काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात आर्थिक संकट निर्माण झालं होतं. या आर्थिक गर्तेतही शाहिद खान या पाकिस्तानी-अमेरिकन उद्योजकाचं नाव प्रचंड चर्चेत होतं. याच उद्योगाच्या मुलीने तब्बल १२३ कोटींचं दान एका पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी दिलं आहे. त्यामुळे ही शन्ना खान नक्की कोण? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. भारताचे प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलं ईशा अंबानी आणि आकाश अंबानी यांच्याही संपत्तीला मागे टाकेल इतकी संपत्ती शन्ना खानच्या नावावर आहे. डीएनए या वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानी-अमेरिकन व्यावसायिक शाहीद खान त्यांची श्रीमंती, उंची जीवनशैली आणि सामाजिक कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहेत. शाहिद खान यांचा मुलगा टोनी खानही क्रीडा क्षेत्राशी संबंधित व्यवसायात आहे. तर, त्यांची मुलगी शन्ना खान पॅकेजिंग डिझाइन क्षेत्रातील व्यवासायात गुंतली असून ती सामाजिक क्षेत्रातही सहभागी होत असते.
हेही वाचा >> Women’s Equality Day 2023 : लैंगिक असमानतेमुळे महिलांच्या मेंदूवर परिणाम होतो का?
पाकिस्तानातील प्रसिद्ध उद्योजक शाहिद खान यांची सर्वात मोठी भागीदारी क्रीडा संबंधित उपक्रमांमध्ये गुंतवली आहे. तसंच, या खान कुटुंबाची संपत्ती जवळपास ९९ हजार ५९८ कोटींच्या घरात आहे, अशी माहिती डीएनए या वृत्तसंस्थेने दिली आहे. अमेरिकेचा फुटबॉल संघ जॅक्सनविले जग्वार्सची मालकी या खान कुटुंबाकडे आहे. तर, इंग्लडमधील फुल्हाम या फुटबॉल क्लबचेही ते मालक आहेत. शाहिद खान यांचा मुलगा टोनी खान हा या व्यवसायावर नियंत्रण ठेवतो. शाहिद खान आणि टोनी खान सोशल मीडियावर प्रसिद्ध असले तरी शाहिद खान यांची मुलगी शन्ना खान फारशी समाज माध्यमांवर सक्रिय नसते. तिच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नसली तरीही तीसुद्धा परोपकारी असल्याचं म्हटलं जातं.
मुळची पाकिस्तानी पण जन्म अमेरिकेत
शन्ना खान सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून ती उद्योजिकाही आहे. ती मुळची पाकिस्तानी असली तरीही तिचा जन्म अमेरिकेतील इलियॉनमध्ये झालाय.
हेही वाचा >> ५० वर्षांपूर्वी महिला खेळाडूंना पुरुषांइतकंच मानधन मिळवून देणारी लढवय्यी
पॅकेजिंग डिझाईन कंपनीची मालकी
शन्ना खान युनायटेड मार्केटिंग कंपनीची सहसंस्थापक आहे. शिकागो येथील ही कंपनी असून या कंपनीमार्फत पॅकेजिंग डिझाईनचं काम केलं जातं. या व्यावसायात ती चांगली कामगिरी करते आहे. ही कंपनी तिने तिची सासू जेनेट मॅककेब यांच्या सहकार्याने सुरू केली आहे.
शन्ना खानकडून १२३ कोटींचं दान
शन्नाला प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे. म्हणूनच, तिने गेल्या वर्षी एकात्मिक ऑन्कोलॉजी कार्यक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने इलिनॉय विद्यापीठ पशुवैद्यकीय शिक्षण रुग्णालयाला १२३ कोटी रुपये दान केले होते. तिच्या या कार्याचे सर्वत्र कौतुकही झाले होते. तसंच, तिने क्रॅनर्ट फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्येही योगदान दिले आहे. शन्ना खान जग्वार्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजउपयोगी कामे करते. ती असुरक्षित तरुणांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करते.
पतीही आहे प्रसिद्ध व्यावसायिक
वुल्फ पॉइंट अॅडव्हायझर्सचे व्यवस्थापकीय संचालक जस्टिन मॅककेब यांच्याशी तिचा विवाह झाला असून तिची २० लाख डॉलरची संपत्ती असल्याचंही म्हटलं जातं. ईशा आणि आकाश अंबानींपेक्षाही तिची संपत्ती प्रचंड आहे.