कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी चांगल्या शाळांची गरज आहे. सध्या सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत असलं तरीही अनेक सरकारी शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांना घालून त्यांचं करिअर धोक्यात आणण्यापेक्षा अनेक पालक अधिकची पदरमोड करून खासगी शाळांमध्ये मुलांचा प्रवेश करतात. अशाच पालकांच्या समस्या लक्षात घेऊन मुंबईत राहणाऱ्या स्मिता देवरा यांनी शैक्षणिक स्टार्टअप सुरू केले. या माध्यमातून त्यांनी LEAD (Leadership in Education and Development) शाळांची निर्मिती केली असून यामध्ये कमी उत्पन्न असलेल्या पालकांची मुले शिकतात. Financial Express या वृत्तसंकेतस्थळाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईकर असलेल्या स्मिता देवरा LEAD या स्टार्टअपच्या माध्यमातून प्रसिद्ध उद्योजिका ठरल्या आहेत. घरात काम करायला येणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांना ही संकल्पना सुचली. त्यांचे पती सुमित मेहता यांचीही एक वेगळी शाळा होती. कालांतराने या दोघांनी एकत्र येत एका स्टार्टअपची उभारणी केली. या स्टार्टअपच्या माध्यमातून ते आता ५०० शहरांमधील ५ हजार परवडणाऱ्या खाजगी शाळांचे भागीदार आहेत. त्यांच्याकडे २ हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात.

हेही वाचा >> हे आहेत भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे टॉप ५ सीईओ, जाणून घ्या त्यांना पगार किती?

गेल्या काही वर्षांत शिक्षक भरती रखडल्याने अनेक शाळांमध्ये चांगल्या शिक्षकांची वानवा आहे. परंतु, अनेक बेरोजगार तरुण आहेत, ज्यांना नोकरीची गरज आहे. कोणताही पदवीधर विद्यार्थी चांगला शिक्षक बनू शकतो, असं लिडचं उद्दीष्ट आहे. बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याच्या आणि विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण देण्याच्या उद्देशाने लिडची स्थापना करण्यात आली आहे.

कशी झाली सुरुवात?

स्पर्श ही सामाजिक संस्था सुरू केली होती. या संस्थेतून त्यांनी १६ अंगणवाड्यांमध्ये नवे प्रयोग करून पाहिले. हे प्रयोग यशस्वी ठरल्यानतंर त्यांनी २०१२ साली लिडची स्थापना केली. चांगलं शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा हक्क पाहिजे या उद्देशाने लिडची सुरुवात केली. त्यांनी अहमदाबाद येथे पहिली शाळा सुरू केली. या शाळेत तेव्हा केवळ १४ विद्यार्थी होती. आज देशभरातील एकूण शाळांमध्ये २५ हजार शिक्षक आहेत, तर १२ लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत.

मुख्य उद्दीष्ट्य काय?

ELGA (English Language and General Awareness) हे या लिडचं मुख्य उद्दीष्ट्य आहे. येथे इंग्रजी भाषा एक कौशल्य म्हणून शिकवली जाते. ELGA या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कमी कालावधीत इंग्रजी भाषेची कौशल्य आत्मसात करण्यास मदत करते. त्यामुळे पुढे शिकण्यास विद्यार्थ्यांना सोपं जातं.

स्मिता देवरा यांच्या कंपनीचा २०२१-२२ मध्ये १३३ कोटींचा महसूल होता. तर, २०२६ पर्यंत त्यांनी ६० हजार शाळा, अडीच कोटी विद्यार्थी लिडच्या माध्यमातून शिकवण्याचं उद्दीष्ट्य ठरवलं आहे. एलेव्हर इक्विटी आणि वेस्टब्रिज कॅपिटलसारख्या गुंतवणूकदारांच्या सहकार्याने देवरा त्यांचा व्यवसाय वाढवत आहेत.