सिद्धी शिंदे
What Is Metrosexual In Marathi: मुलं अनेकदा मुलींच्या दिसण्याबाबत चर्चा करतात, त्यावर नको असलेल्या व न मागितलेल्या कमेंटस् ही करतात हे आपणही अनेकदा अनुभवलं असेल. कधीकधी तर हे सौंदर्याचं कौतुक अश्लीलतेकडे वळून त्यातून अनेक न सांगता येणारे घृणास्पद प्रकारही घडले आहेत. पण सौंदर्य हे काही स्त्री पुरते मर्यादित नसतं, किंबहुना आपण सुंदर दिसावं हा हट्टही फक्त स्त्रियाच करतात असंही नाही. अलीकडे तरुणाईचा विशेषतः मुलांचा कल हा ‘मेट्रोसेक्श्युअॅलिटी’ कडे वाढत चालला आहे. आजवर आपण बायसेक्श्युअल, पॅनसेक्श्युअल असे प्रकार ऐकले असतील पण हा ‘मेट्रोसेक्श्युअल’ प्रकार म्हणजे नेमकं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, हो ना? आज आपण या तरुणाईत ट्रेण्डिंग असलेल्या शब्दाचा अर्थ जाणून घेणार आहोत.
एखादा देखणा, नाकी डोळी सुंदर असणारा तरुण पाहिला की एकदा का होईना भले लपून पण मागे वळून पाहिलं जातंच, अगदी मुलांकडूनही. काही जण अशावेळी त्याच्या दिसण्यावर उगाच नावं ठेवायचं म्हणून “वो क्या लडकी के जैसा मेकअप करता है” असं म्हणून मोकळी होतात. दुर्दैवाने साध्या भाषेत सांगायचं तर मेट्रोक्श्युअल या शब्दाचा संक्षिप्त अर्थ या चुकीच्या पद्धतीने मांडलेल्या वाक्यातच आहे. मेट्रोसेक्श्युअल ही एक अशी गेल्या वीसेक वर्षांत आलेली संज्ञा आहे जी पुरुषांच्या आवडी- निवडीवर भाष्य करते.
२००० च्या दशकाच्या सुरुवातीस सिम्पसनमधून मेट्रोसेक्श्युअल हा शब्द जागतिक स्तरावर लोकप्रिय झाला. २००२ मध्ये, सलोन डॉटकॉमने सिम्पसनचा एक लेख प्रकाशित केला, ज्यात डेव्हिड बेकहॅमचे वर्णन ब्रिटनमधील प्रसिद्ध मेट्रोसेक्श्युअल पुरुष असे केले होते.
मेट्रोसेक्श्युअल म्हणजे काय?
असे पुरुष ज्यांना मूलतः स्त्री किंवा होमोसेक्श्युअल व्यक्तींच्या वापरात येणाऱ्या गोष्टींविषयी अधिक आकर्षण असते ते मेट्रोसेक्श्युअल गटात मोडतात. आता या स्त्रीच्या वापरातील गोष्टी असंख्य असू शकतात. काही तरुणांना स्वतःच्या त्वचेची काळजी घेण्याची आवड असते, यासाठी फेशियल, स्किनकेअर करणे असे पर्याय ते वापरतात. अनेक तरुण हे मेकअपही करतात विशेषतः अभिनय, मीडिया किंवा सोशल मीडियावर अधिक कार्यरत असणारे पुरुष हे चेहरा उजळून दिसावा म्हणून मेकअपचा वापर करतात. केवळ एवढचं नाही तर काहींना स्त्रियांची आभूषणे, साडी, स्कर्ट असे कपडेही घालायला आवडतात.
मेट्रोसेक्श्युअल व होमो सेक्श्युअल यात फरक काय?
मुळात मेट्रो सेक्श्युअल असण्याचा तुमच्या लैंगिक आयुष्याशी काहीच संबंध नसतो. मेट्रोसेक्श्युल पुरुषाला जरी (मुख्यतः) स्त्री साठी तयार केलेल्या वस्तूंचे आकर्षण असेल तरी त्याच्या अन्यही निवडी स्त्रीप्रमाणेच असतील असा याचा अर्थ नाही. विशेषतः नात्यात जोडीदार निवडताना हे पुरुष स्त्री किंवा पुरुष हा निर्णय स्वतंत्र घेऊ शकतात.
मी दीपिका नाही पण… ट्रेन मध्ये दिसलेली ‘ती’, जगातील सर्वात सुंदर महिला!
२००५ साली ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित झालेल्या लेखातही मेट्रोसेक्श्युअल पुरुषांसाठी जाहिराती तयार करण्याबाबत सर्वेक्षणवर टिप्पणी होती. आपणही पुरुषांसाठी स्वतंत्र फेअरनेस क्रीम, स्किनकेअर उत्पादने, हेअर केअर उत्पादने यांच्या जाहिराती पाहिल्या असतील अगदी शाहरुख खान पासून ते वरुण धवन, रणवीर सिंह असे अनेक पुरुष मेट्रोसेक्श्युअल जाहिरातींमध्ये दिसून येतात. यामागील मुख्य कारण हे मेट्रोसेक्श्युअल असण्याकडे तरुणाईचा वाढता कल हे असूच शकते.
किरण पावसकरांना खुलं पत्र; साहेबांना ‘बायकी धंदे’ करायला सांगाच, कारण…
या नव्याने तयार झालेल्या ट्रेण्डमुळे पुरुषांनाही ‘बायकी धंदे’ असा टॅग न लावता स्वतःच्या दिसण्याबाबत आवडी निवडी जपण्याचा मार्ग तयार झाला आहे!