जेनेलिया देशमुख

अवखळ, पण तितकीच संयत अशी गोड चेहऱ्याची, स्वभावाची अभिनेत्री जेनेलिया देशमुख पडद्यावरील तिच्या वावरानेच प्रेक्षकांचं मन जिंकते. तिच्या वागण्यातला अवखळपणा, चेहऱ्यावरची निरागसता प्रेक्षकांना आवडते. २००३ मध्ये दक्षिणेकडील निर्माता रामोजी राव निर्मिती ‘तुझे मेरी कसम’ या रोमँटिक चित्रपटानं रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्यासाठी बॉलिवुडचं दार खुलं झालं. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. या नात्याला पूर्णत्व देण्यासाठी दोघं ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये विवाहबद्ध झाले. आज ११ वर्षांच्या सहवासानंतर त्यांचं नातं अधिकच बहरतंय.

Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
ED quiz actress Gehena Vasisth in financial fraud probe
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
Marathi actress alka kubal praise to shivali parab for work on mangla movie
“बऱ्याच नायिका मी किती सुंदर…”, अलका कुबल यांनी ‘मंगला’ सिनेमासाठी केलं शिवाली परबचं कौतुक; म्हणाल्या…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

दरम्यान दोन मुलांची आई झालेल्या जेनेलियानं खऱ्या अयुष्यातील आईची भूमिकाही तितक्याच जबाबदारीनं निभावली आहे. आता मुलं थोडी मोठी झाल्यानंतर ती पुन्हा अभिनयाकडे वळली आहे. ‘ब्रेक टाईम’ संपवून तिनं ‘वेड’ या मराठी चित्रपटातून पुन्हा दमदार एन्ट्री केली. ती यशस्वीही झाली. सध्या जियो सिनेमावर तिच्या ‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तिच्या अभिनयाची तारीफ होतेय.

हेही वाचा… रंगाच्या भिंती तोडू पाहणाऱ्या सावनीची चूक तरी काय?

‘ट्रायल पिरियड’च्या निमित्यानं तिच्याशी गप्पा मारताना एक जाणवलं की, मुलांच्या संगोपानासाठी तिनं पूर्ण वेळ आईच्या भूमिकेत राहणं पसंत केलं. पण मुलं मोठी झाल्यावर रितेशच्या आग्रहाखातर तिनं पुन्हा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. ‘वेड’, ‘ट्रायल पिरियड’ चित्रपटापाठोपाठ तिनं एक दाक्षिणात्य चित्रपटही नुकताच पूर्ण केला. रितेशच्या होम प्रोडक्शन चित्रपटनिर्मिती संस्थेत ती कार्यकारी निर्माती म्हणूनही काम पाहते. दाक्षिणात्य चित्रपट असो वा बॉलिवूड जेनेलियानं मुलांच्या संगोपनासाठी चित्रपट सृष्टीला विराम देण्याचा निर्णय घेतलेल्यालाही आता दहा वर्ष उलटून गेली.

या दहा वर्षांत बॉलिवुड आणि तुझ्यात कोणते बदल झाले?

य दहा वर्षात या इंडस्ट्रीत बदल तर झालाच आहे आणि जो स्वाभाविकही आहे, पण माझ्यातही या दहा वर्षांमध्ये अमूलाग्र बदल झालाय. ‘अब मैं वो पहलेवाली जेनेलिया नहीं रही,’ अशी स्वत:वरच मिश्किल टिप्पणी ती करते. गेल्या वर्षी माझा ‘वेड’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि आता ‘ट्रायल पिरियड’. या दोन्ही चित्रपटांमधल्या भूमिका टोकाच्या वेगळ्या आणि वैविध्यपूर्ण आहेत. या दहा वर्षांत मी चित्रपटांमधील भूमिका निवडीबाबत खूप चोखंदळ आणि परिपक्व झालेय. पूर्वीच्या जेनेलियाच्या भूमिका या कॉलेज युवती, किशोरवयीन अल्लड मुलगी अशा होत्या. कदाचित माझ्या वयामुळे मला तशा प्रकारच्या एका साच्यातल्या भूमिका मिळत असतील. आता माझ्यात एक परिपक्वता आलीय. आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखा कशा नायिकाप्रधान, स्त्रीकेंद्री असाव्यात हे ध्यानात येऊ लागलं आहे आणि माझी निवड अधिक विस्तृत आणि परिपक्व झालीय.

आज मी सशक्त भूमिका तसंच मल्टी लेअर्स भूमिका मी करतेय. त्या करण्याचा विचार करतेय. याच भूमिका १०-१२ वर्षांपूर्वी माझ्या वाट्याला आल्या नसत्या- अर्थात त्या मी तेव्हा पेलू शकले असते की नाही हा मुद्दा वेगळा. पण या दहा वर्षांमध्ये मी एक पत्नी, सून, आई आणि गृहिणी या भूमिका साकारत असताना एक परिपक्व व्यक्ती झाले आहे हेही खरं. अदितीची भूमिका मी भलतीच बिनधास्त, फटकळ, बेधडक अशी साकारली होती. मी मुंबईत बांद्रयासारख्या ठिकाणी खुल्या वातावरणात वाढले. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच माझी निवड कॅम्पस तर्फे ‘पार्कर’ पेनच्या जाहिरातीत झाली. त्यात मी अमिताभ बच्चन यांची चाहती म्हणून त्यांची स्वाक्षरी मागते, मग मी त्यांना स्वाक्षरी वही आणि पार्कर पेन देते. पार्कर पेन पाहून ते प्रभावित होतात असं त्या ॲडफिल्मचं स्वरूप होते. या जाहिरातीमुळे फिल्मी वर्तुळात माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि पुढे जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑफर्स येत गेल्या.

