काही दिवसांपूर्वीच वर्ष २०२३मधील जगभरातल्या प्रेरणादायी आणि प्रभावशाली अशा १०० महिलांची यादी जाहीर झाली होती. या यादीमध्ये अनेक भारतीय महिलांच्या नावाचा समावेश होता. प्रतिकूल परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी झटणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या महिलांना या यादीत स्थान देण्यात आलं होतं. जाणून घेऊया अशाच १० भारतीय महिलांबाबात ज्यांनी २०२३ मध्ये आपल्या कर्तृत्वाने भारतातील तसेच जगभरातील महिलांसाठी एक नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- एकेकाळी केवळ ५० पैशांमध्ये केली चहाची विक्री; आज कमवतात दिवसाला २ लाख रुपये; कोण आहेत पॅट्रिशिया नारायण?

१. द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५व्या आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या त्या पहिल्या आदिवासी समाजातील आहेत. द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात एका संथाल कुटुंबात झाला. द्रौपदी मुर्मू यांनी 1979 मध्ये भुवनेश्वरच्या रमादेवी महिला विद्यापीठातून कला शाखेत पदवी प्राप्त केली.

१९९७ मध्ये त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २००० ते २००९ पर्यंत ओडिशा विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले. २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. २०२१ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. २०२२ मध्ये भाजपने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार केले. ती निवडणूक जिंकली आणि भारताच्या १५व्या राष्ट्रपती बनल्या. आपल्या कार्यकाळात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला आरक्षण विधेयकाला संमती दिली आणि घटना (१०६ वी दुरुस्ती) कायदा म्हणून अधिकृतपणे मंजूर केले.

हेही वाचा- एकेकाळी ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम; आज अमेरीकेतील अब्जाधीश कंपनीच्या सीईओ

२. निर्मला सीतारमण

निर्मला सीतारामन या भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आहेत. त्या सध्या अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत. त्या कर्नाटकातील राज्यसभेच्या, भारतीय संसदेच्या वरच्या सभागृहाच्या सदस्य आहेत. २०१६ पासून त्या या सभागृहात होत्या आणि त्यापूर्वी त्यांनी २०१४ ते २०१६ पर्यंत आंध्र प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते. सीतारामन यांनी यापूर्वी २०१७ ते २०१९ या काळात संरक्षण मंत्री होत्या. निर्मला सीतारामन यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी मदुराई, तामिळनाडू येथे झाला. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी मिळवली आहे.

अर्थशास्त्र आणि राजकारणातील योगदानाबद्दल सीतारामन यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षाच्या, फोर्ब्स मासिकाने ” जगातील १०० सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये निर्मला सीतारमण यांचा समावेश केला आहे.

३. इशिता किशोर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत इशिता किशोरने प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागरी सेवा परीक्षा २०२२ साठी देशभरातील ९३३ उमेदवार पात्र ठरले आहेत, ज्यात ६१३ पुरुष आणि ३२० महिलांचा समावेश आहे. इशिता किशोरने दिल्ली विद्यापीठाच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स (SRCC) मधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे.

हेही वाचा- ॲक्टर, डॉक्टर आणि कंटेन्ट क्रिएटर असलेल्या तृतीयपंथी त्रिनेत्राची अनोखी गाथा; म्हणाली, २० वर्षे मुलगा म्हणून जगताना… 

४. डॉ. ऋतु करिधल श्रीवास्तव

डॉ. रितू करिधल श्रीवास्तव एक भारतीय अंतराळ शास्त्रज्ञ आहेत. त्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. तसेच त्या चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रमुख होत्या. रितू करिधल यांचा जन्म १९७६ मध्ये उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात झाला. उत्तर प्रदेशमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून स्पेस सायन्समध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. इस्रोमध्ये रुजू होण्यापूर्वी रितू करिधल यांनी काही वर्षे अमेरिकेतही काम केले होते. त्यांनी नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत संशोधक म्हणून काम केले आहे.

५. आलिया भट्ट

आलिया भट्ट ही एक बॉलीवूड अभिनेत्री आहे आलिया भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला चार फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आले आहे. आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा- २०२३ मध्ये ‘सॅम बहादूर’पासून ‘लस्ट स्टोरी २’पर्यंतच्या ‘या’ महिला दिग्दर्शित चित्रपटांनी प्रेक्षकांना घातली भुरळ

६. फाल्गुनी नायर

फाल्गुनी नायर या एक भारतीय अब्जाधीश व्यावसायिक महिला आहे. फाल्गुणी या भारतातील प्रसिद्ध नायका (Nykaa) कंपनीच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. उद्योग क्षेत्रातील लक्षवेधी कामगिरीबद्दल फाल्गुनी नायरला यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानाने गौरवण्यात आले आहे. २०२१ मध्ये टाईम मासिकाने जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादी फाल्गुनी नायर यांच्या नावाचा समावेश केला होता. २०२२ मध्ये भारतातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला.

७. नीता अंबानी

नीता अंबानी या एक भारतीय महिला उद्योजक आहेत. त्या भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी व रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची सून आहे. नीता अंबानी या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक आणि चेअरपर्सन आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक आहेत. २००८ मध्ये त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१६ मध्ये त्यांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल (FICCI) पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. हा भारतातील आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.

हेही वाचा- कोचिंग शिवाय झाली IAS अधिकारी, सलोनी वर्माची ‘ही’ रणनीती विद्यार्थ्यांसाठी ठरेल फायदेशीर

८. श्रद्धा शर्मा

श्रद्धा शर्मा या एक भारतीय पत्रकार आणि उद्योजिका आहेत. भारतातील सर्वात मोठे मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म, YourStory Media च्या त्या संस्थापक आणि CEO आहेत. शर्मा या फोर्ब्स अंडर ३० एशियाच्या माजी सदस्य आहेत. त्या भारतातील सर्वात प्रभावशाली तरुण महिलांपैकी एक आहे. भारतातील महिला उद्योजकतेला चालना देण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे.

९. किरण मजूमदार

किरण मुझुमदार-शॉ एक भारतीय महिला उद्योजक आहे. त्या बायोकॉन लिमिटेड, सिंजीन इंटरनॅशनल लिमिटेड आणि क्लिंजेन इंटरनॅशनल लिमिटेडच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. फोर्ब्सने त्यांचा आशियातील सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये समावेश केला आहे.

हेही वाचा- तब्बल पाच वेळा यूपीएससी परीक्षेत नापास होऊनही सोडला नाही ध्यास; प्रियांका गोयलच्या यशाची कहाणी वाचाच

१०. हरमनप्रीत कौर

हरमनप्रीत कौर ही एक प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आहे. भारतीय महिला क्रिकेटमध्ये हरमनप्रीतने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. हरमनप्रीत एक अष्टपैलू खेळाडू आहे. हरमनप्रीतने २०१७ मध्ये ICC महिला क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे तिने कर्णधारपद भुषवले होते. टी २० विश्वचषकाच्या फायनलमध्ये शतक झळकावणारी ती एकमेव महिला क्रिकेटर आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Most famous and successful indian women in
Show comments