प्रसिद्ध व्यवसायिक मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा सुपूत्र अनंत अंबानी याचा राधिका मर्चंट हिच्याशी विवाह होणार आहे. त्यांच्या साखरपुड्याची देशभर जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे राधिकाविषयीही जाणून घेण्याची उत्सुकता होती. तसंच, तिच्या कुटुंबियांविषयीही अनेकजण माहिती घेत असतात. आज आपण तिची बहिण अंकिता मर्चंट हिच्याविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंट ही प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची लेक आहे. विरेन मर्चंट हे देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. एन्कॉर हेल्थकेअर या फार्मास्युटिकल कंपनींचे ते मालक आहेत. विरेन मर्चंट यांना राधिकासह अंकिता हीसुद्धा मुलगी आहे. अंकितानं मुंबईत शालेय शिक्षण घेतलं. तर, उच्च शिक्षणासाठी तिने परदेश गाठलं. त्यानंतर तिने ड्रायफिक्स नावाची कंपनीचीही स्थापना केली.

अंकिताचं शिक्षण किती?

अंजली मर्चंट हिने मुंबईतील कॅथड्रल आणि जॉन कॅनोन शाळेतून तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तर, बॅचरल इन सायन्स इन इंटरप्रिन्युअरशिप आणि स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयांत तिने मॅसॅच्युसेट्सच्या बॅबसॉन कॉलेजमध्ये पदवी मिळवी आहे. मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ही पदव्युत्तर पदवी तिने इंग्लडच्या लंडन बिझनेस स्कूलमधून प्राप्त केली आहे. म्हणजेच, व्यावसायिक क्षेत्रात उतरण्यासाठी तिने परिपूर्ण शिक्षण घेतलं आहे.

ती सध्या काय करते?

अंजली सध्या एन्कॉर फार्मास्युटिकल कंपनीत डिरेक्टर आहे. तर, ड्रायफिक्स कंपनीची ती सहसंस्थापक आहे. या कंपनीकडून हेअर स्टाइल आणि हेअर ट्रिटमेंट दिली जाते.

अंजली मर्चंटचं नेटवर्थ किती?

अंजली मर्चंट हिचे वडील विरेन मर्चंट यांचं नेट वर्थ ७५५ कोटी रुपये आहे. तर, अंजलीच्या नेटवर्थविषयी काहीही माहिती उपलब्ध नाही. डीएनए या वृत्तसंकेतस्थळाने माहिती दिली आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet anjali merchant who is sister of anant ambanis bride to be radhika merchant know more sgk