मृत्यची वेळ निश्चित नसली तरी मृत्य निश्चित असल्याने शहीद अंशुमन सिंग यांच्या प्रकरणातून आपण सर्वांनीच बोध घेणे गरजेचे आहे. आपल्या मालमत्तांबद्दल आपल्या किमान वर्ग १ वारसांना तरी सगळी माहिती आपण दिली पाहिजे. आता वर्ग १ वारस म्हणजे सर्वसाधारणत: आई, पत्नी आणि अपत्य यांचा सामावेश होतो. त्याच बरोबर आपल्याला आपल्या मालमत्तांचे काय व्हावेसे वाटते ? त्या कोणाला मिळाव्याशा वाटतात याचे ठोस निर्णय हयातीतच करावे आणि त्या ठोस निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी होण्याकरता आवश्यक त्या सर्व बाबींची उदा. मृत्युपत्र करणे इत्यादींची पूर्तता करावी.
विशेषत: फौजेसारख्या किंवा तत्सम जोखमीच्या क्षेत्रात कार्यरत व्यक्तींनी तर आपले मृत्युपत्र बनविणे, त्यात वेळोवेळी कालसुसंगत बदल करणे हे अत्यंत गरजेचे आहे. वेळच्यावेळी अशी तजवीज केली तर कुटुंबावर जवान शहीद झाल्याचे दु:ख असताना मालमत्ता आणि वारसाहक्क यावरून भांडायची वेळ येणार नाही.
शहीद जवान अंशुमन सिंग यांची पत्नी आणि त्यांचे आई-वडिल यांच्यातील वादविवादाच्या बातम्या आपल्यापैकी अनेकांच्या ऐकण्यात, वाचण्यात आल्या असतीलच. या प्रकरणातील सर्वच माहिती सार्वजनिक झालेली नसली, तरी शहीद जवानाच्या वारसांमध्ये वारसाहक्कावरून वादविवाद आहेत हे निश्चित. जे शहीद जवानाच्या कुटुंबाच्या बाबतीत झाले ते कोणत्याही सर्वसामान्य कुटुंबाच्या बाबतीतसुद्धा होऊ शकते. या प्रकरणात नक्की वाद काय आहे ? वाद कशामुळे निर्माण झाला ? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्याशिवाय अशा गोष्टी टाळण्याचा मार्ग आपल्याला सापडणार नाहीत.
हेही वाचा >>> Women in Sports: महिला खेळांचे प्रेक्षक किती? क्रीडा क्षेत्रात महिलांसमोरील आव्हान काय?
याबाबी जाणून घेण्यापूर्वी आपल्याला मालमत्ता मालकीचे प्रकार आणि त्यातील संभाव्य वारसाहक्क या गोष्टी जाणून घेणे अगत्याचे आहे. मालकीच्या आधारे मालमत्तेचे मुख्यत: स्वकष्टार्जित आणि वडीलोपार्जित असे दोन प्रकारांत विभाजन करता येऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्तेत वारसांना जन्मसिद्ध हक्क प्राप्त होतो. वारसाहक्क स्वकष्टार्जित मालमत्तेतसुद्धा मिळू शकतो, मात्र जर मालकाने त्याच्या हयातीतच आपल्या निधनानंतर मालमत्तेचे काय व्हावे याची मृत्युपत्राद्वारे तजवीज केलेली असेल तर अशा परिस्थितीत मृत्युपत्र हे वारसाहक्कापेक्षा वरचढ ठरू शकतात.
शहीद अंशुमन सिंग हे फौजेत होते आणि फौजेत आपल्याला काही झाले तर मरणोत्तर फायदे कोणाला मिळावेत हे नोंदवायची सोय आहे. त्याला ‘नेक्स्ट ऑफ किन’ असे म्हणतात. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले तर सर्वसामान्य व्यक्तीला विविध फायदे आणि मालमत्तांकरता नामनिर्देशन अर्थात नॉमिनेशन करायची जशी सोय आहे, तशीच ही ‘नेक्स्ट ऑफ किन’ सोय आहे असे म्हणता येईल. शहीद अंशुमन सिंग यांनी ‘नेक्स्ट ऑफ किन’ मध्ये आपल्या पत्नीचे नाव नोंदवलेले होते आणि त्याआधारे मरणोत्तर फायदे पत्नीला मिळाले असायची शक्यता आहे. दुर्दैवाने आपले काही बरेवाईट झाले तर आपले मरणोत्तर लाभ पत्नीलाच मिळावेत अशी शहिद अंशुमन सिंग यांची इच्छा होती का नव्हती याचा पडताळा घ्यायचा आता कोणताही मार्ग नाही आणि तीच सर्वात मोठी समस्या आणि वादाची गंगोत्री आहे. हेच जर शहीद अंशुमन सिंग यांचे मृत्युपत्र असते तर त्यांची स्पष्ट इच्छा काय आहे हे जाहीर झाले असते आणि त्याबाबत कोणताही वाद निर्माण झाला नसता.
हेही वाचा >>> Mumbai Influencer: सीए होती इन्फ्ल्युएन्सर अन्वी कामदार; दरीत पडून झाला मृत्यू; मुंबईच्या रील स्टारबद्दल जाणून घ्या ही माहिती
निधन झालेल्या कोणत्याही व्यक्तीने जर नामनिर्देशन केलेले असेल आणि निधनानंतर इतर वारसांनी त्या नामनिर्देशनास हरकत घेतली नाही, तर त्या नामनिर्देशनाप्रमाणे मालमत्ता किंवा लाभाचे हस्तांतरण केले जाते. आता कायद्याच्या दृष्टीकोनातून नामनिर्देशन केले याचा अर्थ इतर वारसांचा हक्क संपुष्टात आला असे होत नाही. ज्या व्यक्तीच्या नावे नामनिर्देशन केलेले आहे त्याला इतर वारसांचा विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून दर्जा असतो. वारसाहक्क आणि नामनिर्देशन यांच्यात वारसाहक्कच वरचढ ठरतात.
नामनिर्देशन किंवा ‘नेक्स्ट ऑफ किन’ या बाबी महत्त्वाच्या असल्या तरी बहुतांश वेळेस त्या अगदी सहजपणे, त्याच्या संभाव्य बऱ्या-वाईट विचारांचा फार विचार न करता केल्या जातात हे वास्तव आहे. शहीद अंशुमन सिंग यांच्या प्रकरणात त्यांनी ‘नेक्स्ट ऑफ किन’ म्हणुन पत्नीच्या नावाची नोंद केलेली असायची माहिती बहुदा इतर कोणाला नसेलच आणि माहितीच नसेल तर हरकत घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. या सगळ्याची परिणती शहीद अंशुमन सिंग यांचे मरणोत्तर लाभ पत्नीला मिळण्यात झाली असायची शक्यता आहे.