आपण अनेकदा नोकरी निवडताना केवळ आपण घेतलेल्या शिक्षणाचा विचार करत असतो. परंतु, जेव्हा तुम्ही नोकरी तुमच्या आवडीचा, छंदाचा विचार करून निवडता तेव्हा ती सर्वांपेक्षा फारच वेगळी आणि असामान्य असू शकते. कधीकधी आपल्याला जे व्यवसाय जुन्या काळातील वाटत असतात, तेच व्यवसाय करून काही जण लाखो रुपये कमावत असतात. मात्र, अमेरिकेतील एक महिला अशाच व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करते. यात ती जुन्या झालेल्या भंगाराचा वापर करून त्यांना सुंदर वस्तूंमध्ये रूपांतर करण्याचे काम करते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॉली हॅरिस असे या अमेरिकन महिलेचे नाव आहे. तिच्या या व्यवसायाचे अनेकांना प्रचंड कुतूहल वाटते. मॉली खराब झालेल्या, जुन्या वस्तूंना खरेदी करते आणि त्याच वस्तूंचा कायापालट करून त्यांना वापरण्यालायक अशा अतिशय सुंदर गोष्टींमध्ये रूपांतरित करते. भंगार वस्तूंना नवे रूप दिल्यानंतर, त्या वस्तूंना मॉली तिप्पट किमतीमध्ये विकते. अशा पद्धतीने घरातून काम करूनदेखील मॉली अतिशय उत्तम कमाई करते.

मॉली हॅरिस ३२ वर्षांची असून, ती दोन मुलांची आई आहे. सुरुवातीला लोवामध्ये राहणाऱ्या मॉलीने, तिच्या कुटुंबासह फ्लोरिडामधील समुद्राजवळ असणाऱ्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. मॉलीचा नवरा नोकरी करतो. मात्र, आपणदेखील स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काहीतरी वेगळं आणि अनोखे करावे असे तिच्या मनात आले होते. तेव्हा शेजाऱ्यांनी रस्त्यावर ठेवलेल्या जुन्यापुराण्या वस्तूंचे, फर्निचरचे ती रिफर्निशिंग करत असे. मात्र, तिचे हे काम मॉलीने सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या कामाला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळू लागला. लोकांनी टाकून दिलेल्या जुन्या फर्निचरला नवीन रूप देणाऱ्या मॉलीचे आणि तिच्या कामाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले.

हेही वाचा : केवळ २३ वर्षांची ‘आर्मिश असिजा’ बनली हवाई दलातील सर्वात तरुण महिला IAF अधिकारी! पाहा

सुरुवातीला मॉली केवळ नर्सरीच्या वस्तू विकत असे. मात्र, जुने फर्निचर नव्याने विकणे मॉलीला अधिक फायद्याचे वाटले. काही फर्निचरला नवे रूप देण्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागतो, तर काहींसाठी अनेक आठवडेदेखील लागू शकतात; असे मॉलीने म्हटले असल्याचे न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. असे फर्निचर विविध बाजारांमध्ये विकून, मॉली महिन्याला साधारण दोन हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे एक लाख ६७ हजार रुपये कमावते. मॉलीने ती करत असलेल्या या कामातून तिला प्रचंड आनंद मिळत असल्याचे सांगितले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Molly harris woman who sells old furniture with refurnished looks and earns lakhs of rupees check out chdc dha