मोड आलेल्या मटकीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. सकाळच्या नाश्त्यासाठी मटकी वाफवून किंवा परतून खावी. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व भरपूर असल्याने आरोग्य चांगले राहते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हक्काचे स्थान मिळविणाऱ्या कडधान्यांमध्ये मटकीचा उल्लेख केला जातो. प्रामुख्याने उसळीसाठी आणि आमटीसाठी मटकीचा उपयोग केला जातो. मटकीला मराठीत ‘मठ’, संस्कृतमध्ये ‘मुकुष्टक’ किंवा ‘वनमुग्ध’, तर इंग्रजीमध्ये ‘ॲकोनाईटबीन’ किंवा ‘मॉथबीन’, तर शास्त्रीय भाषेत ‘व्हिना ॲकोनाईटीफोलिया’ (Vigna Aconitifolia) म्हणतात.
हेही वाचा… चतुरा : जर मणिपूरमधील महिलांना नग्न करत धिंड काढल्याचा व्हिडीओच समोर आला नसता तर?
मटकी ‘पॅपिलिओनसी’ या कुळातील आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळी पीक म्हणून मटकीची लागवड केली जाते. मटकीचे वेल असतात. या वेलाची पाने आकाराने लहान असतात. मटकीच्या शेंगा व त्यातील दाणे मुगाच्या दाण्यापेक्षा लहान असतात.
हेही वाचा… बायांनो, ब्युटी पार्लर बंद करा!
भारतामध्ये मटकीचे उत्पादन सर्व ठिकाणी घेतले जाते. महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या राज्यांमध्ये मटकीला अनुकूल हवामान असल्यामुळे जास्त प्रमाणात पीक घेतले जाते.
औषधी गुणधर्म
आयुर्वेदानुसार: मटकी कफ व वातशामक, लघु, मधुर विपाकी व ज्वरनाशक आहे.
आधुनिक शास्त्रानुसार: मटकीमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय व तंतुमय पदार्थ असून, मोड आलेल्या मटकीमध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
उपयोग
१) सकाळच्या नाश्त्यासाठी मटकी वाफवून किंवा परतून खावी. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्व भरपूर असल्याने आरोग्य चांगले राहते.
२) मटकीच्या पिठापासून मठिया, तसेच पापडही बनविले जातात. हे पापड अतिशय रुचकर व पौष्टिक असल्याने त्याचा जेवणाबरोबर वापर करावा.
३) बाजरीची भाकरी व मटकीची आमटी व त्यासोबत कांदा हा महाराष्ट्रीय लोकांचा मुख्य आहार म्हणून अनेक ठिकाणी खाल्ला जातो.
४) वाफवलेली मटकी, कांदा, गाजर, काकडी, टोमॅटो व थोडीशी शेव घालून पौष्टिक भेळ बनवावी व संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये घरातील सर्वांनी भेळ खावी. मटकी रुचकर व पाचक असल्याने ही भेळ लहान मुलांपासून सर्वांनाच आवडते व आरोग्यास लाभदायकही असते.
५) मूळव्याधीच्या विकारामध्ये अनेक वेळा शौचावाटे रक्त पडते. अशा वेळी मटकी वाफवून खाल्ली असता रक्त पडणे थांबते.
६) मटकीमध्ये प्रथिने, कॅरोटीन, थायमिन, रिबोफ्लेविन, निॲसीन आणि ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे तिचा आहारामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात वापर करावा.
७) मोड आलेली मटकी घालून मसालेभात करावा. हा भात अतिशय सकस व पौष्टिक असतो, तसेच मटकीच्या पिठाचे धिरडे, थालीपीठ, पापड, भजी अशा अनेक स्वरूपात तिचा आहारामध्ये वापर करता येऊ शकतो.
सावधानता
मटकीचे गुणधर्म हे बरेचसे मुगाप्रमाणेच आहेत, परंतु मटकीपेक्षा मुगाचे प्रमाण आहारात जास्त प्रमाणात ठेवावे. मटकीचा वापर हा योग्य प्रमाणात ठेवावा. कारण मटकी ही मुगापेक्षा वातकर व रूक्ष असल्याने तिचे स्थान मुगापेक्षा गौण समजले जाते.