आपल्या मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की, त्याचे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे. त्यासाठी हिंमत दाखवून, मेहनत करून स्वप्न पूर्ण करण्यास ती व्यक्ती तयार असते. मग समोर कितीही संकटे आली तरी चालेल. तर आज आपण अशाच एका महिलेबद्दल या लेखातून जाणून घेणार आहोत.
भारतातील या अग्रगण्य ॲथलीटची व्याख्या ऑलिम्पिक गौरवाने नाही तर पाण्यात पोहून त्यांच्या त्यांच्या अथक प्रयत्नाने केली आहे. बुला चौधरी यांनी ‘सात समुद्र’ पोहून पार करणारी पहिली महिला म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. चला तर जाणून घेऊ त्यांच्या प्रवासाबद्दल.
बुला चौधरीचा प्रवास अथांग महासागरापासून सुरू झाला. समुद्राच्या पाण्यात पोहण्याचे स्वप्न घेऊन जन्मलेल्या बुला चौधरी यांची पोहण्याची प्रतिभा अगदीच कौतुकास्पद होती. लहान वयातच बुला चौधरीच्या प्रशिक्षकांनी त्यांच्या पोहण्याची क्षमता ओळखली आणि तिचे समर्पण एक उल्लेखनीय कारकिर्दीत फुलले. त्यांची स्पर्धात्मक भावना तलावांपुरती मर्यादित नव्हती; तर १९८९ मध्ये त्यांनी इंग्लिश खाडी (English Channel) ओलांडून विजय मिळवला आणि १९९९ मध्ये या पराक्रमाची पुनरावृत्तीसुद्धा केली.
समुद्राच्या पाण्याची ॲलर्जी असूनही त्यांनी ध्येय गाठणे म्हणजे खरोखरच उल्लेखनीय आहे. बुला चौधरी यांच्या एका कानाला छिद्र असल्याने वारंवार त्यांना बुरशीजन्य संसर्ग होत होता. डॉक्टरांनी तिला पोहणे सोडण्याचा सल्ला दिला होता; पण त्या हार मानणाऱ्या नव्हत्या. त्यांनी केवळ चिकाटीच ठेवली नाही. तर जगभरात स्वतःचे नाव कमावले.
हेही वाचा…महिलांनी बांधलेली ‘ही’ नऊ भारतीय स्मारके तुम्ही पाहिली आहेत का? पाहा यादी
बुला चौधरी यांची खरी आवड मात्र खुल्या पाण्याच्या मॅरेथॉनमध्ये जिंकण्याची होती. १९९६ मध्ये त्यांनी भारतातील मुर्शिदाबादपर्यंतचे ५० मैलांचे लांब पल्ल्याचे अंतर पोहण्यात तिने वर्चस्व मिळवले. त्यानंतर २००४ मध्ये तिने एक ऐतिहासिक कामगिरी केली. भारत आणि श्रीलंका यांना वेगळे करणारी जलवाहिनी असलेल्या पाल्क सामुद्रधुनी ओलांडून सात समुद्र पार करणारी त्या पहिला महिला ठरल्या.
पण, बुला चौधरी यांना इथपर्यंत थांबून राहायचे न्हवते. त्यानंतर त्यांनी वर्षभरात जगभरातील प्रतिष्ठित समुद्राचा (चॅनेलचा) सामना करीत अनोख्या साहसाला सुरुवात केली. द स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, टायरेनियन समुद्र, कूक स्ट्रेट, ग्रीसमधील टोरोनोस गल्फ, कॅलिफोर्नियातील कॅटालिना चॅनल व दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउनजवळील थ्री अँकर बे व रॉबेन बेटावर पोचणाऱ्या लांब पल्ल्याच्या पहिल्या जलतरणपटू आहेत.
सात समुद्र पार करणारी पहिली महिला जलतरणपटू –
२००५ पर्यंत बुला चौधरी सात समुद्र यांनी पोहून एक अनोखा विक्रम नोंदविला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे तिला राष्ट्रीय मान्यता, प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार हे भारतातील दोन सर्वोच्च क्रीडा सन्मान पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. सात समुद्र पार करणाऱ्या या पहिल्या महिला जलतरणपटूने पुढे जाऊन राजकारणाचाही अनुभव घेतला आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील नंदनपूरचे प्रतिनिधित्व करीत त्यांनी २००६-२०११ पर्यंत महिला आमदार म्हणूनदेखील काम केले आहे.
बुला चौधरी यांचा वारसा रेकॉर्डच्या पलीकडे आहे. विशेषत: भारतातील तरुण मुलींसाठी त्या एक प्रेरणा आहेत. बुला चौधरी यांची चिकाटी आणि उत्कटता कोणत्याही आव्हानावर समुद्राच्या विशाल विस्तारावरही मात करू शकते. कारण- त्यांनी अशक्य गोष्टींवर विजय मिळविला आहे. आपल्याला केवळ मोठी स्वप्ने नव्हे, तर खोलवर स्वप्न पाहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.