एक काळ असा होता की, व्यवसाय करणं आणि त्यात प्रगती करणं हे फक्त पुरुषांचं काम मानलं जात होतं; परंतु बदलत्या काळात ही व्याख्याही बदलली आहे. नुकतंच फोर्ब्सनं जगातल्या १०० शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केली. त्यामध्ये निर्मला सीतारामन यांना ३२ व्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. फोर्ब्सच्या यादीमध्ये अर्थमंत्र्यांसह अन्य तीन भारतीय महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सोमा मंडल या आता ७० व्या स्थानावर आहेत. सरकारी मालकीच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL)च्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला होत्या. इंडस्ट्रीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ‘स्टीलची राणी’ म्हणूनही ओळखलं जातं.

कोण आहेत सोमा मंडल?

Sumit Wankhede Arvi Constituency, Sumit Wankhede,
भाग्य फळफळले! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दोन सचिवही निवडणुकीच्या रिंगणात
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Sharad Pawar and Fahad Ahmad
Fahad Ahmad : शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक! स्वरा भास्करचा पती निवडणुकीच्या रिंगणात, नवाब मलिकांच्या लेकीविरोधात लढणार
Russian Modi Industry group company Tata Steel Career
बाजारातली माणसं – पोलाद घडवणारे धारदार व्यक्तित्व : रुसी मोदी
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
MNS Fourth List
MNS Fourth List : मनसेची चौथी यादी जाहीर कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ उमेदवाराला तिकिट
Ashok Chavan daughter, Tirupati Kadam, Bhokar,
भोकरममध्ये अशोक चव्हाणांच्या कन्येला तिरुपती कदमांचे आव्हान
Bigg Boss 18 avinash Mishra rajat dalal muskan bamne nyra Banerjee Vivian dsena nominated
Bigg Boss 18 : श्रुतिका झाली ‘बिग बॉस’ची लाडकी, मिळाला मोठा अधिकार; तिसऱ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

भुवनेश्वरमधील बंगाली मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या सोमा मंडल यांनी ४१.०७ कोटी भांडवल असणाऱ्या कंपनीचं नेतृत्व केलं. सोमा मंडल यांना या उद्योगात तीन दशकांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी एनआयटी राउरकेला येथून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे वडील कृषी अर्थतज्ज्ञ होते. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली; तर २०१७ मध्ये सोमा मंडल यांच्याकडे कंपनीच्या संचालकपदाची जबाबदारी आली.

अध्यक्षपदी निवड अन् ४१.०७ कोटींचे भांडवल

मार्च २०२१ मध्ये त्यांची स्टॅण्डिंग कॉन्फरन्स ऑफ पब्लिक एंटरप्रायझेस (SCOPE) या केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या या उद्योगात यांमुळे महत्त्वपूर्ण बदल झाला. तसेच असंख्य महिलांना या क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सोमा मंडल या पहिल्या महिला ठरल्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोमा मंडल यांच्या नेतृत्वाखाली सेलनं सतत मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. पहिल्याच वर्षात कंपनीच्या नफ्यामध्ये तब्बल तीन पटींनी वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सोमा मंडल यांनी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवले. त्यांनी ऑपरेशनल कार्यक्षमता, तांत्रिक प्रगती व बाजारपेठेच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले; ज्यामुळे कंपनीला उल्लेखनीय यश मिळालं. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीचे बाजार भांडवल ६ डिसेंबर २००३ पर्यंत ४१.०७ कोटी इतकं वाढलं.

हेही वाचा >> १५ चित्रपटांमध्ये काम करून UPSC साठी सोडली फिल्म इंडस्ट्री, पाच अपयशानंतर झाली IAS अधिकारी

कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय

कोरोना काळात आर्थिक मंदी आलेली असली तरी कंपनीत कंटिन्युटी होती. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयानं काहीही शक्य आहे. त्याची आठवण करून देणारा सोमा मंडल यांचा प्रवास आशा आणि प्रोत्साहन दाखविणारा किरण आहे.