Meena Bindra : नोकरीपेक्षा बिझनेस बरा…हे विधान आपण अनेकांच्या तोंडून ऐकतो मात्र, आपण उराशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरवणं हे सर्वात जास्त कठीण असतं. भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून अनेक जण बिझनेसचा विचार डोक्यातून काढून टाकतात. पण, अनेक अडचणींचा सामना करत जे लोक आपलं कर्तृत्व सिद्ध करतात तेच आयुष्यात यशस्वी होतात. आज अशाच एका प्रेरणादायी महिलेची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीना बिंद्रा हे नाव जरी आपल्यासाठी नवीन असलं तरीही ‘BIBA’ या त्यांच्या कंपनीचं नाव आज घराघरांत लोकप्रिय आहे. वयाच्या चाळीशीत त्यांनी आपल्या आवडत्या कामाचं बिझनेसमध्ये रुपांतर केलं. त्यांचा जन्म दिल्ली येथे झाला. याठिकाणी मिरांडा हाऊस कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि २० व्या वर्षीच त्यांचं लग्न झालं. पुढे, त्यांना दोन मुलं झाली. अगदी सामान्य गृहिणींप्रमाणे त्या आपलं आयुष्य जगत होत्या. पण, कालांतराने मुलं मोठी झाल्यावर वयाच्या चाळीशीत त्यांनी घरबसल्या कॉटन प्रिंटेड सूट्स विकण्यास सुरुवात केली.

हेही वाचा : एकेकाळी जेवणासाठी पैसे नव्हते; स्टार झाल्यावर शाहरुखचा ब्लॉकबस्टर सिनेमा नाकारला, आज ‘ही’ अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण

छोटासा व्यवसाय सुरू करून मीना यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. फॅशन क्षेत्राशी संबंधित कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्यांनी इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्याचा निर्णय घेतला. याकाळात मीना यांना त्यांच्या पतीने मदत केली. त्यांचं बँकेत स्वत:चं खातं देखील नव्हतं. त्यामुळे मीना यांच्याकडे स्वत:चा व्यवसाय करण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांच्या पतीने बँकेकडून त्यांना ८ हजार रुपयांचं कर्ज मिळवून दिलं होतं. इथूनच BIBA ब्रँडचा खरा प्रवास सुरू झाला.

मुंबई राहत असताना मीना यांनी त्यांच्या भावाच्या रिकाम्या फ्लॅटमध्ये कपड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. याठिकाणी त्यांचा मोठा आर्थिक फायदा झाला. त्याचे सूट प्रदर्शनात विकले गेल्याने मीना यांच्या जवळचे पैसे दुप्पट झाले. BIBA या शब्द पंजाबीत प्रेमळ या अर्थी वापरला जातो. त्यामुळे मीना यांनी अत्यंत विचारपूर्वक आपल्या ब्रँडचं नाव BIBA ठेवलं. २००४ मध्ये या ब्रँडचं पहिलं दुकान उघडलं आणि हा ब्रँड प्रचंड वेगाने लोकप्रिय झाला. किशोर बियाणी यांनी ‘ना तुम जानो ना हम’ चित्रपटात त्यांच्याशी भागिदारी करण्यासाठी संपर्क साधला. यानंतर मीना यांनी मागे वळून पाहिलं नाही. २०१२ पर्यंत BIBA ब्रँडने ३०० कोटींपर्यंतचा वार्षिक महसूल गाठला.

हेही वाचा : मुकेश अंबानींच्या थोरल्या सूनेची कोण आहे स्टायलिश? नातं आहे खूपच खास, जाणून घ्या….

२०२४ मध्ये BIBA कंपनीने वार्षिक ८०० कोटींचा टप्पा ओलांडला. दरम्यान, २०१२ मध्ये BIBA ला बेस्ट एथनिक वेअर ब्रँड फॉर वुमन हा किताब देण्यात आला होता. तर, इंडस्ट्रीतील योगदानाबद्दल मीना यांना क्लोदिंग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ इंडियाने जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित केलं आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meena bindra a women who once took 8 thousand loan now owns company of 800 cr know in details sva 00