कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी पुढील आयुष्यात एकमेकांना भेटतातच असं नाही, पण आमचा ग्रुप जरा वेगळाच होता. आम्ही सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊनही भेटायचो म्हणूनच इतकी वर्षं होऊनही आमचा ग्रुप टिकून राहिला.
सर्वांची लग्नं झाली, सर्वांना मुलं झाली, आणि आमच्या ग्रुपमधील सदस्यांची संख्या वाढत गेली. सर्वांचे कामाचे व्याप वाढले, नियमितपणे सर्वजण एकत्र भेटू शकत नसलो तरी वर्षातून एकदा तरी काही निमित्ताने भेटतोच…
आणखी वाचा : Women Health: योनीतुन होणाऱ्या स्रावाचा रंग कोणता असावा? गंभीर आजाराची प्रमुख लक्षणे वेळीच ओळखा
या वर्षी अनघाच्या घरी एकत्र भेटायचं आम्ही ठरवलं होतं. दिवाळीचं निमित्त मिळालंच. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, गोड आणि चटपटीत पदार्थाची चव चाखल्यानंतर शेवटी अनघाने आमचा आवडता कडक फक्कड चहा बनवला होता आणि मग ‘चाय पे’ चर्चा रंगत गेली. त्याचं असं झालं अनघाच्या मुलीला म्हणजेच केतकीला मी विचारलं, “केतकी, आता तू कॉम्प्युटर इंजिनीअर झालीस, मनासारखी नोकरीही तुला मिळाली, मग लग्न केव्हा करतेस?, कोणी पाहून ठेवला आहेस का? नाहीतर आम्हाला कामाला लागायला बरं.”
आणखी वाचा : एकदा बर्थ कंट्रोल गोळी घेतल्यावर भविष्यातही बाळ होऊ शकत नाही का? वंध्यत्वाविषयी काय सांगतात तज्ज्ञ, पाहा
“छे गं, मी कोणी पाहून वगैरे ठेवलेला नाही आणि तुम्हालाही पाहण्याची गरजच नाही कारण मी लग्न करणारच नाहीए.”
“अगं, पण एकदम असा निर्णय का? ब्रेकअप वगैरे झालंय का?”
“नाही गं, मी कधीही त्या फंदात पडलेलीच नाही, पण इतर मैत्रिणींना नात्यांमुळे तुटताना पाहिलेलं आहे आणि मला सांग लग्न झालं म्हणजेच जीवनात आपण यशस्वी झालो, जीवनाचं सार्थक झालं असं आहे का? उगाच तडजोड करीत आपलं आयुष्य काढायचं. काय रे काका, तुला काय वाटतं?”
आता सर्वजण या विषयात सहभागी झाले आणि आपापली मतं मांडू लागले.
आणखी वाचा : ‘डंगरी’ आणि ‘बीनी’ची चलती!
“केतकी, लग्न झालं म्हणजे आयुष्यात आपण यशस्वी झालो असं आजिबात नाही.” संतोष आपलं मत मांडत होता.
“ अरे पण लग्न झाल्यानंतरच आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतो.” इति मैथिली.
“कसलं काय? जोडीदार चांगला मिळाला तर ठीक आहे नाहीतर आहे ते करिअरही संपून जातं, आमच्या शेजारची चित्रा, कायम टॉपर. करिअरवाली. पण लग्न झालं आणि मुलं झाल्यानंतर तिच्या नवऱ्यानं तिला घरीच बसायला सांगितलं, आता केवळ चूल आणि मुलं सांभाळते आहे. तिनेही या न पटलेल्या या गोष्टीला मान डोलावली आहे.” सुनीता आपलं मतं मांडत होती.
आता किशोरनेही तिचीच री ओढली.
“ फक्त मुलींच्या बाबतीत असं होतं असं नाही, माझा भाचा, एकेकाळी ‘पुरुषोत्तम’ गाजवलेला, अनेक नाटकात काम केलेला गुणी कलाकार, पण नोकरी आणि छोकरी मिळाल्यानंतर त्या छोकरीनं त्याला त्याच्या कलेचा वारसा जपू दिला नाही. यापुढं नाटकात काम करायचं नाही, ते फसवं जग असत असं सतत सांगत त्याला पटवलं नि त्याला त्याच्या कलेपासून परावृत्त केलं.”
आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र
“अगं, पण जोडीदाराची साथ मिळाली तर आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टीही करता येतात.”अशी अनेक उदाहरणे आहेत की, उद्योग, समाजकार्य, संशोधन दोघंही उत्तम करिअर करत आहेत.” शिल्पीने आपला अनुभव सांगितला.
“शेवटी काय? लग्न म्हणजे गाजराची पुंगी. लग्न म्हणजे एक प्रकारचा जुगार. जोडीदार चांगला मिळाला तर आयुष्याचं दान चांगलं पडणार नाहीतर आयुष्यात काही मिळवण्याच्या आशा संपल्याच. तडजोड करीत आयुष्य रेटायचं एवढंच शिल्लक राहतं. राहुलनेही आपला स्वर चर्चेत मिसळला.
आणखी वाचा : मेन्टॉरशिप : अनुभवांचं संचित हेच मेन्टॉर!
आता चर्चा चांगलीच रंगली होती. तरुण पिढी आपले ‘लग्न’ या विषयाबाबत सुधारित मतं मांडत होती तर लग्न झाल्यामुळं आपल्याला आयुष्यात कधी मनासारखं वागताच आलं नाही, अशी मतं मध्यम वर्गातील पिढी मांडत होती.
एकंदरीत चर्चेचा सूर, लग्न म्हणजे योगायोग. स्वातंत्र्य संपणं, नात्यांची बांधिलकी स्वीकारणं, स्वतःचं मन मारून जगणं, निव्वळ तडजोड इत्यादी. वेगवेगळे विचार प्रत्येकजण स्वतःच्या अनुभवानुसार मांडत होते. मी शांतपणे सर्वांची या विषयावरील चर्चा ऐकत होते, शेवटी सर्वांनी माझ्याकडे मोर्चा वळवला,
“अरे, हिला तर रोजच असे किस्से ऐकायला मिळत असतील. लग्न म्हणजे नक्की काय असतं? तुझं काय मतं आहे?”
आणखी वाचा : तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…
एखादया वादविवाद स्पर्धेनंतर परीक्षकांना आपलं मतं नोंदवण्यास सांगावं तसं फीलिंग मला आलं, पण आता मलाही या विषयावर बोलावंसं वाटतच होतं. मी म्हटलं, “लग्न हा विषय वादविवाद घालण्याचा नाही तर अनुभवण्याचा, समजून घेण्याचा आहे. लग्न म्हणजे नात्यांची नवी गुंफण आहे. आयुष्यातील टर्निंग पॉइंट आहे. जुनं सांभाळताना नव्याचा स्वीकार करणं आहे. लग्न हा जुगार आहे असं समजून जर या नात्यांचा स्वीकार केला तर केवळ जिंकणं हे एकच ध्येयं राहतं, पण नाती जपताना कधीतरी हरण्यातही मजा असते त्यातही मजा असते हे अनुभवताच येत नाही.”
आणखी वाचा : …अन्यथा ‘डाएट’च्या नादात प्राण गमवाल!
“लग्न यशस्वी होणं म्हणजे काय? याचा विचार केला तर लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराला तो आहे तसा स्वीकारणं. आपल्या अपेक्षा, आपली मतं त्याच्यावर न लादणं. लग्न म्हणजे ऐकण्याची कला शिकणं. फुकटचा वाद आणि टोकाची टीका टाळणं. लग्न म्हणजे आपल्याच माणसांवर ‘शिक्के’ न मारणं. समोरचा अधिक महत्त्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं. लग्न म्हणजे कौतुकाची संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. लग्नानंतरची नाती सांभाळणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे, तर प्रतिसाद देणं. लग्नानंतर यशस्वी सहजीवन म्हणजे जोडीदाराला माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं. हे ज्याला समजेल त्याला लग्न हे ओझं वाटणारच नाही. केतकी, या नात्यांची मजा वेगळी असते, मतभेद, विसंवाद होणार पण त्यातही नाती तावूनसुलाखून निघतात आणि मग एकमेकांचं असं घट्ट नातं तयार होतं. तू ‘लग्न’ या विषयाला घाबरून त्यापासून दूर जाण्याचा विचार करू नकोस तर त्या नात्यांतून मिळणारी सुखद संवेदना अनुभवण्याचाही विचार कर.’’ मी असं म्हटल्यावर सगळे नि:शब्दच झाले, काही काळ…
शेवटी अनघा म्हणालीच,
“सोनारानेच कान टोचावे लागतात!”
smitajoshi606@gmail.com