डॉ. लिली जोशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लहान मुलांचा ‘स्क्रीन टाइम’ वाढत चालला आहे, ही गोष्ट आता सगळ्यांच्याच लक्षात येतेय. एक वर्षाची बाळंसुद्धा नर्सरी ऱ्हाइमचे व्हिडीओ बघितल्याखेरीज जेवत नाहीत. घरात, हॉटेलमध्ये, सार्वजनिक ठिकाणी मुलांनी त्रास देऊ नये म्हणून आता सरसकट त्यांच्या आईच त्यांना मोबाइलवर व्हिडीओ लावून देतात. थोडी मोठी झाली नाहीत तोच त्यांचे व्हिडीओ गेम्स सुरू होतात. बहुतेक गेम्समध्ये मुलं एवढी रममाण होतात, की त्यांना आजूबाजूचं भान राहात नाही. आणखी थोड्या मोठ्या मुलांना आता वाढदिवसाला आय-पॅड मिळत आहेत. शाळेत अभ्यासासाठीच कॉम्प्युटर मिळत आहे. वर्गपाठ – गृहपाठ सर्रास कॉम्प्युटरवर केले जात आहेत. करोना महासाथीच्या तीन वर्षांत हा प्रकार आणखीच वाढला.
शहरी उच्चभ्रू वस्त्यांच्या पलीकडे, मध्यमवर्गीय शाळांमध्ये, कॉर्पोरेशन शाळांमध्ये, ग्रामीण भागात सर्वत्र इ-लर्निंग सुरू झालं. परिणामत: ज्या मुलांनी कधी मोबाइल हाताळले नव्हते, त्यांच्याही हातात आता स्मार्ट फोन आहे. ‘ऑन लाइन’ शाळांचे दिवस गेले, पण मुलांच्या स्क्रीन टाइममध्ये फार फरक पडलाय, असं दिसत नाही. उलट आता शुक्रवार संध्याकाळपासून रविवार रात्रीपर्यंत अखंड यज्ञ चालू असावा तसा मुलांच्या हातात कोणता ना कोणता इलेक्ट्रॉनिक स्क्रीन आला आहे. अवाजवी मोबाइल किंवा टी.व्ही. बघण्यामुळे बैठेपणा वाढतो आहे. शारीरिक हालचाल कमी होते. मैदानी खेळ, इतर ॲक्टिव्हिटीज बंद होतात. त्यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय ही गोष्ट गेल्या काही वर्षांत डॉक्टर्स तळमळीनं सांगत आहेत. शरीरात मेदाचा भाग किती असावा? मेदपेशी कधी आणि कशा वाढतात? जन्मापासून मूल १ वर्षाचं होईपर्यंत, त्यानंतर वयात येताना आणि तिसरा टप्पा म्हणजे गर्भवती अवस्था. एकदा या पेशी निर्माण झाल्या की त्यांची संख्या कायम राहते.
हेही वाचा… कागदाच्या लगद्यापासून रेखीव गणेशमूर्ती बनवणारे हात!
आपली जीवनशैली चुकीची असेल तर या पेशी मेदानं पुरेपूर भरतात, मोठ्या होतात. विशेषत: पोटाच्या आतल्या अवयवात हा मेद साचला की ‘भयंकर चांडाळचौकडी’ ‘द डेडली क्वार्टेट’ अशा गोष्टींची लागण माणसात दिसू लागते. ज्यामुळे त्याच्या आरोग्यावर, जीवनमर्यादेवर, सुदृढतेवर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो. या गोष्टी म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तात वाढलेला मेद (कोलेस्टेरॉल), अंतर्गत इन्शुलिनला विरोध, हृदयविकाराची शक्यता आणि अजून खूप काही. या सर्व लक्षणसमूहाला मेटॅबोलिक सिंड्रोम म्हटलं गेलं आणि त्याचा प्रादुर्भाव चाळिशीतल्या भारतीय पुरुषांमध्ये वेगाने होतोय. ही गोष्ट अनेक वर्षांपूर्वी संशोधकांपुढे आणि एकंदर समाजापुढेही आली. आज हा लेख लिहिण्याचं खास कारण म्हणजे आता अनेक बालरोगतज्ज्ञ संशोधक मुलांच्या वाढत्या लठ्ठपणाबद्दल पाहण्या व संशोधन करत आहेत आणि त्यांना नेमक्या याच गोष्टी आता लहान मुलांच्यात आढळून येत आहेत. याचा थेट संबंध मुलांच्या चुकीच्या जीवनशैलीशी आहे. आणि तिचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्क्रीन टाइम.
बाकीच्या कारणांची चर्चा आपण पुढच्या लेखात करू पण आत्ता स्क्रीनटाइमबद्दल-
- केवळ सोय म्हणून स्क्रीन आणि जेवण यांची सांगड घालू नका.
- मुलांनी पळापळ, दंगा करणं अपेक्षित आहे. ज्या ठिकाणी हे चालणार नसेल तिथे मुलांना नेऊच नका.
- मुलांना अभ्यासाला बसवून तुम्ही घरात टी.व्ही. बघत बसू नका.
- साप्ताहिक सुटीच्याच दिवशी मुलांना टी. व्ही. बघण्याची परवानगी द्या. या वेळेवरही बंधन असलं पाहिजे. जास्तीत जास्त २ तास. शाळा चालू असताना स्क्रीन (अभ्यासाव्यतिरिक्त) अजिबात नको.
- मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी क्लासेसमध्ये घाला. कोणतेही खेळ, कुंग फू, नृत्य किंवा वादन, बाइकिंग, रनिंग, जिम्नॅस्टिक्स वगैरे. तुम्ही स्वत: शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह राहा. मुलांसाठी रोल मॉडेल बना.
- मोबाइल किंवा कॉम्प्युटरचा उपयोग शिक्षण किंवा काम यासाठी असतो हे वारंवार मुलांना समजावून सांगा.
drlilyjoshi@gmail.com