वंदना सुधीर कुलकर्णी

आज कट्ट्यावर जरा शांतताच होती. नेहमीची धमाल करण्याचा कुणाचाच मूड नव्हता. ग्रुपमधील आहान आणि रीना यांनी लग्नानंतर अवघ्या दीड वर्षात वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. दोघंही एकमेकांचे छान मित्रमैत्रीण होते. नंतर ग्रुपमधल्या इतर मित्रमैत्रिणींनी परस्परच त्यांची जोडी लावून चिडवाचिडवी सुरू केली. पुढे खरंचच ते एकमेकांचे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड झाले आणि दोनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्यांनी लग्न करायचं ठरवलं. तेव्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीचा घटस्फोटाचा निर्णय ग्रुपसाठी धक्कादायक होता!

Arvi Constituency, Amar Kale Wife Mayura Kale,
आर्वीत उमेदवार पत्नीसाठी पती, तर उमेदवार पतीसाठी पत्नी मैदानात
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
some shubh muhurat for wedding in November and December this year
दिवाळीनंतर लग्नांसाठी हे आहेत शुभ मुहूर्त…
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
love lagna locha new marathi movie
‘Love लग्न लोचा’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी, प्रमुख भूमिकेत झळकणार ‘ही’ फ्रेश जोडी…

“यार, झालं तरी काय यांना?” आधी चिडवायचो तेव्हा कसले चिडायचे! नंतर मात्र बघावं तेव्हा आपले ‘कनेक्टेड’! आपल्याला टांग मारली दोघातल्या एकानं की समजावं जोडी गेली कुठेतरी फिरायला नाहीतर पिक्चरला.”
“हो ना, मग कितीही मेसेज पाठवा, फोन करा…नो रिस्पॉन्स… जणू हॉटेलरूमच्या बाहेर लावलेली ‘डू नॉट डिस्टर्ब’ची पाटी…”
“आणि आता लग्नाला दोन वर्ष होताहेत न होताहेत तर थेट घटस्फोटाचाच निर्णय? अजब आहे…”
“…आणि आपल्याला याची जराही कल्पना दिली नाही… विचारणं वगैरे तर सोडाच…”
“ए पम्या, तुला नाहीतरी काय मोठं कळणार होतं रे त्यातलं? बंद दरवाजा मागे काय घडतं ते कळतं का कधीतरी कुणाला?”असं म्हणत अन्यानं शेजारी उभ्या असलेल्या मुग्धाला कोपरखळी मारली.

आणखी वाचा : ‘गोविंदा’च्या सातव्या थरावरून ‘माझं बाळ’ कोसळलं तेव्हा…

मुग्धा मात्र एकदम गंभीरपणे म्हणाली, “हा काय विनोदाचा विषय आहे का पम्या? जरा प्रसंगाचं भान ठेवत जा की!”
पम्या हात जोडून वाकत, “सॉरी मॅम, चुकलंच जरा माझं….” म्हणत गप्प झाला.
अरे, मुग्धा अलीकडेच कुठलं तरी ‘प्री मॅरिटल वर्कशॉप’ अटेंड करून आली आहे म्हणे! हो ना ग, मुग्धा? आम्हाला पाज की तिथले थोडे डोस…”
मुग्धा जाम वैतागली. “तुम्हाला काय सांगणार त्यातलं? तुम्ही घेता का कुठले नातेसंबंध कधी गांभीर्याने, हं?”
बाsssप रे…‘नातेसंबंध’…वगैरे मोठमोठे शब्द वापरायला लागली हं मुग्धा! म्हणजे बाकी तर काय काय शिकवलं असेल त्या वर्कशॉमध्ये?”
“का रे शहाण्या, मराठीत बोललं की मोठमोठे शब्द आणि तेच इंग्लिशमध्ये ‘रिलेशनशिप’ म्हटलं की लहान शब्द का? मातृभाषा कुठली आहे रे तुझी?”
“ए, विषय सोडून वादावादी करणं थांबवा हं. ए सांग गं मुग्धा मला. मी आहे सीरियस या विषयाबद्दल. आई, बाबा सारखी स्थळं आणताहेत, त्यांना काही लॉजिकल उत्तर देता येतं का बघू तरी…बोल, बोल, तू….”

“बरं मग ऐका शांतपणे. त्या वर्कशॉपमधला एक विषय होता, लग्नानंतर गर्लफ्रेंड बायको होते आणि बॉयफ्रेंड नवरा होतो तेव्हा कुठे आणि का गडबड होते… त्यांचं म्हणणं, प्रेमात एकमेकांना एकमेकांचं सगळं चांगलंच दिसतं. तरुण वयामुळे विचारांवर भावनांचा प्रभाव अधिक असतो. प्रत्यक्ष भेटीगाठी कमी किंवा थोड्या वेळासाठी होत असल्यानं ओढ, आकर्षण यामुळे तो थोडा वेळ प्रेमातच घालवावासा वाटतो. एकमेकांचं कौतुकच जास्त होतं. त्याला म्हणे मानसशास्त्रीय भाषेत ‘मेटिंग’ काळातील ‘मेटिंग प्ल्यूमेज’ (mating plumage) असं म्हणतात. म्हणजे प्रेमाराधनेमध्ये ‘मेटिंग’ अर्थात समागम व्हावा म्हणून आपल्या मेंदूतून जास्तीचे आणि विशेष हार्मोन्स स्त्रवण्याची निसर्गाने केलेली सोय…”

आणखी वाचा : महिलांमधील हायपरथायरॉइडीझम आहे तरी काय?

