खरं तर ७८ वर्षांचं वय म्हणजे आरामाचं वय ! मुलं, सुना, मुली, जावई यांच्याबरोबर राहायचं, तब्येतीला सांभाळत आपल्याला हव्या त्या गोष्टी करायच्या आणि नातवंडांबरोबर मजेत जगायचं हे खरंतर या वयातल्या बहुतेक जणींचं रुटीन. स्वयंपाक घरातलं लक्ष काढून घेऊन सुनेच्या हाती सगळं सोपवून आपण जमेल तशी मदत करायची अशा अनेक आज्या आसपास आपण पाहातो. पण ‘ही’ आजी मात्र अगदी वेगळी आहे. ज्या वयात स्वयंपाकघरातून रिटायर व्हायचं त्याच वयात ती स्वयंपपाकघरात नवनवे प्रयोग करतेय. फक्त आलेले मेसेज फॉरवर्ड करणं, चॅटींग करण्यापेक्षा इंटरनेटचा वापर करून आपले पदार्थ तिनं घरोघरी पोहोचवले आणि आपल्या घरादाराला पुन्हा उभं केलं… ती आहे ‘उर्मिला बा’! उर्मिला आजी. या ७८ वर्षांच्या गुजराती आजीची सध्या देशभरात चर्चा आहे.

आणखी वाचा : स्त्रिया आणि अर्थसाक्षरता : मैत्रीणींनो, आरोग्य विमा काढलात का?

Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Union Home Minister Amit Shah addresses party workers at state BJP mahavijayi convention for election victory
पंचायत ते संसद भाजपच! निवडणूक विजयासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
about writer filmmaker pritish nandy life journey
व्यक्तिवेध : प्रीतीश नंदी
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं

मास्टरशेफ इंडिया सीझन -७ या कुकिंग रिएलिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या उर्मिला बा यांच्या वयामुळे तर त्या चर्चेत आहेतच; पण त्याहीपेक्षा सगळ्यांच्या मनात त्यांनी जागा केली ती त्यांच्या जिंदादिलीमुळे. सहसा या वयात माणसं किरकिरी होतात. आपल्या काळात एखादी गोष्ट कशी होती, आजकाल त्याला कशी सर नाही हे रडगाणं गात बसतात नाहीतर आपण कसे कष्ट केले आणि आताच्या मुलींना सगळं कसं आयतं मिळतं यावर बोलत असतात. पण उर्मिला बा यापैकी काहीच करत नाहीत. उर्मिला बांच्या आयुष्यात काही कमी दु:ख नव्हती. दोन लहान मुलं आणि नवरा गमावलेल्या उर्मिला बा यांना आपल्या संसारासाठी उभं राहावं लागलं. पण ते करत असताना त्यांनी आपल्यातलं लहान मूल जपलं. अथक कष्ट करत असताना हाताची चव आणि मनातला उत्साह, कुतूहलही जागृत ठेवलं. त्यामुळेच मास्टर शेफच्या किचनमध्ये एखादी नवीन रेसिपी करताना किंवा काहीतरी नवीन शिकताना ती उत्साही कारंज्यासारखी वाटली.

आणखी वाचा : बाई मी पतंग उडवित होते…

उर्मिला बेन किंवा उर्मिला बा यांचं पूर्ण नाव उर्मिला जमनादास अशर. त्या मुंबईत राहतात. एकेकाळी घरोघरी जाऊन स्वयंपाक करुन पोट भरणाऱ्या उर्मिला बा या आज सेलिब्रिटी आहेत. आर्थिक अडचणींवर मात करताना सतत काहीतरी नवीन शोधत राहिल्या आणि त्यामुळेच मास्टरशेफ इंडियामधल्या सगळ्या तरुण स्पर्धकांपेक्षाही त्या तरुण वाटत होत्या. अगदी एलिमिनेट झाल्या तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कटुता आली नाही. कदाचित म्हणूनच उर्मिला बा घराघरांत आपल्या वाटू लागल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात भल्याभल्या बिझनेसवर अवकळा आली. उर्मिला बांचाही घरगुती बिझनेस होता. २०२० मध्ये त्यांच्या नातवानं ‘गुज्जुबेन ना नाश्ता’ हे यूट्यूब चॅनेल सुरु केलं. अगदी साध्या, घरगुती पारंपरिक पदार्थांच्या रेसिपी या चॅनेलवर त्या दाखवतात. हे चॅनेल अगदी मस्त हिट झालं. आपल्या घरातली एखादी आजीच नातवंडांना त्यांच्या आवडीचा पदार्थ करुन दाखवत आहे इतक्या साधेपणानं बोलणारी ही गुज्जुबेन भरपूर फेमस झाली. आता त्यांच्याकडे कामासाठी त्यांची टीमही आहे. त्यांच्या या यूट्यूब चॅनेलचे भरपूर फॉलोअर्स आहेत. उर्मिला बेन मास्टर शेफमध्ये आल्यावर होस्ट शेफ विकास खन्ना यांनीदेखील आपण गुज्जुबेनचे चाहते असल्याचं सांगितलं होतं.

