आयुष्यात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. प्रयत्न केला तर तुम्ही अशक्य वाटणारी ही गोष्ट साध्य करु शकता. हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल. कॉस्मेटिक्स क्वीन म्हणून ओळल्या जाणाऱ्या मीरा कुलकर्णी यांना हे वाक्य तंतोतंत लागू होतं. मीरा या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. भारतातील आघाडीची आयुर्वेद कंपनी फॉरेस्ट एसेंशियल्सच्या त्या सीईओ आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या पदावर पोहचण्यासाठी मीरा यांना अनेक संघर्षांचा सामना करावा लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- कर्तव्यपथावर ‘नारीशक्ती’चे दर्शन; १०० महिला वादकांसह तिन्ही सैन्यदलांतील महिलांच्या चित्तथरारक कवायती!

वयाच्या केवळ २० व्या वर्षी मीरा यांचे लग्न झाले. लग्नानंतर मीरा यांच्या पतीला त्यांच्या व्यवसायात अडचणी येऊ लागल्या आणि त्यांना दारूचे व्यसन लागले. मीरा पतीपासून विभक्त झाल्या. त्यावेळी मीरांच्या पदरी दोन मुलं होती. मीरा २८ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले अन् त्या एकट्या पडल्या. मात्र, या संकट काळातही मीरा खचून गेल्या नाहीत. त्यांनी येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे संधी म्हणून पाहिले अन् आयुष्यात पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मीरा यांनी मीरा यांनी भारतीय आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- देशातील पहिल्या महिला माहूत पार्वती बरुआ यांना पद्मश्री पुरस्कार; पुरुषप्रधान क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या “हत्तींच्या राणी”ची गोष्ट

वयाच्या ४५ व्या वर्षी मीरा यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी मेणबत्ती बनवण्याचा व्यवसाय केला. त्यानंतर हळूहळू त्यांनी हाताने बनवण्यात आलेले साबण विकण्यास सुरुवात केली. २००० साली मीरा यांनी फॉरेस्ट एसेंशियल्स (Forest Essentials) या कंपनीची स्थापना केली. फॉरेस्ट एसेंशियल्स नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने तयार करणारी भारतातील आघाडीची आयुर्वेद कंपनी आहे. सुरुवातीला मीरा यांनी आधुनिक बायोकेमिस्ट आणि हर्बलिस्टच्या मदतीने विविध उत्पादने तयार केली. यामध्ये चेहरा, शरीर, केस, मेकअप तसेच लहान मुलांसंबंधित उत्पादनांचा समावेश आहे.

हेही वाचा- पंजाबच्या ‘ड्रोन दीदी’, ग्रामीण भागातील महिलांना मिळालं उत्पन्नाचं नवं साधन! जाणून घ्या ‘या’ योजनेविषयी

सुरुवातीला त्यांनी एका छोट्या गॅरमध्ये आपल्या कंपनीची सुरुवात केली पण जस जश्या उत्पादनांच्या ऑर्डर्स येऊ लागल्या तस तसा कंपनीचा विस्तार वाढत गेला. सुरुवातीला एका छोट्या गॅरेजमध्ये सुरु करण्यात आलेले ऑफिसला मोठ्या व आलिशान जागेत स्थलांतरीत करण्यात आले. हळूहळू भारतातील २८ शहरांमध्ये फॉरेस्ट एसेंशियल्स कंपनीने आपल्या शाखा उघडल्या. २००८ मध्ये मीरा यांनी एस्टी लॉडर कंपनीबरोबर करार केला. त्यानंतर मीरा यांनी एस्टी लॉडर कंपनीच्या भागीदारही बनल्या. केवळ २ कर्मचाऱ्यांच्या मदतीने मीरा यांनी फॉरेस्ट एसेंशियल्स कंपनीची सुरुवात केली. आज भारतात या कंपनीचे ११० हून अधिक शाखा आहेत.

हेही वाचा- भारतात मुलींचे हक्क, अधिकारांबाबत उदासीनता! ‘तिचे’ हिंसाचार, कुपोषण, बलात्काराच्या घटनांमधून कसे होईल संरक्षण?

मीरा यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुसस्कराने गौरविण्यात आले आहे. फॉर्च्यून मासिकामध्ये त्यांचा भारतातील व्यवसायातील सर्वात शक्तिशाली महिला म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. कोटक वेल्थ हुरुन यानी जाहीर केलेल्या अहवालानुसार मीरा यांचा समावेश भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत होतो. त्यांची एकूण संपत्ती १ हजार २९० कोटी रुपये आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet indias richest women mira kulkarni who found an indian ayurvedic brand that became a global sensation forest essentials dpj