Richest Indian woman CEO: कौटुंबिक व्यवसाय चालविण्यासाठी मुलगाच सक्षम आणि अधिक योग्य आहे, हा पूर्वापार चालत आलेला समज आता कायमचा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. समाजाने कितीही प्रगती केली असली तरी मुलगी हे परक्याचे धन मानणारी अनेक मंडळी आजही मान वर करून मिरवताना दिसतात. मात्र, गेल्या काही दिवसांतील उदाहरणे पाहिली असता, कौटुंबिक व्यवसाय चालविण्यासाठी पुढच्या पिढीतील मुलांऐवजी मुलींवरच विश्वास टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पित्याच्या उद्योगाचा मुलींनी सांभाळणे आपल्या देशातही काही नवीन बाब राहिलेली नाही. देशातील अनेक बड्या उद्योगपती घराण्यांनी मोठ्या विश्वासाने ही परंपरा मुलींच्या हाती सोपवली आहे. ‘रिलायन्स उद्योगसमूहा’च्या मुकेश अंबानी यांच्यापासून ते उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांच्यापर्यंत सर्वच भारतीय उद्योगपतींची नावे आपण या ना त्या कारणाने नेहमीच वाचतो, ऐकतो. चला तर मग आज जाणून घेऊ भारतातील सर्वांत श्रीमंत महिला सीईओ विनीता गुप्ता यांच्याबद्दल…

कोण आहेत? विनीता गुप्ता

गेल्या काही दशकांमध्ये भारतामध्ये करोडपती महिला सीईओंच्या संख्येत वाढ झाली आहे. आज अनेक भारतीय महिला आहेत ज्या अब्जावधी डॉलरच्या जागतिक कंपन्यांचे नेतृत्व करतात. भारतातील सर्वांत श्रीमंत महिला सीईओंपैकी एक म्हणजे ’ल्युपिन फार्मा’च्या विनीता गुप्ता. ‘ल्युपिन लिमिटेड’चे संस्थापक देशबंधू गुप्ता यांची मुलगी म्हणजे विनीता गुप्ता. सध्या त्या ‘ल्युपिन’च्या अध्यक्ष व सीईओ आहेत. सप्टेंबर २०१३ मध्ये त्या कंपनीत दाखल झाल्या. त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत अनेक कंपन्यांचे ‘ल्युपिन’मध्ये विलीनीकरण करण्यात आले; त्यामुळे कंपनीच्या एकूण उलाढालीत नव्या कंपन्यांचा वाटा जवळपास ४० टक्के आहे. ‘फोर्ब्ज एशिया’च्या टॉप ५० महिला उद्योगपतींमध्ये विनीता गुप्ता यांचा समावेश झाला आहे.

कंपनीची स्थापना त्यांचे दिवंगत वडील देशबंधू गुप्ता यांनी १९६८ मध्ये केली होती. विनीता गुप्ता यांनी १९९२ मध्ये ल्युपिन येथे व्यवसाय विकास संचालक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. विनीताने कौटुंबिक व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत जागतिक विस्ताराला चालना दिली. विनीता या ल्युपिनच्या यूएस उपकंपनीच्याही अध्यक्षा आहेत; तर भाऊ नीलेश गुप्ता व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतो. तसेच आई मंजू गुप्ता अध्यक्षपदावर आहेत.

हेही वाचा >> सोळाशे रुपयांच्या पेन्शनसाठी केरळ सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या ८७ वर्षीय मारियाकुट्टी!

६३,७५० कोटींच्या कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या विनीत गुप्ता

विनीता गुप्ता यांच्या ल्युपिन फार्माचे बाजार भांडवल ६३,७५० कोटी रुपये आहे. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार विनीता यांचे आर्थिक वर्ष २०२२-२३ चे मानधन १०.९ कोटी रुपये होते. त्यांनी २०२२ मध्ये ३,६४० कोटी रुपयांच्या वैयक्तिक संपत्तीसह श्रीमंत महिलांच्या यादीत स्थान पटकावले. फोर्ब्सच्याही २०२३ च्या श्रीमंतांच्या यादीनुसार विनीता गुप्ता यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे २४,२०० कोटी रुपये इतकी आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet one of indias richest woman ceos leads rs 63000 crore company check her salary net worth srk