आणखी वाचा : लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते? सेक्समुळे वजनावर कसा परिणाम होतो जाणून घ्या

मास्टरशेफ या कुकिंग शो मध्ये फक्त पदार्थ करुन दाखवणे इतकंच नाही तर त्यापलिकडे जाऊन तो प्रेझेंट करणं, त्यात काहीतरी नावीन्य दाखवणं अपेक्षित असतं. उर्मिला बा यामध्ये टॉप १६ स्पर्धकांपर्यंत पोहोचल्या. विकास खन्ना यांच्या ‘दुरियां का ताज’ या रेसिपीला नव्यानं सादर करताना बा थोड्या मागे पडल्या. त्यांनी केलेल्या डिशची चव अर्थातच सगळ्यांना आवडली. पण थोडंसं काहीतरी चुकलं. उर्मिला शो मधून बा एलिमिनेट झाल्या असल्या तरी प्रेक्षक आणि अगदी जजेसच्या मनात मात्र त्यांचं स्थान कायम आहेच. “मास्टरशेफमुळे मला अनेक इतरही पदार्थ करून बघण्याची संधी मिळाली. आता मी नसले तरी इतरजण या स्पर्धेत पुढे जात आहेत हे बघून मला खूर छान वाटतंय. इथून मी खूप छान आठवणी घेऊन जात आहे आणि अर्थातच भरपून ज्ञान, माहिती. त्यामुळे या शोचे मनापासून धन्यवाद,” अशी प्रतिक्रिया उर्मिला बा यांनी एलिमिनेट झाल्यानंतर एका मुलाखतीत दिली होती.

आणखी वाचा : ३९ हजार ५२६ महिलांवर अत्याचार, २५०६ बलात्कार…चित्रा वाघ, उर्फी पुराण झालं असेल तर यावरही बोला!

आपल्या घराला सावरण्यासाठी उर्मिला बेन यांनी स्वयंपाक सुरु केला. आज त्या एक यशस्वी बिझनेसवुमन झाल्या आहेत. त्यांची खासियत असलेले गुजराती पारंपरिक पदार्थ त्यांनी अनेकांना खिलवले, त्यातून त्या माणसं जोडत गेल्या. विविध प्रकारची लोणची आणि खाकरे ही त्यांची खासियत. आज अगदी देशभरात त्यांच्या हातचे पदार्थ पोहोचत नसले तरी त्यांच्या चवीचे पदार्थ करायचा अनेकजण प्रयत्न करतात. आता उर्मिला बेन आणि त्यांच्या नातवाला गुज्जुबेन हा ब्रॅण्ड आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचा आहे. ऑनलाईन मार्केट प्लसेसेवर त्यांचे पदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.

खूप संघर्ष केलेल्या अनेक व्यक्तींच्या मनात अनेकदा कटुता आलेली आपण पाहिली आहे. पण डोंगराएवढं दु:ख पचवूनही उर्मिला बा यांच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र मावळलं नाही. आपल्या घरातल्या आज्या अशाच तर असतात. तुमचा सगळ्यांत आवडता पदार्थ कोणता असा कुणालाही विचारलं तर बहुतेकांना आपल्या आजीच्या हातचे पदार्थ आणि ते करताना तिच्या चेहऱ्यावर दाटून आलेली माया आठवते. हाच धागा उर्मिला बेन आणि आपल्यालाही जोडतो. साधेसुधे, पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ आणि ते करणारे अनुभवी, मायाळू हात आणि मऊ मखमली हसू असलेला चेहरा!

Story img Loader