लग्नाच्या रुखवतात भातुकलीचा खेळ, भांडी-कुंडी, शोभेच्या वस्तू अशा खूप गोष्टी असतात, पण माझ्या लग्नाच्या रुखवतात शिक्षणाच्या डिग्रीची भर पडेल! आता तुम्ही म्हणाल, शिक्षणाची डिग्री शोभेची वस्तू आहे का रुखवतात ठेवायला? ज्याप्रकारे आजच्या एकविसाव्या शतकात महिलांकडे केवळ एक शोभेची बाहुली म्हणून पाहण्याची मानसिकता अजूनही अस्तित्वात आहे; अगदी त्याचप्रकारे माझ्या शिक्षणावर बोट ठेवत माझ्या डिग्रीची शोभा करण्यात आली, त्याचाचं हा किस्सा…

हेही वाचा : “कॉलेजच्या मॅडमकडे मंगळसूत्र मागितले अन्…”, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्रीने सांगितला नाटकाच्या प्रयोगाचा किस्सा

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Narendra Modi statement regarding the middle class in a meeting in Pune news
पंतप्रधानांची मध्यमवर्गाला साद; ‘मध्यमवर्गाची प्रगती होते, तेव्हा देश प्रगती करतो’; पुण्यातील सभेत विधान
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…

अलीकडेच मी विद्यापीठात माझ्या मास्टर्स डिग्रीचे प्रमाणपत्र आणण्यासाठी दुपारी १२.३० च्या सुमारास गेले होते. मुख्य समारंभाला उपस्थित राहणे शक्य नसल्याने मी आठवड्यानंतर गेले. संबंधित शैक्षणिक विभागात जाऊन मी समोर बसलेल्या काकांना याबाबत कल्पना दिली. सगळ्या मार्कशीट दाखवल्या, सही केली त्यानंतर काका जीवावर आल्यासारखे उठले आणि त्यांनी कपाट उघडले. पुढे कपाटातून सर्टिफिकेट काढले आणि माझ्या हातावर ठेवले. त्यांनी नाव तपासण्यास सांगून दुसऱ्या हातात डिग्री ठेवण्यासाठी एक मोठा लिफाफा दिला. मी धन्यवाद बोलून निघणार तेवढ्यात ते म्हणाले, “काय करणार एवढ्या शिक्षणाचं ? पुढे डिग्री लग्नाच्या रुखवतात ठेवणार का?”

हेही वाचा : Ajmer 92 : “तरुणींचे अपहरण, बलात्कार अन्…”, ३१ वर्षांपूर्वी २५० मुलींबरोबर काय घडलं? ‘अजमेर ९२’ चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

दोन मिनिटांसाठी मी शांत झाले आणि लगेच म्हणाले याच्याशी तुमचा काही संबंध नाही, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. कदाचित, तुम्हाला मुलगी नसेल किंवा लंच टाइमला काहीच वेळ शिल्लक असताना मी आले यामुळे तुम्ही असं काहीतरी बरळत आहात. माझं सडेतोड उत्तर ऐकून ते गप्प बसले आणि चारचौघात अजून अपमान नको म्हणून “मी सहज म्हणालो” असं सोयीस्कर उत्तर देत त्यांनी सगळ्या प्रसंगातून काढता पाय घेतला. अर्थात, अशा विचारांच्या लोकांना सगळीकडूनच पळून जावं लागतं तो भाग वेगळा!

तिथून घरी आल्यावर सगळा प्रसंग मी माझ्या आई-वडिलांना सांगितला. त्यावर आईने सर्वप्रथम रुखवतात एखादी गोष्ट ‘ठेवणं’ आणि ‘सजवणं’ यातील फरक स्पष्ट करीत एक प्रसंग सांगितला, तिची चुलत बहीण गिर्यारोहण करायची, तिलाही अशा बऱ्याच प्रसंगांचा सामना करावा लागला होता. तिने तिच्या लग्नाच्या रुखवतात गिर्यारोहणाचे सर्व साहित्य अभिमानाने सजवले होते आणि तिच्या सासरच्यांना माझ्या या वस्तू हीच तिची ओळख असल्याचे स्पष्टपणे सांगितले. अर्थात याबद्दल तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे परंतु, अशाने प्रश्न सुटत नाहीत, आजच्या काळात मुलींना तुझी डिग्री तू रुखवतात मांडणार का? असा प्रश्न विचाणाऱ्यांची खरंच कीव करावीशी वाटते.

हेही वाचा : “‘गदर’च्या सेटवर सलग ३० तास काम केले” अमीषा पटेलचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “दिग्दर्शक अनिल शर्मांचे…”

आजही समाजात मुलगी शिकून काय करणार? लग्नानंतर तिला चूल-मुल सांभाळायचंय शेवटी शिक्षणाला कोण विचारणार? ही मानसिकता अस्तित्वात आहे. यामध्ये दोष स्त्रीला विशिष्ट चौकटीत बांधणाऱ्या समाजाचा आहे.

आजही लग्न करताना मुलीने नोकरी करू नये ही प्रमुख अट असते आणि अशा लोकांमुळेच मुलींना आपल्या शिक्षणावर पाणी सोडावे लागतं. त्यामुळे मुलींनो, समाजाची मानसिकता बदलेल किंवा नाही, याचा विचार न करता लग्न करताना तुम्ही फक्त स्वत:चा निर्णय घ्या. तुम्हाला तुमची डिग्री फक्त रुखवतात ठेवायची आहे की, आयुष्याची ओळख म्हणून सजवायची आहे याचा विचार तुम्हीच करा!