“आयला, सगळंच बाउन्सर गेलं! हे जरा आता जास्तच जड होतंय हं मुग्धा…”
“का रे, सायन्सचा विद्यार्थी ना तू लेका? मग जरा शास्त्रीय आधार असलेलं काही बोललं की मात्र लगेच जड होतंय का?”
“तुम्हाला ना कायम सगळं हलकंफुलकं, टाइमपास करणारंच हवं असतं….”
अनिश मात्र समजूतदारपणा दाखवत म्हणाला, “मुग्धा, तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ. मला खरंच आहे इंटरेस्ट हे समजून घेण्यात. आपण अफेअर करतो, लग्न करतो, पण आपल्याला हे काहीच शास्त्रीय ज्ञान नसतं गं!”
“हो, मलाही असंच वाटलं अगदी,” रेवा म्हणाली. “मलाही समजून घ्यायला आवडेल, मुग्धा…”
मुग्धा परत बोलण्याच्या मूडमध्ये आली.

“लग्नानंतर एक तर जोडपं सतत एकमेकांच्या सहवासात यायला लागतं. त्यामुळे एकमेकांचे दोष खूपायला लागतात. हल्ली प्रेमविवाहात हनिमून पिरियड कोर्टशिपमध्येच एन्जॉय करून झालेला असतो. लग्नानंतर मात्र तडजोडी(विशेषतः मुलींना), नव्या जबाबदाऱ्या, कर्तव्य, नव्या माणसांच्या स्वभावांशी, सवयींशी जुळवून घेणं…अशा अनेक चॅलेंजिंग गोष्टींमुळे जीवन पूर्ण बदलून जातं.”

आणखी वाचा : नातेसंबंध : सोलोगॅमी … नातं स्वतःशीच!

“गर्लफ्रेंड ही बबली, चुबली, मस्ती मज्जा करणारी, आधुनिक, लेटेस्ट फॅशनचे कपडे घालणारी आवडते, पण तीच बायकोच्या भूमिकेत गेली की पत्नीबद्दलच्या पारंपरिक अपेक्षा तिला येऊन चिकटतात, ज्यांची हल्ली मुलींना सवयच नसते. कोर्टशिपमध्ये लाड करणारा, झेलणारा, भेटी देणारा, मनवणारा बॉयफ्रेंड नवरा झाल्यावर पुरेसं लक्षही देत नाही असं वाटायला लागतं. त्यात घरकामात हातभार लावत नसेल, पुरुषी मानसिकतेने वागत असेल, भरीला ‘मम्माज बॉय’ असेल तर त्याच, त्याच विषयांवरून रोज वाद झडायला लागतात. अशा वेळी मोठ्यांचं असमंजस वागणं आगीत तेल ओततं….”

“लग्नाआधी स्वतंत्र विचारांची, धाडशी स्वभावाची, स्वतंत्र निर्णय घेते म्हणून आवडणारी गर्लफ्रेंड, बायको म्हणून अतिमॉडर्न, अति स्वनिर्भर, स्वकेंद्रित, दुसऱ्यांना विचारातही न घेणारी, आगाऊ वाटायला लागते. आणि मित्रमैत्रिणींमध्ये लोकप्रिय असलेला, तरीही प्रेमात मात्र आपल्या पडलेला, सगळ्या गोष्टीत लीडरशिप घेणारा बॉयफ्रेंड, नवरा झाल्यावर मात्र सारखा इतर मित्रमैत्रिणींमध्येच रमतो, मला वेळ देत नाही, अहंकारी वाटायला लागतो!”

“एकूण काय, गर्लफ्रेंड मटेरियल आणि स्टिरीओटाइप कन्डीशन्ड वाइफ मटेरियल (stereotype conditioned wife material), तसंच बॉयफ्रेंड मटेरियल आणि स्टिरीओटाइप कन्डीशन्ड हसबंड मटेरियल (stereotype, conditioned husband material) हे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या, समाजाच्या डोक्यात जोपर्यंत वेगवेगळे आहे, तोपर्यंत अनेकांचे आहान आणि रीना होत राहणार…घटस्फोट होवोत वा न होवोत…”, अनिश म्हणाला.

सगळ्यांनी स्वीकृती दर्शक ‘हो’ म्हणत मान डोलावली….