला”, अनय म्हणाला. “एखादं उदाहरण दिलंस मुग्धा तर सम्या आणि पम्यालाही समजेल”, मुग्धाकडे बघून डोळा मारत अनय थट्टेनं म्हणाला.
“ अरे, समजा दोघे अबोल किंवा अंतर्मुख असतील आणि दोघांना एकमेकही तसेच हवे असतील, तर त्यांच्यासाठी या मुद्द्यांवर ते कॉम्पिटेबल झाले. पण अबोल व्यक्तीला थोडा बोलका किंवा एक्स्ट्राव्हर्ट जोडीदार हवा असेल तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतील. पण समजा इतर अनेक प्राधान्यांच्या गोष्टी मिळत्याजुळत्या आहेत म्हणून अबोल माणसाने बोलक्या किंवा त्याउलट माणसाला स्वीकारायचं ठरवलं तर दोघांसाठी ती तडजोड. म्हणजेच कोपिंग. कारण अबोल, इन्ट्रोव्हर्ट माणूस बडबड्या, एक्स्ट्राव्हर्ट होऊ शकत नाही. तसच बडबड्या माणूस गप्प बसू शकत नाही! हो की नाही पम्या? ” असं म्हणत मुग्धानं त्याला एक कोपरखळी मारली.
“ व्वा! छान उदाहरण दिलंस हं, मुग्धा. अगदी सहज समजेल असं. तर अशा एक, एक विषयावर हे आपल्यासाठीचे 3सी ठरवायचे, बरोबर ना? आणि म्हणूनच तू मागच्या वेळी म्हणाली होतीस की “आधी स्वतःला ओळखा नि मग त्याप्रमाणे दुसऱ्याला निवडा”, राईट? ”… अनय गंभीरपणे म्हणाला.
“ आता अनय ही गेला रे मुग्धाच्या लायनित. ”…कपाळावर हात मारत पम्या म्हणाला आणि अनयची थट्टा सुरू झाली!
vankulk57@gmail.com