Success Story: भारतीय प्रशासकीय सेवेत उच्च अधिकारी म्हणजे आयएएस अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणारी असंख्य मुले-मुली अगदी बहुतेक कॉलेज शिक्षणापासूनच यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला लागतात. त्यासाठी विशेष कोचिंग क्लास लावले जातात. आजकाल तर अगदी दिल्लीत जाऊन विशेष कोचिंग क्लासमध्ये जाऊन याची तयारी केली जाते. तरीही पहिल्याच फटक्यात यात यश मिळण्याची हमी नसते. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. यूपीएससी परीक्षेचे तीन टप्पे असतात. आधी प्रिलिम्स, मग मेन आणि शेवटी मुलाखत. अनेक जण वर्षानुवर्षे कोचिंग घेतात, पण ही परीक्षा पास होऊ शकत नाहीत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. मात्र, सिक्कीमच्या पहिल्या महिला आयपीएस अपराजिता राय यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिक्कीमच्या पहिल्या महिला आयपीएस अपराजिता राय यांनी २०१० आणि २०११ मध्ये यूपीएससी परीक्षेचा प्रयत्न केला आणि दोन्ही प्रयत्नांमध्ये त्या यशस्वी झाल्या. याव्यतिरिक्त, ड्रग्ज आणि सोन्यासारख्या प्रतिबंधित वस्तूंच्या तस्करीची प्रकरणे सोडवल्याबद्दल त्यांची प्रशंसाही केली जाते. चला तर मग त्यांचा हा प्रवास जाणून घेऊयात.

आयपीएस अपराजिता राय कारकीर्द

आयपीएस अपराजिता राय यांना पोलिस अकादमीमध्ये त्यांच्या सखोल प्रशिक्षणादरम्यान अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जे त्यांच्या नोकरीबद्दलच्या समर्पणाचा दाखला देतात. अपराजिता राय १९५८ च्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बॅचमधल्या सर्वोत्कृष्ट लेडी आउटडोअर प्रोबेशनरसारख्या काही खरोखर प्रतिष्ठित पुरस्कारांच्या मानकरी आहेत. त्यांना श्री उमेशचंद्र करंडक पुरस्कारदेखील मिळला आहे, जो अतुलनीय मैदानी लढाईचे प्रतीक आहे. एवढंच नाही तर पश्चिम बंगालच्या सरकारचाही करंडक पुरस्कार त्यांना मिळाला होता.

आयपीएस अपराजिता राय यांचा प्रवास

अपराजिता यांनी अगदी लहान वयातच आई रोमा राय हिला गमावले. लहान वयातच मायेचे छत्र हरवल्याने आयुष्यात खूप लवकर संघर्ष आला. लहानपणीच त्यांना सरकारी कर्मचारी लोकांशी कशा पद्धतीने वागतात याची जाणीव झाली. त्यानंतर अगदी लहान वयातच त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. शाळेत असताना २००४ मध्ये ICS बोर्डात अपराजिता यांनी ९५ टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशियल सायन्सेसमधून बीए एलएलबी (ऑनर्स) पदवी मिळविली आणि राष्ट्रीय प्रवेश परीक्षेत विजय मिळवला. पुढे सार्वजनिक प्रशासन आणि न्यायशास्त्रात सुवर्ण पदकेही त्यांनी पटकावली. त्यानंतर २००९ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत त्यांना अपयश आले, मात्र तरीही त्या डगमगल्या नाहीत. पुढच्या प्रयत्नात अपराजिता राय यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत आणखी एक धाडसी प्रयत्न केला आणि ७६८ गुण मिळवले. मात्र, अपराजिता त्यांच्या या यशावर समाधानी नव्हत्या, त्यामुळे त्यांनी २०११ मध्ये पुन्हा एकदा स्वतःला आव्हान दिले, त्यांनी सलग तिसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि ३५८ वा क्रमांक पटकावला.

हेही वाचा >> बॅडमिंटन व्हाया क्रिकेट! नित्या श्री सिवनची कमाल; पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं कास्यपदक

सध्या अपराजिता राय पश्चिम बंगाल केडरमध्ये कार्यरत

सध्या अपराजिता राय पश्चिम बंगाल केडरमध्ये एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात. त्या सध्या उत्तर बंगालमधील सिलीगुडी येथे SS, IB म्हणून तैनात आहेत. या नोकरीमध्ये मोठी जबाबदारी असते, मात्र यामधूनही वेळ काढून अपराजिता यांनी अखिल भारतीय पोलिस बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले आहे. असा छोट्याशा गावातून सुरू झालेला सिक्कीमच्या पहिल्या महिला आयपीएस अपराजिता राय यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet sikkims first female ips officer who lost her mother at a young age cracked upsc twice success story of aparajita rai chdc srk