पुण्यातल्या ॲना या सीए असलेल्या मुलीचा कामाच्या अति ताणाानं जीव गेला. त्यानिमित्तानं नवीनच नोकरीत जॉईन झालेल्या मुलीच्या आईनं आपल्या लेकीच्या काळजीपोटी तिच्या बॉसला लिहिलेलं हे अनावृत पत्र…

मी तुमच्या कंपनीत कामाला नाही, आपण कधीही भेटलेलो नाही, आपला कधी संपर्कही झालेला नाही, तरीही मी हे पत्र लिहीत आहे. तुम्ही मला ओळखत नाही, पण तरीही हे पत्र लिहिण्याचं धारिष्ट्य मी करत आहे. याचं कारण म्हणजे तुम्हाला आतापर्यंत कळलं असेलच की पुण्यात कामाच्या अति ताणामुळे एका २६ वर्षांच्या ॲनाचा जीच घेेतला. तिच्या आईचं पत्रंही तुम्ही वाचलं असेल. माझी मुलगी नुकतीच तुमच्या कंपनीत जॉईन झाली आहे. हे ऐकल्यावर माझ्यात असलेल्या आईच्या हृदयाचा थरकाप उडाला होता. छोट्याशा शहरातून मोठ्ठी स्वप्नं डोळ्यांत घेऊन मोठ्या शहरात आलेली माझी मुलगीच माझ्या डोळ्यांसमोर आली. तिच नाही तर तिच्यासारख्या कितीतरी छकुल्यांना आईवडील मनावर दगड ठेवून करियरसाठी बाहेरच्या शहरात पाठवतात. पण आता ॲनाचं जे झालं ते आपल्याही मुलीला सहन करावं लागत असेल का? असा विचार येऊन भीती वाटते.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

ॲना सीए होती. सीएची परीक्षा देणे किती कठीण असतं हे मी तुम्हाला सांगायला नको. फक्त सीएच नाही, इंजिनिअर, मॅनेजमेंट, मीडिया अशा अनेक क्षेत्रांत प्रचंड स्पर्धेला तोंड देत, अडथळे पार करत मुली त्यांच्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळण्याच्या स्वप्नाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. आम्ही आईवडील म्हणून आमच्या प्रयत्नांत कोणतीही कसूर करत नाही. त्याही मुली आहेत म्हणून मागे न हटता स्वत:ला सिध्द करतात. पण मग आपलं ध्येय गाठत असताना असं काय होतं की ॲनाला जीव द्यावासा वाटतो?

हेही वाचा >>> ८० वर्षांची स्विमर आजी! एकेकाळी पोहोण्याची वाटायची भीती, आता आहेत स्विमिंग चॅम्पियन; १३ व्या वर्षी लग्न झालं अन्…; वाचा प्रेरणादायी कहाणी

नोकरी करताना ताणतणाव हे तर गृहीत धरलेले असतातच. कामाचे जास्त तास, नवीन काही शिकण्याचं टेन्शन, स्वत:ला सिध्द करण्याचं टेन्शन, बाहेरगावी असेल तर घर शोधण्यापासून ते स्वत:च्या सुरक्षेचं, जेवणाखाण्याचं टेन्शन… हे सगळं आम्हालाही माहिती असतंच. पण मुलीच्या शिक्षणाचा उपयोग होतोय, तिचं करियर घडतंय तर या वयात मेहनत करायलाच हवी असंच आम्हालाची वाटतं. आपण प्रत्येकजण कधी ना कधीतरी नवखे असतो, शून्यातून शिकूनच सुरुवात करतो. तरीही आपण जेव्हा वरिष्ठ स्तरावर जातो तेव्हा समोरच्या नवख्यांना त्रास देण्याची मानसिकता कुठून येते? या मुली आणि मुलगेही शिक्षण घेऊन आलेल्या आहेत. त्यांना फक्त अनुभवाची गरज आहे असं म्हणून माणुसकीच्या भावनेनं का समजावलं जात नाही? नवीन आहे म्हणजे अति काम, मॅनेजर जसं सांगेल तितके तास काम करणं, हक्काच्या सुट्टीसाठीही बॉसला विचारायला घाबरतात या मुली. कितीही आजारी असलं तरी कामावर आलंच पाहिजे ही सक्तीही किती महागात पडत असेल? नवीन नोकरी म्हणजे खाणंपिणं विसरून, झोप कमी करून अखंडपणे या मुली राबत असतात. कारण त्यांना चांगलं करियर घडवायचं असतं, आपल्या आईवडिलांना, आपल्या घरच्यांना सुखात ठेवायचं असतं. कुणाकडे तक्रार केली तर इंप्रेशन वाईट होईल म्हणून गुपचूप कितीतरी वेळेस सहन करत राहतात. नोकरी म्हणजे प्रत्येकानं काम केलंच पाहिजे, त्याचेच तर पैसे मिळतात. पण आपली जबाबदारी ज्युनिअर्सवर ढकलून त्यांना हवं तेव्हा हवं तसं ओरडणारा, तुम्हाला कसं काहीच कळत नाही, तुम्ही कसं काहीच काम करत नाही, आम्ही किती मेहनत करायचो, असं सतत सांगणारे वरिष्ठ सहकारी किंवा मॅनेजर्स कळत न कळत या मुलांवर निगेटिव्ह परिणाम करत असतात.  

