गणेश चतुर्थी हा वर्षातील असा काळ आहे जेव्हा सणाचा उत्साह विशेषत: महाराष्ट्र राज्यात असतो. दरवर्षी अनोख्या पद्धतीने बनवलेल्या गणेशमूर्ती मंडळांमध्ये आणि घरात पाहायला मिळतात. दरम्यान सध्या एका अनोख्या मूर्तीची सर्वत्र चर्चा होत आहे. ही मूर्ती चॉकलेटपासून तयार केली आहे. मुंबईतील एक ३२ वर्षीय रिंटू राठोड ही महिला १४ वर्षांपासून हा चॉकलेटपासून बाप्पाच्या सुंदर मूर्ती तयार करते. विशेष गोष्ट म्हणजे यावर्षी डिझायनरने अर्धनारी स्वरुपातील मूर्ती बनवत आहे. ही ३० किलो डार्क चॉकलेट वापरून तयार करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेकरच्या इंस्टाग्राम पोस्टनुसार, “ही गणेश मूर्ती पुरुष आणि स्त्री शक्तींच्या एकतेचे प्रतीक आहे. हिंदू धर्मात गणपतीच्या या रूपाला विशेष महत्त्व आहे. हे स्त्री आणि पुरुष दोन्ही तत्त्वे अत्यावश्यक आणि पूरक आहेत. विश्वातील सुसंवाद आणि समतोल यांना चालना देणारी कल्पना ही मूर्ती अधोरेखित करते. आजच्या काळात महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता हा संदेश विशेष महत्त्वाचा आहे. अर्धनारीश्वर हे पारंपारिकपणे शिव आणि पार्वतींशी संबंधित असले तरी गणपतीचे वर्णन आणि व्याख्या देखील आहेत. अकराव्याव्या शतकातील ‘हलायुद्ध’ स्तोत्रात गणेशाच्या अर्धनारी रूपाचा उल्लेख आहे. रायगड (महाराष्ट्र) येथील गोरेगाव येथील८०० वर्षे जुन्या मंदिरात अर्ध पुरुष, अर्ध स्त्री स्वरुपातील गणेशाची मूर्ती स्थापित केली आहे आणि ती अत्यंत शुभ मानली जाते.”

चॉकलेट गणेश मूर्ती आणि मूर्त खास विसर्जन विधी करणाऱ्या या बेकर कोण आहे?

व्यवसायाने ‘व्यावसायिक डिझायनर’ असलेल्या रिंटूला नेहमीच बेकिंगची इच्छा होती. राठोड यांनाही पूर्णवेळ आई व्हायचं होतं. त्यामुळे तिने नोकरी सोडून बेकर म्हणून नवीन प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. तिने रिनी बाकेशिच नावाची कंपनी सुरू केली जी त्रिमितिय अंड्याशिवाय केक (three-dimensional, egg-less cake) बनवण्यात प्रविण आहे. बेकरने बनवलेली २५ इंच उंच मूर्ती पूर्णपणे ३० किलो डार्क चॉकलेटपासून तयार केली गेली आहे आणि फूड कलर्सने रंगवली आहे. गेल्या १४ वर्षांच्या परंपरेप्रमाणे अनंत चतुर्दशीला ही मूर्ती दुधात विसर्जित केली जाईल. चॉकलेट दूध गरजू मुलांना वाटले जाईल. बाप्पाचे देवत्व आणि आशिर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहील अशी प्रार्थना केली जाईल.

गेल्या वर्षी तिने तिच्या ४० किलोच्या चॉकलेटची गणेशाची मूर्ती तयार केली होती. रिंटूने नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजाच्या कल्याणासाठी योगदान दिले आहे. तिने वंचित, कर्करोगग्रस्त मुलांसाठी वेगवेगळ्या NGO मध्ये काम केले आहे. तिने २०१५ मध्ये नेपाळ भूकंपग्रस्तांना अन्न मदत देखील केली होती.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet designer turned baker who made ganpati idol out of 30 kg dark chocolate chdc snk