हेही वाचा… भारतीय संस्कृतीत मंगळसूत्राची संकल्पना कशी विकसित झाली?

सेंट कॅरॅमल कॉन्व्हेंट -सेंट अँड्र्यूज कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. बांद्र्यात हिंदी -इंग्रजी असं हिंग्लिश कल्चर होतं. तिथलं बेधकड आणि फटकळ वातावरण माझ्यात मुरलं होतं. पण हो, त्या फटकळपणात कोणचाही पाणउतारा करणं, कोणाचं मन दुखावणं ही वृत्ती नव्हती. पण लग्नानंतर माझं जीवन एकदमच बदलून गेलं. जबादारीनं वागण्याची वृत्ती खोलवर रुजत गेली. माझ्यातल्या बेधडक -बिनधास्तपणाला एक जबाबदारीची, परिपक्वतेची झालर आली. आवशक्य तिथेच बोलावं, अन्यथा गप्प बासावं, हे लक्षात आलं.

रितेशची पत्नी, देशमुखांची सून म्हणूनही तुझे काही ‘डूज’ आणि ‘डोन्ट’स’ आहेत का?

स्क्रीनवर शॉट देताना मी कम्फर्टेबल असलं पाहिजे हे एक मनाशी ठरवलं होतं. मी आताशा फटकळपणे बोलत नसले तरी, बोलण्यातला सडेतोडपणा आजही कायम आहे. माझे शॉट कसे आहेत कुणासोबत आहेत, ते कसे द्यायचे आहेत याबाबत मी दिग्दर्शकांशी आधीच चर्चा करते. मी दिग्दर्शकाला हवा तसा शॉट दिला नाही म्हणून मी स्वत:ला दोषी समजता नये, तसंच दिग्दर्शकाला हवा तसा शॉट घेतल्याचं समाधान मिळायला हवं. चित्रपट किंवा ओटीटी माध्यमात काम करणं ही माझी आर्थिक गरज नाहीये. अभिनय हा कलावंतांच्या व्यक्तिमत्त्वाचा दुसरा चेहरा, त्यांचं पॅशन असतं, मग वाट्टेल त्या तडजोडी करत अभिनय का करावा? मला मी रितेशची पत्नी, देशमुखांची सून असल्याचा सार्थ अभिमान आहेच, पण त्याचा अभिनयाशी काही थेट संबंध नाही. माझी काही तत्त्वं पूर्वीपासूनच आहेत आणि मी त्या तत्त्वांशी आणि स्वत:शी प्रामाणिक आहे हे अधिक महत्त्वाचं आहे.

विवाहित आणि आई असलेल्या अभिनेत्रीला रोमँटिक भूमिका मिळतील का, या बाबत तुझी मतं काय?

वयाच्या साठीला आलेले हिरो पंचविशीच्या नायिकांशी ऑन स्क्रीन रोमान्स करताना आपण पाहतो आणि त्यात कुणाला काहीही खटकत नाहीये, तर विवाहित आणि आई असलेल्या अभिनेत्रीनं तिच्यापेक्षा लहान असलेल्या अभिनेत्यांसोबत ऑन स्क्रीन रोमान्स करण्यात गैर ते काय? ऑफ कोर्स स्टोरी -स्क्रिप्ट शुड बी रिलेटेबल! एक अभिनेत्री ऑन स्क्रीन आपल्या वयापेक्षा लहान किंवा मोठ्या हिरोसोबत रोमान्स करणं हा मुद्दा महत्त्वाचा नाही किंवा माझ्या लेखी तो मॅटर करत नाहीच.

‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटाविषयी काय सांगशील?

‘ट्रायल पिरियड’ या चित्रपटाची कथा एक सिंगल मदर आणि तिच्या लहान मुलाभोवती फिरते. लहान मुलाला त्याच्या आयुष्यात वडिलांची कमतरता भासते आणि तो आईकडे मागणी करतो की वडिलांना ‘ट्रायल पिरियड’ पुरते तरी घरी का आणू नये? फक्त हे आईच समजू शकते की तिच्या लहान मुलानं केलेली पॉटी हा एक इशू कसा होऊ शकतो? पूर्वीच काय आजही स्त्रिया, एक आई मल्टिटास्किंग करते. अनेक व्यापात गुंतलेली आई आणि त्याच वेळेला बाळानं केलेली सूं /शी तिला आवरायची असते. म्हटलं तर इतरांसाठी किरकोळ बाब, तिच्यासाठी ती नाही. मुलांचा अभ्यास, गृहपाठ, शाळेच्या ट्रिपा, त्यांचं खाणं-पिणं, मुलांचं भावविश्व… अशी अनेक कामं एक आईच करू जाणे. प्रत्येकाने विशेषत: स्त्रियांनी बघावा असा चित्रपट आहे,

Story img Loader