आपली मुलगी मोठ्या कंपनीत कामाला लागली याचा आनंद, अभिमान प्रत्येक आईवडिलांना असतो. तिला किती काम असतं, तिला कशा सुट्ट्या नसतात याचंही कौतुक सगळ्यांना सांगायला त्यांना आवडतं. पण तरीही कुठेतरी मनात सतत एक काळजी, चिंता असतेच. कामाच्या धबडग्यात आयुष्यच जगायला विसरायला लागलेली एक आख्खी पिढी तर आपण तयार करत नाहीयोत ना? “Work Comes First” असं म्हटलं ते अगदी खरं आहे, पण त्यासाठी आपल्या आयुष्याची किंमत लावायची का?

हेही वाचा >>> Who is Mohana Singh : घरातूनच लढण्याचं बाळकडू अन् आकाशी झेप घेण्याचं स्वप्न; मोहना सिंग यांची यशस्वी भरारी!

हा ताण मॅनेज करता आलाच पाहिजे, पण त्यासाठी आपणच त्यांना मदत करायला हवी ना? माणसं घरापेक्षा जास्त काळ ऑफिसमध्ये असतात. तिथले सहकारी, वरिष्ठ त्यांच्या कुटुंबापेक्षाही जास्त वेळ त्यांच्याबरोबर असतात. मग ऑफिसमध्ये चांगलं वातावरण ठेवता येणं हे सगळ्यांसाठीच किती महत्त्वाचं आहे. आपल्या टीममधल्या सहकाऱ्यांबरोबर काम करणं आनंददायी असलं पाहिजे ही भावना तुम्हीच तर त्यांच्या मनात रुजवू शकता. फार अपेक्षा नाहीत, त्यांना लहान मुलांसारखं वागवू नका, पण त्यांच्याकडे माणूस म्हणून बघा. नवीन आलेली मुलं –मुली ही मशिन्स नाहीयेत. १२ ते १७ तास ड्युटी, घरूनही सतत कॉलवर राहणं, सततच्या नाईटशिफ्ट, ओव्हरटाईम, अगदी खाण्यासाठीही वेळ न देणं… मेडिकलपासून ते आयटी आणि अगदी मीडियापर्यंत कुठल्याही क्षेत्रातलं हे रुटीन झालं आहे. प्रचंड स्पर्धा वाढली आहे, त्यात टिकून राहण्यासाठी प्रत्येकजण जीव तोडून मेहनत करतोय, आपलं सर्वस्व पणाला लावतोय… माझी मुलगीही त्यातलीच एक आहे. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी, स्वप्नपूर्ततेसाठी तिला आम्ही पाठवलंय खरं, पण ॲनाची बातमी ऐकल्यापासून काळीज धडधडतंय, रात्रीची झोप उडाली आहे.

तिच्यासाठी आणि तिच्यासारख्या असंख्य मुलींसाठी… फक्त मुलींसाठीच काय, तर मुलांसाठीही इतकंच करा सर… त्यांना मशिन्स समजू नका, माणूस म्हणून समजून घ्या… निदान त्यामुळे कितीतरी ॲना जीवापेक्षा काम महत्त्वाचं आहे, पण मी ते करू शकत नाही असं म्हणत जीव तरी देणार नाही.

तुमच्यावर विश्वास असणारी

एका मुलीची आई