आयएएस अधिकारी होणे हे अनेकांचे स्वप्न आहे. UPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात. UPSC परीक्षा तीन टप्प्यात विभागली आहे: प्राथमिक, मुख्य आणि मुलाखती. ही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एखादी व्यक्ती अनेक तास अभ्यास करते. दरवर्षी हजारो उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा(IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) आणि (भारतीय पोलीस सेवा) IPS होण्यासाठी परीक्षा देतात. त्यापैकी काही मोजकेच सर्वात स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी होतात. २०२० च्या बॅचमधील IPS अधिकारी अनुकृती शर्माबद्दल जाणून घेऊ या, जी मूळची राजस्थानच्या अजमेरची आहे. तिची आई शिक्षिका होती, तर तिचे वडील २०-पॉइंट विभागात तैनात होते.

कोण आहे अनुकृती शर्मा?

अनुकृतीने तिचे शालेय शिक्षण जयपूरमधील इंडो भारत इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमधून बीएसएमएसचे शिक्षण घेतले.

Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
vinoba bhave, vinoba bhave life, vinoba bhave work,
ज्ञानयोगी विनोबांचे स्मरण
Success Story of Inder Jaisinghani
Success Story Of Inder Jaisinghani: शून्यातून घडविले विश्‍व! चाळीपासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपर्यंत… वाचा इंदर जयसिंघानी यांची गोष्ट
Eknath SHinde Ravi Rana
Eknath Shinde : महायुतीत बिनसलं? शिंदे, पवारांचा रवी राणांवर संताप; मुख्यमंत्री म्हणाले, “युतीत मिठाचा खडा…”
Success Story Of Manmohan Singh Rathore
Success Story Of Manmohan Singh Rathore: आईसाठी सोडली सैन्याची नोकरी, एका सहलीने बदललं आयुष्य; वाचा मनमोहन सिंग राठोड यांची परिश्रम अन् समर्पणाची गोष्ट
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
IAS Ramesh Gholap Success Story
Success Story: वडिलांच्या निधनानंतर आईबरोबर विकल्या बांगड्या आणि मेहनतीच्या जोरावर झाले IAS अधिकारी

शिक्षण आणि लग्न

अनुकृतीची विद्यार्थिनी असताना बनारसच्या वैभव मिश्रासह भेट झाली. हळूहळू त्यांची मैत्री घट्ट होत गेली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांची पीएच.डी.साठी निवड झाली. २०१२ मध्ये ह्यूस्टन, टेक्सास येथील राइस युनिव्हर्सिटीमध्ये कार्यक्रमामध्ये वैभवने अनुकृतीला त्याच्याबरोबर अमेरिकेला जाण्याची त्याची इच्छा जाहीर केली. त्यांच्या घरच्यांनी त्यांना आधी लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे २०१३ मध्ये त्यांचे लग्न झाले.

हेही वाचा – The Sky Queen: कॅन्सरवर मात करून सुरू केला स्वतःचा व्यवसाय अन् झाली करोडो रुपयांची मालकीण

नासामधील नोकरी सोडून भारतात परतली

अमेरिकेत डॉक्टरेटचे शिक्षण घेत असताना तिला नोकरीची संधी मिळाली. तिला नासाने ज्वालामुखीच्या संशोधनासाठी ५० लाख रुपयांच्या पगाराच्या पॅकेजवर नियुक्त केले होते. मात्र, काही काळानंतर ती भारतात परतली.

नागरी सेवेची तयारी केली सुरू

अनुकृतीने २०१४ राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) चाचणीत २३वे स्थान मिळविले. त्यानंतर बनारसमध्ये राहून अनुकृती आणि तिचा पती वैभव यांनी नागरी सेवेची तयारी सुरू केली. UPSC ची तयारी करत असताना अनुकृती आणि तिच्या पतीने एकमेकांना मदत केली.

हेही वाचा – तीन ते चार क्षेत्रांत केलं काम; दहा हजारात सुरू केला व्यवसाय; असा आहे पद्म पुरस्कारानं सन्मानित शशी सोनी यांचा प्रेरणादायी प्रवास

अपयशामुळे खचली नाही अनुकृती

२०१५ मध्ये, अनुकृती आणि तिचा पती वैभव यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली. पण तिने मुख्या परीक्षा उतीर्ण झाली नाही. केवळ प्राथमिक परीक्षा उतीर्ण झाली. दुसऱ्या प्रयत्नातही ती प्राथमिक परीक्षेत नापास झाली. तिसऱ्या प्रयत्नात ती मुलाखतीच्या टप्प्यावर आली, पण, तिची निवड झाली नाही.

IRS झाल्यानंतरही पूर्ण केले IPS अधिकारी होण्याचे स्वप्न

अनुकृतीची २०१८ मध्ये भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) चौथ्या प्रयत्नात ३५५वे स्थान मिळवल्यानंतर निवड झाली. पण आयपीएस होणं हेच ध्येय होतं. २०२० मध्ये, अनुकृतीने आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी पाच वेळा यूपीएससीकडे अर्ज केला. त्यानंतर तिने लखनऊमध्ये आयपीएस ट्रेनी म्हणून काम केले. आयपीएस शर्मा आता बुलंदशहरचे सहायक पोलिस अधीक्षक आहेत. अनुकृतिचा जोडीदार वैभव हा दिल्लीतील एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक आहे.