मनोरंजन विश्वात आपलं स्वत:चं नाव, आपली ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कोणाच्याही पाठबळाशिवाय ‘सेल्फमेड स्टार’ बनणं आजच्या घडीला अजिबात सोपं नाहीये. अशीच एक अभिनेत्री जी एकेकाळी पैसे वाचवण्यासाठी केवळ दिवसातून एकदा जेवत होती तिच अभिनेत्री आजच्या घडीला आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण झाली आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान आणि शाहरुख खान यांच्यासारख्या बड्या सुपरस्टारबरोबरचे सिनेमे तिने नाकारले… इंडस्ट्रीत कोणताही पाठिंबा नसताना तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखलं जातं. ही अभिनेत्री दुसरी – तिसरी कोणीही नसून समांथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) आहे.

हेही वाचा : मुकेश अंबानींच्या थोरल्या सूनेची कोण आहे स्टायलिश? नातं आहे खूपच खास, जाणून घ्या…

संघर्षावर मात करत झाली आघाडीची अभिनेत्री

समांथा रुथ प्रभूला ( Samantha Ruth Prabhu ) दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. मात्र, एकेकाळी तिच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणते, “जेव्हा माझं शिक्षण सुरू होतं त्यावेळी माझ्या आई-बाबांनी मला सांगितलं होतं की, खूप अभ्यास कर आणि मोठी होऊन दाखव… मी मनापासून अभ्यास केला. दहावी, बारावी पुढे कॉलेज पूर्ण झालं. पण, त्यानंतरच्या शिक्षणासाठी माझ्या पालकांकडे पैसे नव्हते. त्यांना कॉलेजची फी परवडण्याजोगी नव्हती. त्यामुळे माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नसायचे. मी जवळपास २ महिने दिवसातून फक्त एकदा जेवायचे. शिक्षण सुरू असताना मी काही ठिकाणी नोकऱ्या देखील केल्या.”

हेही वाचा : IAS टीना डाबी यांच्या आईबद्दल जाणून घ्या; UPSC उत्तीर्ण होऊन झाल्या IES अधिकारी, नंतर घेतली स्वेच्छानिवृत्ती कारण…

समांथाने ( Samantha Ruth Prabhu ) १४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. यानंतर अभिनेत्रीने ‘डूकुडू’, ‘ईगा’, ’24’, ‘कठ्ठी’, ‘जनता गॅरेज’, ‘थेरी’, ‘रंगस्थलम’ असे बॅक टू बॅक सुपरहिट सिनेमे दिले आणि कालातरांने समांथा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. आता ती प्रत्येक चित्रपटासाठी जवळपास २ ते ३ कोटींच्या घरात मानधन आकारते. मनोज बाजपेयींच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमुळे समांथा रातोरात देशभरात लोकप्रिय झाली.

समांथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu )

समांथाला शाहरुखच्या ‘जवान’ची ऑफर देण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे अभिनेत्रीने हा चित्रपट नाकारला होता. यानंतर ‘जवान’ची प्रमुख भूमिका नयनताराच्या वाट्याला आली. एकेकाळी पैशासाठी संघर्ष करणारी ही अभिनेत्री आता आलिशान जीवन जगत आहे. ८ तासांची नोकरी करून ५०० रुपये पहिला पगार घेणारी समांथा ( Samantha Ruth Prabhu ) आता सुपरस्टार अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रिपोर्ट्सनुसार तिच्याकडे ८० कोटींचं घर आहे. तर, तिची एकूण संपत्ती १०१ कोटींच्या घरात आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meet south actress who rejected srk film once struggle for food and now her networth is 100 crores chdc sva 00