Success story : आजही अनेकांकडून मुलाच्या जन्मासाठी अट्टहास धरला जातो. मुलगाच हवा अशा मानसिकतेची अनेक उदाहरणे दिसून येतात. मात्र, या वृत्तीला छेद देत मुलीसुद्धा वंशाचे नाव उंचावू शकतात हे दाखवून देणारे अलीकडचे उत्तम उदाहरण म्हणजे आयएएस अंकिता पनवार. तरुणांना आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याची आणि नंतर उत्तरोत्तर मस्त लाखोंची पॅकेजेस मिळविण्याची आकांक्षा असते. परंतु, काही लोक आर्थिक बाजूला महत्त्व न देता, अर्थपूर्ण ध्येये आणि महत्त्वाकांक्षांना अधिक महत्त्व देतात. अशीच एक प्रेरणादायी कथा आहे आयएएस अंकिता पनवारची.

भरगच्च पगाराची नोकरी आणि मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु असेही काही लोक आहेत, ज्यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून आपल्या आवडीचे काम सुरू केले आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका तरुणीविषयी सांगणार आहोत.

Success Story Of IAS Siddharth Palanichamy
Success Story: यूपीएससीच्या अभ्यासासाठी सोशल मीडियाची मदत; पहिल्याच प्रयत्नात भरघोस यश; वाचा, देशातील सर्वांत तरुण IAS ची गोष्ट
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Success Story of a man Who Started Mushroom Farming Business With His Mother
Success Story : मायलेकाने केली कमाल! दररोज कमावतात ४० हजार रुपये; जाणून घ्या, कोणता व्यवसाय करतात?
Success Story Of IPS officer Nitin Bagate
Success Story: प्रयत्नांती परमेश्वर! एकेकाळी SP कार्यालयाबाहेरील भाजीविक्रेता आज तेथेच डीएसपी पदावर कार्यरत; वाचा, ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट…
Success Story Of Krishna Arora In Marathi
Success Story: कोण आहे कृष्णा अरोरा? ज्याने २५ व्या वर्षी खरेदी केली स्वतःची करोडोंची कार; वाचा, ‘त्याची’ गोष्ट
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Nahar brothers success story
Success Story: इंजिनिअर भाऊ झाले व्यावसायिक; करोना काळात सुरू केलेला व्यवसाय आता १०० कोटींच्या घरात पोहोचला
Bhabha Atomic Research Centre
नोकरीची संधी

जिंद जिल्ह्यातील गोसाई गावातील अंकिताने चंदिगडमध्ये १२वी उत्तीर्ण केल्यानंतर ९७.६ टक्के गुण मिळवून यूपीएससीचा प्रवास सुरू केला. जेईई उत्तीर्ण झाल्यानंतर तिने IIT रुरकी येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर तब्बल २२ लाख रुपयांच्या पॅकेजसह कॅम्पस प्लेसमेंट मिळवली.

२२ लाख पगाराची नोकरी सोडून तिनं UPSC चा मार्ग

दोन वर्षे व्यवस्थित नोकरी केल्यानंतर २२ लाख पगाराची नोकरी सोडून अंकिताने स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवले. परंतु, पहिल्या प्रयत्नात ती यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यात अयशस्वी झाली. त्यानंतर २०२० मध्ये तिने दुसऱ्यांदा यूपीएससी परीक्षा दिली आणि ३२१ वी रँक मिळवली; पण तिची ध्येयं मोठी होती. तिने पुन्हा परीक्षा दिली आणि २०२२ मध्ये चौथ्या प्रयत्नात तिने २८ व्या रँकसह यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

अपयश म्हणजे अंत नाही

भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न असंख्य मुले-मुली पाहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशात सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. त्यासाठी दिवस-रात्र ते प्रचंड मेहनतही घेतात. काही जण कॉलेजमध्ये शिकत असल्यापासूनच यूपीएससी परीक्षेच्या तयारीला लागतात. बऱ्याचदा काहींना यात लवकर यश मिळत नाही; पण काही जण असेदेखील असतात, जे मेहनतीच्या जोरावर पहिल्या प्रयत्नातच यश मिळवितात.

हेही वाचा >> Women in Space: अंतराळात महिला मासिक पाळीचे व्यवस्थापन कसे करतात?

कामाव्यतिरिक्त अंकिताचे वैयक्तिक आयुष्यही खूप मनोरंजक आहे. अलीकडेच तिने हरियाणातील पंचकुला येथे एका खासगी समारंभात आयपीएस आयुष यादवसोबत अँगेजमेंट केली. आयुष हा नारनौल जिल्ह्याजवळील थाठवाडी गावचा रहिवासी आहे आणि २०२१ मध्ये ४३० वा क्रमांक मिळवून तो आयपीएस अधिकारी झाला.

Story img Loader